माती परीक्षणासाठी नमुने कसे गोळा करावे?

माती परीक्षणासाठी नमुने कसे गोळा करावे? जाणून घ्या विस्तृत माहिती!

माती परीक्षणासाठी नमुने कसे गोळा करावे?
माती परीक्षणासाठी नमुने कसे गोळा करावे?

आधुनिक शेती करत असताना माती परीक्षण हा फार महत्त्वाचा टप्पा आपल्या शेतीमध्ये ठरू शकतो. मात्र माती परीक्षणासाठी मातीचे नमुने घेताना जर चुका केल्या तर मात्र आपल्या मातीचे प्रश्न योग्य प्रकारे होऊ शकणार नाही. त्यासाठी योग्य पद्धतीने, योग्य प्रोसेसने योग्य नमुने तयार केल्यास आपल्याला माती परीक्षण चांगल्या पद्धतीचा आणि योग्य पद्धतीचा करून मिळेल.
माती परीक्षणातून आपल्याला आपल्या मातीची आपल्या शेताची गरज कळते. कोणत्या घटकांची कमतरता आहे,कोणते घटक किती टाकायचे, पाण्याची पातळी कशी आहे, माती ओलावा धरून ठेवते का, खतांची मात्र किती प्रमाणात द्यायची, गांडूळ खत, सेण कर वापरायची आहे का? या सर्व गोष्टींची इत्यांभूत माहिती आपल्याला माती परीक्षणातून मिळत असते.

* मातीचे नमुने गोळा करण्याची योग्य वेळ कोणती?


मित्रांनो मातीचे नमुने गोळा करत असताना आपल्याला योग्य वेळी नमुने गोळा करावे लागतात. त्यासाठी

- पीक पेरणी करण्याच्या अगोदर किंवा पीक काढणीनंतर मातीचा नमुना गोळा करावा.
- आपल्या शेतामध्ये आपण नगदी कोणत्याही प्रकारचे खत टाकलेला असेल तर त्यावेळी मातीचा नमुना गोळा करू नये.
- मातीचा नमुना गोळा करताना शेतातील माती ही पुरेशी ओली असावी. एकदम कोरडी माती असेल किंवा एकदमच बोली माती असेल तर त्या ठिकाणचा नमुना गोळा करू नये.

* मातीचा नमुना गोळा करण्याची योग्य पद्धत कोणती?

- मातीचा नमुना गोळा करत असताना नमुने गोळा न करता योग्य पद्धतीचा अवलंब करावा. जेणेकरून आपल्या मातीचे माती परीक्षण हे चांगल्या पद्धतीचा आणि योग्य पद्धतीचा होईल. त्यासाठी

1) शेतीचे भाग पाडा
- मातीचे नमुने गोळा करत असताना आपल्या मातीचे प्रकारावरून रंगावरून, ओलाव्यावरून, चढ- उतार, तसेच वेगवेगळ्या पिकांची पेरणी करत असल्यास या वेगवेगळ्या प्रकारवरून आपल्या मातीचे नमुने गोळा करावे.

2) माती कचरा विरहित असावी.
- मातीचा नमुना गोळा करत असताना त्या मातीमध्ये कचरा वगैरे नसावा. त्यासाठी वर्षी माती दगड वगैरे साफ करून नंतरच मातीचा नमुना घ्यावा.

3) माती नमुनासाठी v आकाराचा खड्डा खोदावा.
- माती नमुना गोळा करण्यासाठी आपल्या शेतामध्ये v आकाराचा खड्डा खोदावा.
खट्टा साधारणतः
- साधारण पिके घेत असल्यास - 6-7 इंच खड्डा
- फळबाग घेत असल्यास -10-12 इंच खड्डा खोदावा.

4) माती नमुनासाठी मातीचा पातळ थर घ्यावा.
- कट्ट्याच्या आजूबाजूचा साधारणतः दोन ते तीन इंच पातळ तर यामधील माती नमुना साठी घ्यावी.

5) नमुने शेतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून घ्यावे.
- शेतातून मातीचे नमुने घेण्यासाठी शेतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारची माती नमुने घ्यावी.
माती नमुने गोळा करताना
8-10 ठिकाणाहून नमुने गोळा करावे.

