बोरॉन पिकामध्ये काय काम करते?
बोरॉन हा पिकासाठी अत्यंत महत्त्वाचा असा सूक्ष्म अन्नघटक आहे. जरी याची गरज आपल्या पिकाला कमी प्रमाणात लागत असली तरी पिकाच्या महत्त्वाच्या कामासाठी हा बोरॉन फार महत्त्वाचा रोल निभावतो. बोरॉन आपल्या पिकांमध्ये फुलधारणा फळधारणा मुळांच्या चांगल्या वाढ या बाबीसाठी काम करत असतो. आणि यांचा डायरेक्ट परिणाम आपल्या उत्पादनांच्या वाढीवर होत असतो.
1 *बोरॉनची पिकामध्ये महत्त्वाची कामे कोणती?🤔🤔
1- फुलधारणा वाढवणे
बोरॉन आपल्या पिकांमध्ये पिकांची चांगली वाढ झाल्यानंतर फुलधारण्या वाढवण्यासाठी मदत करत असतो. बोरॉन या अन्नद्रव्यामुळे आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीची व जास्तीत जास्त फुल लावण्यासाठी मदत होत असते प्रोत्साहन मिळत असते.
2- फुलगळ कमी करणे
बऱ्याचदा पिकामध्ये इन बॅलन्सिंगमुळे आपल्या पिकाला लागलेली फुलं ही गळतात. बोरॉन ही फुलगळ कमी करण्यासाठी मदत करत असते. बोरॉनमुळे आपल्या पिकाची फुलगळ थांबते व फुल मजबूत बनतात.
3- फळांचा आकार व गुणवत्ता सुधारते
आपल्या पिकाला फळे लागल्यानंतर त्या फळांचा चांगला आकार, चांगलं वजन,चांगला रंग, आणि चांगली चव या कामांसाठी बोरॉन फार महत्त्वाची भूमिका निभावतात. बोरांमुळे आपल्या पिकाला चांगला आकार, वजन, रंग व चव मिळत असते. त्यामुळे आपल्या फळाची गुणवत्ता सुधारते.
4- साखरेचे वहन सुधारते
आपल्या पिकांमध्ये जी साखर तयार होते त्या साखरेचं चांगलं व सुटसुटीत वहन होण्यासाठी बोरॉन मदत करत असतं. आणि त्यामुळे ही साखर आपल्या पिकांच्या सर्व भागांपर्यंत तसेच फळांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचते. आणि आपल्या फळाला चांगल्या पद्धतीचा गोडवा मिळवून देते. पिकाला चांगला गोडवा येण्यासाठी बोरॉन मदत करत असतो.
5- नवीन मुळे वाढवणे
मूळ हा आपल्या पिकाचा एक महत्त्वाचा अंग आहे. मूळ जेवढा मजबूत खोलवर आणि पसट असेल तेवढीच ताकद आपल्या पिकाला मिळत असते. कारण मूळ हे जमिनीमधून विविध अन्नघटक सूक्ष्म अन्नद्रव्य खेचून आपल्या पिकाला पोहोचवत असतात ज्यामुळे आपल्या पिकाचा सर्वांगीण विकास होत असतो. आणि याच मुलांच्या चांगल्या वाढीसाठी बोरॉन काम करत असतो. बोरांमुळे आपल्या पिकाच्या मुळांची चांगली वाढ होते.
वरील काही कामे आहे जी बोरॉन च्या मदतीने आपल्या पिकामध्ये होत असतात. त्यामुळे बोरॉन हा आपल्या पिकामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो.
* कोण कोणत्या पिकांसाठी बोरॉन फार महत्त्वाचा आहे?🍎🍉🍊
जेवढी फळवर्गीय व भाजीपाला वर्गीय पिके आहेत या सर्वांचे पिकांसाठी बोरॉन फार महत्त्वाचा घटक साबित होतो. या पिकांमध्ये महत्त्वाचे म्हणजे
- टोमॅटो
मिरची
वांगी
डाळिंब
द्राक्ष
आंबा
हरभरा
तूर
ऊस
कापूस
फ्लावर
गोबी... इत्यादी व आणखीही विविध पिकांमध्ये बोरॉन खार गरजेचा असतो.
* आपल्या पिकामध्ये बोरॉन ची कमतरता आहे हे ओळखायचं कसं?😎😎
बोरॉन ची कमतरता आपल्या पिकामध्ये निर्माण झाल्यास आपल्या पिकांमध्ये काही लक्षण दिसतात.ज्यांच्या वरून आपण ओळखू शकतो हे आपल्या पिकांमध्ये बोरॉनची कमतरता आहे. ती लक्षणे खालील प्रमाणे
• पानांच्या टोकांची वाढ थांबते.
• पिकाच्या मुळांची वाढ थांबते.
• पिकाला लागलेली फुले ही गळायला लागतात.
• नवीन पाने ही लहान व विकृत तयार होतात.
• फळे मधामधूनच तडकतात त्यांचा आकार हा विकृत तयार होतो.
• फळांमध्ये काळे डाग दिसायला लागतात.
• शेंगावर्गीय पिकांच्या शेंगा ह्या रिकाम्या राहतात पोकळ राहतात
ही वरील काही महत्त्वाची लक्षण आहे ज्यांच्या वरून आपण आपल्या पिकामध्ये बोरांची कमतरता आहे हे ओळखू शकू व लगेच त्यावर उपाययोजना करू शकू.
