मातीचे प्रकार ?व त्यानुसार कोणती पिके घ्यावीत?
मित्रांनो
नियोजनबद्ध शेती म्हणजे नेमकं काय?तर नियोजनबद्ध शेती म्हणजेच शेतीचा प्रकार, मातीचा प्रकार ओळखून त्यानुसार आपल्या मातीमध्ये कोणते प्रकारचे पिके ही चांगल्या पद्धतीने येऊ शकतात, उत्पादन देऊ शकतात याचा अभ्यास करून त्यामध्ये पेरली जाणारी पिके. मित्रांनो बरेचसे पिके हे वेगवेगळ्या मातींना वेगवेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्स देत असतात. म्हणजे मातीचे प्रकार ओळखून काळी माती असेल तर कोणत्या प्रकारचे पिकं घेतली गेली पाहिजेत, तांबडी असेल तर कोणत्या प्रकारची घेतली गेली पाहिजेत, गाळाची असेल तर कोणत्या प्रकारची पिके घेतली पाहिजे याविषयीची माहिती आपल्या शेतकऱ्यांना जोपर्यंत मिळणार नाही. तोपर्यंत शेतकरी पिक पेऱ्यामध्ये गल्लत करेल व त्याचा नुकसान त्याला भोगावे लागेल.
योग्य मातीमध्ये वाढले जाणारे पीक जर आपण त्या मातीमध्ये पेरले तर याचा नक्कीच फायदा आपल्याला होईल. पिकांची वाढ चांगली होईल, पिकाला उत्पादन चांगल्या पद्धतीने लागेल आणि आपला आर्थिक फायदाही चांगला होईल. त्यामुळे पिक पेरा करत असताना आपल्या मातीची "सॉईल टेस्टिंग"जरूर करा. जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आपण कोणत्या पद्धतीचे पीक आपल्या मातीमध्ये पेरली पाहिजे.
मित्रांनो खाली काही मातीचे प्रकार दिलेले आहेत त्यांची माहिती दिलेली आहे आणि त्यानुसार त्या मातीमध्ये कोणत्या पद्धतीची पीक आपण घेऊ शकतो याबद्दलची विस्तृत माहिती दिलेली आहे.
मातीचे प्रकार व त्यानुसार कोणती पिके घ्यावीत?
*मातीचे प्रकरणानुसार कोणती पिक पेरली पाहिजे?
मित्रांनो मातीचे विविध प्रकार पडत असतात. त्यामध्ये गळाची माती असेल,काळी माती असेल,तांबडी माती असेल. या सर्व मातीची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. यांच्यामध्ये असणारी घटक वेगवेगळे आहेत. त्यामुळे वेगवेगळे पिकांना या घटकांचा फायदा होत असतो.
मातीचे प्रकार व त्यानुसार कोणती पिके घ्यावीत.
1- काळी माती
काळी माती ही माती प्रकारामध्ये सर्वात सुपीक माती म्हणून ओळखली जाते. ही माती महाराष्ट्राच्या उत्तर भागांमध्ये जास्त प्रमाणात होते तसेच गंगेच्या यमुनेच्या खोऱ्यामध्येही जास्त प्रमाणात आढळते. सोबतच पश्चिम बंगालचा प्रदेश या काळा मातीने भरलेला आहे.
वैशिष्ट्ये -
A- पाणी धरून ठेवण्याची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता चांगली असते.
काळ्या मातीत हे एक मुख्य वशिष्ठ आहे. काळीमती ही ओलवा धरून ठेवण्यामध्ये पाणी धरून ठेवण्यामध्ये फार महत्त्वाचे अशी माती आहे. पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगले असल्यामुळे कमी पाण्यामध्ये ही आपण विविध पिकांची पेरा आपल्या कळ्या मातीमध्ये करू शकतो. जास्त पाण्याची आवश्यकता असणारे पीक सुद्धा आपण काळ्या मातीमध्ये योग्य सिंचनाच्या पद्धती अवलंबून त्यांची पेरणी आपण करू शकतो.
B- चिकटपणा व जडपणा जास्त असतो
काळ्या मातीमध्ये चिकटपणा हा जास्त असतो तसेच ही माती जडपणामध्ये ही भारी असते.
C- सेंद्रिय पदार्थ मध्यम प्रमाणात असतात.
सेंद्रिय पदार्थ म्हणजेच मातीचा जीव होय. जितक्या जास्त प्रमाणात आपल्या मातीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे सेंद्रिय कर्ज प्रमाणात असेल तेवढी आपली माती सुपीक म्हणून ओळखली जाते. या काळ्या मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ हे मध्यम प्रमाणात असतात. त्यामुळे नियमित शेणखत गांडूळ खत यांचा वापर करून आपण नियमातीचा दर्जा आणखी सुधारू शकतो.