6) नमुनासाठी मातीचे योग्य मिश्रण करावं.
- जमा केलेली सर्व माती एका भांड्यामध्ये घेऊन त्याचे योग्य पद्धतीचे कालवण किंवा मिश्रण करून नंतरच ती नमुनांच्या पॅकेटमध्ये भरावी.

7) अंतिमतः अर्धा किलो चा नमुना तयार करावा.
- सर्व ठिकाणची वेगवेगळ्या प्रकारची माती जमा केल्यानंतर ती सर्व माती मिश्रित केल्यानंतर शेवटी अर्धा किलोच्या पॅकेट चा नमुना तयार करावा.

* माती नमुने गोळा करताना ह्य चुका टाळा!
- माती नमुनासाठी बांधाच्या वरील किंवा बांधाजवळील माती घेऊ नये.
- शेणखत टाकलेला असेल तर शेण खताच्या ढिगा जवळील माती घेऊ नये.
- एकदम ओल्या ठिकाणची,व पाणी साचलेलं असेल तर त्या ठिकाणची माती घेऊ नये.

Www.aggroshala.com

* माती नमुनांचे पाकीट वरती माहिती कशी भरावी?
- माती नमुना चे पॅकेट तयार केल्यानंतर त्यावरती एक कागदी चिट्टी चिटकवून त्यावर
- शेतकऱ्याचे संपूर्ण नाव
- शेतकरी रहिवासी असलेल्या गावाचे नाव.
- शेती गटाचे नंबर
- घेत असलेल्या पिकांचे नाव
- मती नमुना गोळा केलेल्या दिनांक
इत्यादी माहिती स्पष्टपणे लिहावी.

* मातीचे नमुना गोळा करण्यासाठी खालील साधनांचा वापर करावा.
- मातीचे नमुने फावड्याने किंवा खुर्प्याने खोदून गोळा करावे.
- स्वच्छ प्लास्टिक बादली
- नमुने भरण्यासाठी प्लास्टिकची पिशवी
- नमुना पाकीट वरती लेबल


* माती परीक्षणातून कोणते घटक तपासले जातात?
- माती परीक्षणातून आपल्या माती विषयीची संपूर्ण माहिती तपासली जाते. त्यामध्ये सर्वच घटकांची इत्यंभूत माहिती आपल्याला दिली जाते. त्यामध्ये

- नत्र
- स्फुरद
- पालाश
- झिंक
- कॅल्शिअम
- बोरॉन
- लोह
- मॅग्नेशियम
अशा घटकांची व इतरही बऱ्याचशा घटकांची तपासणी केली जाते.

* माती परीक्षणाचे फायदे काय होतात?
-
1 खत व्यवस्थापनासाठी मदत होते
- पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करता येते
- योग्य पिकांची निवड करता येते
- जमिनीची सुपीकता लक्षात येते
- उत्पादन वाढते
- अनावश्यक खर्च टळतो.
अशा पद्धतीने विविध फायदे आपल्याला मादी परीक्षणातून मिळत असतात.

अशा पद्धतीने माती परीक्षण करत असताना योग्य पद्धतीने मातीचे नमुने गोळा केल्यास आपल्याला फायदा होतो. मातीचे नमुने योग्य पद्धतीने गोळा केल्यामुळे मातीचे परीक्षण हे योग्य पद्धतीने आणि व्यवस्थित होतं. त्यामुळे माती परीक्षणासाठी नमुने गोळा करत असताना वरती सांगितलेल्या पद्धतींचा अवलंब करावा.

माती परीक्षणासाठी नमुने कसे गोळा करावे?
माती परीक्षणासाठी नमुने कसे गोळा करावे?
माती परीक्षणासाठी नमुने कसे गोळा करावे?
माती परीक्षणासाठी नमुने कसे गोळा करावे?

अशा शेती विषयक महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या व सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🙏🙏

https://youtube.com/@aggroshala?si=jLlMkvWEPEXq8o-P
https://youtube.com/@aggroshala?si=3mbG0N96kHNSj6d8


धन्यवाद🙏🙏



  1. ↩︎

Sunil

Sunil

“मी सुनील, या वेबसाईटचा मालक. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि शेतीसंबंधित माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे.”