अमायनो ऍसिड आपल्या पिकांमध्ये काय काम करते?
अमायनो ऍसिड हे आपले पिकांच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचा असा जैविक घटक आहे. अमिनो ऍसिड हा प्रथिनांचा एक मुख्य घटक आहे जो की आपल्या पिकांच्या चांगल्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी मदत करत असतो.
* अमायनो ऍसिड म्हणजे काय?
अमायनो ऍसिड म्हणजे झाडांमध्ये प्रथिने तयार करणारा एक सूक्ष्म घटक. आपल्या झाडांमध्ये विविध प्रथिनांची निर्मिती होत असते या निर्मितीमध्ये अमायनो ऍसिड आपल्या पिकाला मदत करत असतो.
हे अमिनो ऍसिड विविध प्रथिने तयार करून त्यांच्या मार्फत झाडाला ताण सहन करण्यासाठी, झाडाची चांगली वाढ होण्यासाठी, फलधारणा व फुलदाणीसाठी मदत करत असतो.
* पिकासाठी अमायनो ऍसिड चे काय फायदे होतात?
• ताण सहन करण्याची क्षमता वाढते
विविध क्रिटिकल कंडिशन मध्ये आपल्या पिकाला ताण सहन करण्यासाठी अमायनो ऍसिड मदत करत असतो.
अति थंडी
जास्त ऊन
जास्त पाऊस
या प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये झाडाला तान सहन करण्याची शक्ती अमिनो ऍसिड मुळे मिळते.
• झाडाची वाढ चांगली होते.
झाडाची वाढ चांगली होण्यासाठी अमायनो ऍसिड आपल्या झाडाला मदत करत असतो प्रोत्साहन देत असतो.
झाडाला नवीन पाणी येतात.
नवीन फुटवे फुटतात.
झाडाच्या मुळांची वाढ चांगली होते.
• फळधारणा सुधारते
अमनो ऍसिड मुळे आपल्या फळांचा दर्जा सुधारतो क्वालिटी सुधारते.
फळांना चांगला आकार येतो.
फळांची चांगली सेटिंग होते.
• फुलधारणा वाढते
झाडाला चांगली फुले लागतात.
फुले लागल्यानंतर जी फुलगळ होते ते फुलगळ थांबते.
• अन्नद्रव्यांचे शोषण
जमिनीमध्ये असणारे विविध अन्नद्रव्य यांचा शोषण करण्यासाठी अमायनो ऍसिड मुळे आपल्या पिकाला मदत मिळत असते.
एन पी के uptake वाढतो.
* अमायनो ऍसिड पिकाला देण्याची योग्य वेळ कोणती?
अमायनो ऍसिड आपण पिकाला विविध टप्प्यामध्ये विविध अवस्थेमध्ये देऊ शकतो ज्यामुळे आपल्या पिकाला चांगला फायदा होतो. ते टप्पे खालील प्रमाणे
- रोप अवस्थेमध्ये अमानव असेल पिकाला द्यावे.
- वाढीच्या अवस्थेमध्ये अमायनो ऍसिड पिकाला दिल्यास वाढ चांगली होते.
- फुलधारणीच्या वेळेस
- पिकाला फळे लागल्यानंतर.
- अति उष्णता अति पाऊस व अति थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये
वरील टप्प्यांमध्ये किंवा अवस्थेमध्ये जर आपण अमायनो ऍसिड पिकाला दिला तर त्याचा चांगला फायदा आपल्या पिकाला होऊ शकतो.
* अमायनो ऍसिड पिकाला देण्याची योग्य पद्धत कोणती?
ठिबक द्वारे - ठिबक द्वारे जर आपण अमायनो ऍसिड पिकाला सोडणार असाल तर,
"250-500 ml/ एकर "
या प्रमाणामध्ये सोडायचं आहे
स्प्रे - आणि जर अमनो ऍसिड ची फवारणी घेणार असाल तर
1-2 मिली / लिटर पाणी
या प्रमाणामध्ये त्याची फवारणी घ्यायची आहे.
*अमिनो ऍसिड पिकला देण्याची योग्य वेळ कोणती?
सकाळ 7- 11 वाजेपर्यंत अमनोसिडची फवारणी करावी
संध्याकाळी -4-7 वाजेपर्यंत अमायनो ऍसिड ची फवारणी करावी
टीप - कडक उन्हामध्ये अमायनो ऍसिड ची फवारणी घेऊ नये.
* अमायनो ऍसिड सोबत आपण काय मिसळू शकतो?
अमनोसिड देत असताना आपण त्यामध्ये विविध खत किंवा विविध अन्नद्रव्य मिक्स्चर करत असतो ते अन्नद्रव्य मिक्स करणे अगोदर त्यांची कंपॅटीबिलिटी चेक करावी.
अमनो ऍसिड सोबत खालील घटकांचा आपण विचार करू शकतो.
एनपीके खते
कीटकनाशके
बुरशीनाशके
सूक्ष्म अन्नद्रव्य
वरील घटकांचा वापर आपण अमायनो ऍसिड सोबत करू शकतो. या घटकांचं मिश्रण हे कॉम्पिटेबल आहे.
*अमायनो ऍसिड पिकाला देताना कोणती काळजी घ्यावी?
- अमिनो ऍसिड पिकला देताना त्याचा जास्त डोस देऊ नये.
- तीव्र अल्कलाइन खतांमध्ये किंवा औषधांमध्ये याचं मिक्सर करू नये.
- पावसाचे वातावरण असल्यास पावसाआधी लगेच याची फवारणी करू नये.
अमायनो ऍसिड कोणत्या पिकांसाठी उपयोगी ठरते?
सर्वच प्रकारच्या फळभाजी वर्गीय पिकांसाठी अमान्य ऍसिड उपयोगी ठरते. त्यामध्ये
द्राक्ष
केळी
टोमॅटो
मिरची
संत्री
मोसंबी
ऊस
फुलगोबी
इत्यादी व इतरही पिकांमध्ये अमायनो ऍसिड चा उपयोग आपण करू शकतो.
अमिनो ऍसिडच्या वापराचे शेड्युल
• पिकाची लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी - यामुळे आपल्या पिकाची वाढ चांगली होत असते.
• फुलोरा लागण्या अगोदर - या टप्प्यामध्ये पिकाला फुले लागण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते.
• फळे लागल्यानंतर - यावेळेस अमायनो ऍसिड वापरल्यामुळे आपल्या फळांची कॉलिटी सुधारते फळांची सेटिंग चांगली होते.
• पिकावर ती ताण आल्यानंतर - प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिकांवरती ताण येतो तो ताण सहन करण्यासाठी अमान ऍसिड मदत करते अशावेळी जर आपण अमायनो ऍसिड वापर केला तर पीक ताण सहन करू शकतात.
मित्रांनो ही आहे अमिनो ऍसिड या घटका विषयीची विस्तृत माहिती.
अशाच शेती विषयक महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या आणि फॉलो करायला विसरू नका.
https://youtu.be/xFKQYF8vUfE?si=wqpUotkeRSw4HOSp
