शेणखत चे फायदे काय व एकरी शेणखत किती टाकावे?

शेणखत चे फायदे काय व एकरी शेणखत किती टाकावे? जाणून घ्या विस्तृत माहिती!

शेणखत चे फायदे काय व एकरी शेणखत किती टाकावे?
शेणखत चे फायदे काय व एकरी शेणखत किती टाकावे?

गाय,म्हैस किंवा इतर जनावरांच्या विष्ठेपासून तयार झालेला खत म्हणजेच शेणखत होय. या शेणखतामध्ये असे विशिष्ट गुणधर्म असतात त्याच्यामुळे आपल्या जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची व मातीची सुपीकता सुधारते. रासायनिक खतांपेक्षा शेणखत हे फार प्रभावी तसेच दुष्परिणाम मुक्त असतं. रासायनिक खतामुळे आपल्या शेतातील काही येऊन उपयुक्त बॅक्टेरिया बुरशी यांचा नायनाट होतो. मात्र शेणखतामुळे अशा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम आपल्या मातीवर किंवा पिकावर दिसत नाही.

* शेणखत टाकण्याचे फायदे काय आहेत?

1) मातीचा पोत सुधारतो.
- शेणखताच्या वापरामुळे आपल्या मातीमधील सेंद्रिय कर्ब वाढतात. ज्यामुळे माती सुपीक होते,भुसभुशीत होते व आरोग्यदायी बनते. तसेच पिकांना हवे असलेले विविध सूक्ष्म अन्नद्रव्य या शेणखतामुळे आपल्या मातीमध्ये तयार होतात.

2) ओलावा टिकून राहतो.
- शेणखत हे गाई म्हशीच्या किंवा बैलांच्या शेणापासून व मूत्रपासून बनलेला असतो. त्यामुळे शेणखतामध्ये असे काही गुणधर्म असतात त्याच्यामुळे आपल्या मातीची पाणी धरून ठेवण्याची किंवा ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता सुधारते.

3) जमिनीमधील उपयोगी सूक्ष्म जीव वाढतात.
- आपल्या पिकांसाठी जमिनीमध्ये काही उपयोगी सूक्ष्मजीव असतात तसेच काही धोकादायक सूक्ष्मजीव असतात. यापैकी उपयोगी सूक्ष्मजीव हे आपल्या पिकाच्या वाढीसाठी तसेच सूक्ष्म अन्न घटकांच्या उपलब्धतेसाठी मदत करत असतात. शेण खताच्या वापरामुळे आपल्या जमिनीतील हे जे सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव वाढतात. त्यामुळे आपल्या मातीला त्याचा फायदा होतो.

4) पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्य सहज मिळतात.
- शेणखतामध्ये विविध प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध असतात. आपल्या पिकासाठी आवश्यक असणारे जे सूक्ष्म अन्नघटक आहेत ते पिकांना सहज उपलब्ध होतात. यामध्ये नत्र, झिंक,फॉस्फेट, नायट्रोजन व इतरही सूक्ष्म अन्नद्रव्य असतात.

5) पिकांच्या मुळांची वाढ चांगली होते.
- शेण खताच्या वापरामुळे आपल्या जमिनीचा पोत सुधारतो तसेच जमीन भुसभुशीत होते. त्यामुळे आपल्या पिकांच्या मुळांना वाढण्यासाठी चालना मिळते व मूळही खोलवर जमिनीमध्ये वाढतात.

6) मातीचा पी एच(ph)नियंत्रित राहतो.
- मातीचा पीएच जेवढा संतुलित तेवढं मातीचा आरोग्य चांगलं. यामुळे आपल्या मातीचा पीएच हा संतुलित असायला हवा. शेणखतामुळे आपल्या मातीचा पीएच हा संतुलित राहण्यास मदत होते. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते उत्पादनामध्ये भर मिळते.

माती परीक्षण महत्त्व व फायदे? जाणून घ्या विस्तृत माहिती!

* शेणखत कसे टाकावे?

- शेणखत जमिनीमध्ये टाकत असताना ते पूर्णपणे कुजलेले आहेत का याची काळजी जरूर घ्यावी. कारण वरती सांगितलेले फायदे जे शेणखताचे आहेत ते जमिनीला तेव्हाच मिळणार जेव्हा शेणखत हे पूर्णपणे कुजलेले असेल. त्यामुळे जमिनीमध्ये किंवा शेतामध्ये शेणखत टाकत असताना ते अर्धवट कुजलेलं असू नये. यामुळे फायदा कमी व नुकसान जास्त होते. या अर्धवट कुरलेला शेणखतामुळे जमिनीमध्ये नुकसानकारक अशा बुरशी तयार होतात, हुमणी अळीचा प्रभाव वाढतो, विविध कीड आपल्या पिकावरती अटॅक करू शकतात, तसेच शेतामध्ये तणही मोठ्या प्रमाणात वाढते.