* काळया मातीमध्ये कोणती पिके पेरली पाहिजे?
मित्रांनो काळ्या मातीला रिस्पॉन्स देणारे काही विविध पिके आहेत. जे की या मातीमध्ये चांगल्या पद्धतीने उत्तम पद्धतीने वाढतात व उत्पादन देऊ शकतात.
यामध्ये
- कापूस
- सोयाबीन
- गहू
- मका
- सूर्यफूल
- ऊस
या प्रकारची पिके ही आपल्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने वाढतात चांगल्या पद्धतीने बनतात त्यामुळे उत्पादनही चांगले मिळते.
Www.aggroshala.com
2) हलकी/ रेताड माती
हलकी रेताड माती मध्ये थोड्या प्रमाणात बारीक रेतीचे कण आढळतात. त्यामुळे बाकीच्या इतर मातीपेक्षा ही माती कमी सुपीक म्हणून गणली जाते. पण तरीही या मातीमध्ये ही बरेचसे पीकही चांगल्या पद्धतीने वाढतात उत्पादन देऊ शकतात. या मातीमध्ये पाण्याचा योग्य पद्धतीचा व्यवस्थापन आणि खतांची मात्र योग्य पद्धतीने दिली तर चांगले उत्पादन मिळू शकतात.
वैशिष्ट्ये -
A- पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी
या मातीमध्ये काळ्या मातीप्रमाणे पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही चांगल्या पद्धतीची राहत नाही. त्यामुळे या मातीमध्ये वारंवार पाण्याची मात्र, सिंचन करावा लागत. पाण्याची कमतरता बसल्यास पिकाण्याचा फटका बसू शकतो.
B- पोषक घटकांची कमतरता
जमिनीमध्ये विविध सूक्ष्म अन्नद्रव्य सूक्ष्म घटक असतात जे की आपल्या पिकाला वाढीमध्ये फळधारणे,फलधारणेमध्ये मदत करत असतात. या पोषक घटकांची मात्र जर जमिनीमध्ये चांगली असली तर आपल्या पिकाला याचा फायदा होतो. मात्र या घटकांची कमतरता असल्यास पिकलाही घडते बाहेरून द्यावी लागतात दीपक द्वारे किंवा स्प्रे द्वारे आपल्या पिकाला द्यावे लागतात. या पोषक घटकांची कमतरता ही हलक्या / रेताड मातीमध्ये कमी असते.
मातीचे प्रकार व त्यानुसार कोणती पिके घ्यावीत?
*हलक्या रेताड मातीमध्ये कोणती पिके घेतली पाहिजे?
हलकी व रेताड माती हे कमी सुपीक असली तरी या मातीमध्ये ही बरेचसे काही चांगल्या पद्धतीने घेतली जातात. या पिकांना योग्य सिंचन व खतांची मात्र दिल्यास चांगलं उत्पादन आपल्याला या मातीमध्येही घेता येत. या माहितीमध्ये खालील पिकांची लागवड आपण करू शकतो.
- भुईमूग
- खरबूज
- कलिंगड
- कांदा
- गाजर
3) गाळाची माती
वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रवाहानुसार इतर भागातील धूप होऊन वाहून आलेली जी माती आहे ती माती एका ठिकाणी साचणे यास मातीला गाळाची माती म्हणतात.
ही काळाची माती शक्यतो मोठमोठ्या नद्यांच्या किनारी भागात आढळते. गंगा नदीचा प्रदेश, ब्रह्मपुत्रा नदीचा प्रदेश या भागांमध्ये गडाच्या मातीचे प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे. ही माती चांगल्या पद्धतीची व सुपीक माती म्हणून गणली जाते.
वैशिष्ट्ये -
A- चांगली सुपिकता
पाण्याची धूप होऊन हल्ली माती तसेच नदीमध्ये वाहून आलेली माती हे माती म्हणजेच गाळाची माती होय. या मातीमध्ये पाण्यासोबत विविध सेंद्रिय घटक, पाला पाचोळा वाहून आलेला असतो व या मातीमध्ये साचलेला असतो. त्यामुळे ही माती सुपीक त्याच्या बाबतीत उच्च दर्जाची गणली जाते. कारण यावती मध्ये ह्युमसचे प्रमाणही चांगल्या पद्धतीची व जास्त प्रमाणात असते.
B- पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली
गळ्याच्या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही चांगली असते. त्यामुळे या मातीमध्ये पिक पेरा केल्यानंतर वारंवार पाणी देण्याची आवश्यकता भासत नाही. कमी पाण्यामध्ये ही या मातीमध्ये चांगल्या पद्धतीचे उत्पादन आपण घेऊ शकतो.
C- किनारी भागात आढळते
वरती सांगितल्याप्रमाणेच गाळाची मतिमंदित नदीने पाण्याने वाहून आलेला गाळ होय. त्यामुळे या मातीचा आढळ हा शक्यतो किनारी भागामध्ये नद्यांच्या प्रदेशांमध्ये आढळतो.
