तार कुंपण योजना 2026![]()
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे जंगली जनावरांपासून,वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आपल्या शेताभोवती तारकुंपण करण्यासाठी अनुदान दिले जाते. हे अनुदान जिल्ह्यानुसार व कुंपणाचे प्रकरणानुसार वेगवेगळे असू शकते.
* तार कुंपन योजना 2026 चे उद्दिष्ट काय आहेत?
वरील योजनेचे सर्वात प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करणे. सोबतच
- पिकांचे वन्य प्राण्यांपासून जनावर पासून संरक्षण करणे.
- शेतकऱ्याचे नुकसान कमी करणे
- नुकसान वाचून शेतकऱ्याचे उत्पादनामध्ये भर पाडणे
- सुरक्षित शेतीला प्रोत्साहन देणे.
वरील उद्दिष्टना समोर ठेवून ही योजना राबवली जाणार आहे.
* तार कुंपण योजना 2026 नुसार कोणत्या प्रकारचे कुंपण शेतकऱ्यांना मिळणार आहे?
वरील योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारचे कुंपण मंजूर करून मिळणार आहे. त्यामध्ये
- काटेरी ताराचे कुंपण
- चैन लिक फेन्सिंग
- सिमेंट फुल किंवा लोखंडी फुल ला जोडून कुंपण.
अशा पद्धतीची विविध कुंपण या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मंजूर करून दिले जाणार आहे.
* तार कुंपण योजना 2020 च्या पात्रता काय आहेत?
वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही पात्रता ठरवून दिलेले आहेत. त्या पात्रतांची पूर्तता केल्यानंतर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्या पात्रता खालील प्रमाणे
- अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदार शेतकऱ्याचे नावावर शेती असावी.
- अर्जदार शेतकऱ्याकडे 7/12 व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे आवश्यक आहे.
- विविध क्षेत्रानुसार विविध अटी शासनाने लावलेल्या आहेत त्या अटींची पूर्तता केलेली असावी.
वरील पात्रतांची पूर्तता शेतकऱ्यांनी केलेली असावी जेणेकरून योजना मंजूर होण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही.
* तार कुंपण योजना 2026 साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?
वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही कागदपत्रांची पूर्तता करण्याची निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार अर्जदार शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रांची पूर्तता करावी तेव्हाच त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला
- आधार कार्ड
- 7/12 उतारा
- 8 अ उतारा
- मोबाईल नंबर व आधार शी लिंक असलेले बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- जात प्रमाणपत्र.
इत्यादी कागदपत्राची पूर्तता अर्जदार शेतकऱ्यांनी केलेली असावी.
Www.aggroshala.com
* तार कुंपण योजना 2026 नुसार शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे?
- सदर योजनेद्वारे शेतकऱ्यांना जे अनुदान मिळणार आहे त्याचे क्रायटेरिया हे विविध क्षेत्रानुसार वेगवेगळे असू शकतात.
तरी ढोबळपणे
- एकूण खर्चाच्या 50% ते 75 टक्के पर्यंत अनुदान शेतकऱ्यांना मिळू शकते.
- शेतकरी अर्जदार जर अनुसूचित जाती व जमातीतील असाल तर हे अनुदान वाढू शकते.
* तर कुंपण योजना 2026 साठी अर्ज कुठे व कसा करावा?
- वरील लिहिण्यासाठी अर्ज करण्यासाठी खालील प्रोसिजर चा अवलंब करावा.
- शासन पुरस्कृत महाडीबीटी पोर्टल वरती नोंदणी करावी.
- नोंदणी करून फार्मर लॉगिन करावे.
- त्यानंतर एग्रीकल्चर या ऑप्शन वरती क्लिक करावे.
- नंतर "तार कुंपण ऑफ फेन्सिंग" या बटन वरती क्लिक करावे.
- मागितलेली माहिती भरावी.
- आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.
- व शेवटी अर्ज सबमिट करावा.
अशा पद्धतीने वरील योजनेसाठी आपण अर्ज करू शकतो.
* तार कुंपण योजना 2026 चे शेतकऱ्यांना काय फायदे होणार आहेत?
वरील योजनेद्वारे शेतकऱ्यांना बराचसा फायदा होऊ शकतो त्यामध्ये
- शेतकऱ्यांची रात्र पाळीच्या त्रास वाचेल.
- नुकसान कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ होईल.
- वन्यजीवांपासून पिकाची नुकसान होणार नाही.
वरील फायदे व इतरही फायदे शेतकरी बांधवांना होऊ शकतात.
* महत्त्वाच्या सूचना
- शेतकरी बांधवांनी योजना मंजूर झाल्यानंतरच काम सुरू करावे.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यावी.
- तार कंपनी साठी लागणारे मटेरियल अधिकृत व्यवसायिकाकडून विकत घ्यावे.
- मटेरियल चे बिल जपून ठेवावे.
निष्कर्ष :-
मित्रांनो सदर योजनेद्वारे शेतकऱ्यांचे अधिकचे लागणारे कष्ट कमी करून त्यांचे उत्पादन मध्ये वाढ व्हावी या हेतूने सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. शेतकरी बांधवांना वन्य प्राण्यांचा फार त्रास होत असतो. वन्य प्राण्यांमुळे पिकाची नुकसान होऊन उत्पादनामध्ये घट निर्माण होते. यापासून सुरक्षा मिळण्यासाठी वरील योजनेचा लाभ शेतकरी बांधव घेऊ शकतात.
अशा शेतीविषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या व सबस्क्राईब करायला विसरू नका.🙏🙏👍👍✅
https://youtube.com/shorts/Oh2uk7KArXc?si=FnRnxx0Wkj4BAnTC
धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