* चांगलं शेणखत कसं ओळखावे?

- चांगलं शेणखत ओळखत असताना त्याचा रंग त्याचा भुसभुशीत पणा, व त्याचा वास याची काही लक्षण आहेत यावरून आपण ओळखू शकतो की शेणखत चांगला आहे की नाही.
त्यामध्ये
- शेणखताचा रंग हा काळसर असायला हवा.
- शेण खताची दुर्गंधी यायला नको.
- शेणखत हे एकदम भुसभुशीत असावं तसेच नरम असावं.
- व शेणखत पूर्णपणे कुजलेलं असावं.
ही काही लक्षण आहे ज्यावरून आपण ओळखू शकतो की शेणखत हे चांगलं आहे की नाही.

* शेणखत टाकण्याचे योग्य प्रमाण कोणते?

- जमिनीमध्ये शेणखत टाकत असताना त्याचे योग्य प्रमाण हे आपण कोणत्या पिकासाठी टाकतो याच्यावरून ठरत असते. म्हणजेच विविध पिकांसाठी आपण विविध प्रमाणामध्ये शेणखत टाकू शकतो. त्यामध्ये

सोयाबीन- 2 ते 2.5 टन प्रती एकर
कापूस - 2 ते 3 टन प्रति एकर
ऊस - 7 ते 8 टन प्रति एकर
फळबाग - 10 ते 20 किलो प्रति झाड

याप्रमाणे तसेच विविध पिकांसाठी त्यांच्या प्रमाणामध्ये शेणखत टाकलं जावं.

* शेणखत टाकण्याची योग्य वेळ कोणती?

विविध हंगामानुसार व विविध पिकांनुसार शेणखत टाकण्याची वेळ ही बदलत असते.

खरीप हंगाम-
पेरणीपूर्वी महिनाभर अगोदर शेणखत टाकने योग्य ठरेल.

रब्बी हंगाम -
नांगरणी झाल्यानंतर लगेच शेणखत टाकल्यास फायदा होईल.

* शेणखत अधिक प्रभावी कसे बनवावे?

- शेणखत जसेच्या तसे टाकल्यानंतर ते जास्त प्रभावी बनत नाही. मात्र आपण शेणखतावर जर काही प्रक्रिया गेल्या तर मात्र आपलं शेणखत हे फार प्रभावी बनवू शकतो. त्यासाठी

- शेणखतामध्ये जीवामृत किंवा सूक्ष्मजीव कल्चर मिश्रण करावे.
- ट्रायकोडर्मा आहे एक बुरशीनाशक आहे ज्याचा वापर जर शेणखत मिश्रणामध्ये केला तर विविध बुरशी पासून आपल्या पिकांचे रक्षण होऊ शकतं.
- शेणखत कुजवताना ते कंपोस्ट पद्धतीने जर बुजवलं तर त्याचा जास्त फायदा आपल्या पिकांना शेतांना होईल.

अशा पद्धतीने आपण शेणखतांना अधिक प्रभावी बनवू शकतो.

निष्कर्ष:- शेणखत म्हणजे जमिनीचा व मातीचे जीवन होय. शेणखत शिवाय आपली जमीन ही नापीक होऊ शकते. शेणखतामध्ये विविध घटक असतात सूक्ष्मद्रव्य असतात, उपयोगी बुरशी, उपयोगी विविध घटक असतात. ज्यामुळे आपल्या मातीचा पोत सुधारतो माती भुसभुशीत होते. आपला रासायनिक खतांचा खर्चही वाचतो. परिणामी आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते.
शेणखत चे फायदे काय व एकरी शेणखत किती टाकावे?
शेणखत चे फायदे काय व एकरी शेणखत किती टाकावे?
शेणखत चे फायदे काय व एकरी शेणखत किती टाकावे?
शेणखत चे फायदे काय व एकरी शेणखत किती टाकावे?

अशा शेती विषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या व सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🙏🙏🙏🙏
https://youtube.com/@aggroshala?si=2-fb3zF87mMJldRn

Sunil

Sunil

“मी सुनील, या वेबसाईटचा मालक. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि शेतीसंबंधित माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे.”