*गाळाच्या मातीमध्ये कोणत्या प्रकारची पिके घेतली पाहिजे?
गळ्याच्या मातीमध्ये आपण विविध प्रकारची पिके घेऊ शकतो. कमी पाणी लागणारी पिके असो किंवा जास्त पाणी लागणारे पिके असतो दोन्ही प्रकारची पिके आपण या काळाच्या मातीमध्ये घेऊ शकतो. यामध्ये
-ऊस
- तांदूळ
- गहू
- भाजीपाला
- फळपिके
- मका
वरील प्रकारची पिके आपण गळ्याच्या मातीमध्ये घेऊ शकतो. काळाच्या मातीमध्ये या पिकांची पेरणी केल्यास चांगली उत्पादनही मिळू शकते.
4) लाल/ तांबडी माती
या मातीच्या नावावरून आपल्या लक्षात आले असेल की ही माती कोणत्या प्रकारची माती आहे. लाल माती ही रंगाने लालसर दिसते. या मातीमध्ये लोहाचे प्रमाण हे जास्त प्रमाणात असते त्यामुळेच या मातीला लाल रंग मिळतो. लाल माती ही कमी सुपीक असून खतांना चांगला रिस्पॉन्स देणारी माती आहे. म्हणजेच या मातीमध्ये विविध पिकांची पेरणी करून त्यांना जर खत योग्य पद्धतीने योग्य वेळी दिली तर चांगले उत्पादन आपल्याला मिळू शकत.
वैशिष्ट्ये
A- लाल रंग
या मातीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे या मातीला रंग लाल रंग येतो. लोहाच्या अधिक प्रमाणामुळेच माती लाल दिसू शकते.
B- भुसभुशीत असते
ही माती सुभिकतेच्या बाबतीत थोडी हलकी असली तरी भुसभुशीत मात्र चांगल्या पद्धतीची असते. त्यामुळे योग्य मशागत घेऊन योग्य पद्धतीची पिके जर आपण या मातीमध्ये पेरली, लागवड केली तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकत.
* लाल मातीमध्ये कोणत्या प्रकारची पिके पेरली पाहिजे?
लाल माती ही सुपीकतेच्या बाबतीत थोडी कमी असली तरी योग्य मशागत आणि योग्य पिकांची पेरणी हे गणित जर जुळलं तर आपल्याला या माध्यमातूनही चांगलं उत्पादन मिळू शकतो. या मातीमध्ये विविध पिकांची चांगली वाढ होते व त्यांना चांगली उत्पादन लागत. त्यामध्ये
- बाजरी
- नाचणी
- काजू
- शेंगदाणा
- उडीद
- मूग
मातीचे प्रकार व त्यानुसार कोणती पिके घ्यावीत?
वरील प्रकारचे पिकांची पेरणी जर आपण लाल मातीमध्ये केली तर डीपी के लाल मातींना चांगला रिस्पॉन्स देतात. याची चांगली वाढ होते व यांना चांगले उत्पादन लागत.
मातीचे प्रकार व त्यानुसार कोणती पिके घ्यावीत?
तर मित्रांनो वरील दिल्याप्रमाणे हे काही मातीचे प्रकार आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या पिकांची पेरणी करू शकतो लागवड, करू शकतो. योग्य मातीमध्ये योग्य पिकांची लागवड केल्यास आपल्याला खर्चही कमी लागतो मेहनतही कमी घ्यावी लागते व आपल्याला उत्पादनही चांगले मिळू शकत. त्यामुळे आपल्या मातीची "सॉईल टेस्टिंग" जरूर करा.जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आपल्या मातीमध्ये कोण कोणते घटक चांगले आहे? कोण कोणते घटक कमी आहेत? आपल्या मातीचा प्रकार कोणता आहे? व त्यानुसार आपण कोणत्या पिकांची पेरणी आपल्या मातीमध्ये करू शकतो.
या प्रकारची शेती विषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला अवश्य भेट द्या व सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🙏🙏🙏
https://youtube.com/@aggroshala?si=aGRfRGyutBTwCLYB
सम्बंधित ख़बरें
शेणखत चे फायदे काय व एकरी शेणखत किती टाकावे? जाणून घ्या विस्तृत माहिती!
लोह पिकामध्ये काय काम करतो? जाणून घ्या विस्तृत माहिती!
झिंक ची कमतरता कशी ओळखावी? जाणून घ्या विस्तृत माहिती!
अमायनो ऍसिड आपल्या पिकांमध्ये काय काम करते? जाणून घ्या विस्तृत माहिती!
बोरॉन पिकामध्ये काय काम करते? जाणून घ्या विस्तृत माहिती!
Powerd By Teckshop⚡