*बोरॉन ची कमतरता आपल्या पिकांमध्ये का भासते त्याची कारणे काय?🤔🤔
बोरॉन ची कमतरता आपल्या पिकाला भासते यामागे विविध कारणे आहेत. ती कारणे खालील प्रमाणे
• सेंद्रिय द्रव्यांची कमतरता
• जास्त पाऊस किंवा पाण्याचा निचरा न होणे
• जास्त कॅल्शियम चा वापर
• हलकी वालुकामय मै जमीन
• कोरडे हवामान
• व जास्त पीएच असणारी जमीन.
ही वरील काही कारणे आहे ज्यांच्यामुळे आपल्या पिकांमध्ये बोरांची कमतरता भासते.
*पिकाला बोरॉन देण्याची योग्य वेळ कोणती?⏰⏰
पिकाला बोरॉन देताना विविध टप्प्यांमध्ये बोरॉन दिले गेले पाहिजे. आता नेमका कोणकोणत्या टप्प्यांमध्ये हे बोरॉन आपण आपले पिकाला देऊ शकतो. तर खाली दिल्यानुसार आपण आपल्या पिकाला बोरांची मात्रा देऊ शकतो.
• फुलोऱ्या पूर्वी
फुलोरा लागण्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये जर आपण बोरॉन आपल्या पिकाला दिल. तर बोरॉन आपल्या पिकांमध्ये जास्तीत जास्त फुल धरण्यासाठी आपल्या पिकाला प्रोत्साहन देत असतो. त्यामुळे आपल्या पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा होत असते.
• फुल लागल्यानंतर
या स्टेजमध्ये बोरॉन मुख्यतः आपल्या फुलांची कॉलिटी सुधारते तसेच आपल्या पिकामध्ये फुलांची गळ होत असेल तर ती फुलगळ रोखण्यासाठी बोरॉन मदत करत असतो.
• फळ लागल्यानंतर
फळ लागल्यानंतर फळांचा आकार छोटा असतो तेव्हाच आपण बोरॉन आपल्या पिकाला दिलं गेलं पाहिजे. या टप्प्यामध्ये बोरॉन आपल्या पिकाला दिल्यामुळे आपल्या फळांची कॉलिटी दर्जा सुधारतो. फळाला चांगला आकार चांगली चव चांगला रंग या बोरॉन मुळे मिळत असतो.
*पिकाला बोरॉन देण्याची योग्य पद्धत कोणती?✅✅
पिकाला बोरॉन देण्याच्या दोन पद्धती आहे ज्यामध्ये आपण एक तर ठिबक द्वारे खालून जमिनीतून बोरवली पिकाला देऊ शकतो किंवा बोरांची फवारणी आपण आपल्या पिकावर घेऊ शकतो.
ठिबक द्वारे -
ठिबक द्वारे जर बोरॉन आपण आपल्या पिकाला देत असू तर ते बोरॉन डायरेक्टली आपल्या पिकांच्या मुळाजवळ पोहोचतं. त्यामुळे झाडाला ते बोरॉन अपघात करण्यासाठी मदत मिळते.
* ठिबक द्वारे जर बोरॉन पिकाला सोडणार असाल तर "एक ते दोन किलो प्रति एकर"
या प्रमाणामध्येच सोडायचं आहे.
* फवारणी द्वारे जर बोरॉन पिकाला देणार असाल तर
- बोरॉन 20%- एक ग्रॅम प्रति लिटर
- बोरिक ऍसिड -0.5-1 gm / liter पाणी
फुलोरा लागण्याच्या वेळेस फवारणी करावी
अशा पद्धतीने बोरॉन आपण आपल्या पिकाला देऊ शकतो.
⚠️बोरॉन पिकाला देताना कोणती काळजी घ्यावी?
बोरॉन पिकाला देत असताना ते संतुलित प्रमाणात दिले गेले पाहिजे.
• बोरॉन जास्त प्रमाणात पिकाला दिल्यास विषबाधा होऊ शकते.
• पानांच्या कडा जळतात
• पिकाची वाढ थांबते
• त्यामुळे आवश्यक मात्रे मध्येच बोरॉन पिकाला दिले गेले पाहिजे
ही आहे बोरॉन या घटका विषयीची विस्तृत माहिती.
अशा विविध शेती विषयक महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या युट्युब चॅनेल ला भेट अवश्य द्या.
व सबस्क्राईब करायला विसरू नका.
https://youtube.com/@aggroshala?si=2-fb3zF87mMJldRn
सम्बंधित ख़बरें
शेणखत चे फायदे काय व एकरी शेणखत किती टाकावे? जाणून घ्या विस्तृत माहिती!
मातीचे प्रकार व त्यानुसार कोणती पिके घ्यावीत? जाणून घ्या विस्तृत माहिती!
लोह पिकामध्ये काय काम करतो? जाणून घ्या विस्तृत माहिती!
झिंक ची कमतरता कशी ओळखावी? जाणून घ्या विस्तृत माहिती!
अमायनो ऍसिड आपल्या पिकांमध्ये काय काम करते? जाणून घ्या विस्तृत माहिती!
Powerd By Teckshop⚡
