माती परीक्षण महत्त्व व फायदे?

माती परीक्षण महत्त्व व फायदे? जाणून घ्या विस्तृत माहिती!

माती परीक्षण महत्त्व व फायदे?  जाणून घ्या विस्तृत माहिती!
माती परीक्षण महत्त्व व फायदे?

शेती करत असताना फक्त पेरणी करणे व सोगणी करणे म्हणजेच शेती नव्हे. शेती बद्दलची संपूर्ण माहिती घेऊन विस्तृत माहिती घेऊन आपल्या शेतीमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे कोणते घटक जास्त आहे याबद्दलची सर्वांगीण माहिती घेऊनच नंतर पीक पेरा करणे म्हणजेच शेती होय. आपल्या शेतामध्ये कोणत्या घटकांची उपलब्धता आहे? व कोणते घटक उपलब्ध नाही?आपल्या जमिनीचा पोत कसा आहे?, जमिनीचा मातीचे नेचर कसा आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला कशी मिळणार?. तर ही सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आपल्याला माती परीक्षणातून. माती परीक्षण केल्याने आपल्याला आपल्या जमिनी विषयीची संपूर्ण विस्तृत माहिती मिळते. व आपल्या मातीच्या गुणधर्मानुसार आपण त्यामध्ये पिकांची निवड करतो फिरतो त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये भर पडते. त्यामुळे माती परीक्षण हे फार महत्त्वाचे आहे.

* माती परीक्षण म्हणजे काय?


आपल्या शेतातील विविध भागातील माती जमा करून ती माती प्रयोगशाळेमध्ये टेस्ट करून त्या मातीतील घटका विषयीची माहिती मिळवणे म्हणजे माती परीक्षण. या माती परीक्षणातून आपल्याला आपल्या मातीमध्ये कोणते घटक जास्त प्रमाणात आहे? कोणते घटक कमी प्रमाणात आहे?मातीचा गुणधर्म कसा आहे?सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध आहेत का नाही? या प्रश्नांची उत्तरे मिळतात. यालाच आपण माती परीक्षण म्हणत असतो.


* माती परीक्षणाचे महत्त्व काय आहे?


माती परीक्षण हा आधुनिक शेती करत असतानाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. त्याच्याशिवाय आपण चांगल्या उत्पादनाची भर आपल्या शेतामध्ये पाडू शकत नाही. माती प्रश्नाचे महत्त्व नेमकं काय तर ते खालील प्रमाणे..

1) जमिनीची सुपीकता समजते


- माती परीक्षण केल्यामुळे आपल्याला आपली जमीन किती सुपीक आहे याबद्दलची माहिती मिळते. आपल्या जमिनीमध्ये विविध पोषक घटकांपैकी कोणते घटक उपलब्ध आहे कोणते घटक उपलब्ध नाहीत. तसेच ते किती प्रमाणात उपलब्ध आहेत. व बाहेरून त्यांना किती मात्र आपण आपल्या शेतामध्ये टाकू शकू याबद्दलची विस्तृत माहिती आपल्याला माहिती परीक्षणातून समजत असते.

2) खताचे नियोजन लक्षात येतं.


- आपण सर्वच शेतकरी बांधव शेती करत असताना शेतामध्ये ढोबळमानाने खत टाकत असतो. पण जेव्हा आपल्या लक्षात येईल की आपल्या शेतामध्ये कोणत्या घटक उपलब्ध आहे व कोणता नाही. तेव्हा आपण उपलब्ध नसलेल्या घटकांचीच मात्र आपल्या शेतामध्ये टाकत असतो. त्यामुळे अतिरिक्त खताचा खर्चही वाचतो सोबतच खताचं योग्य वापर होऊन खत व्यवस्थापन चांगलं होतं.

3) उत्पादनात वाढ होते


- पिकांना आवश्यक असलेल्या घटकांची पूर्तता केल्यामुळे, योग्य ते खात व्यवस्थापन केल्यामुळे पिकाला याचा फायदा होतो. परिणामी आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते.

4) जमिनीचे आरोग्य बिघडत नाही.


- बऱ्याचदा आपल्या शेतामध्ये पोषक घटकांपैकी किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी काही घटक हे मोठ्या प्रमाणात असतात. तरीही रासायनिक खतांच्या माध्यमातून आपण तेच तेच घटक परत परत शेतामध्ये फेकत असतो. यामुळे हे अतिरिक्त पडलेलं जे खत आहे हे रासायनिक गुणधर्म आपल्या जमिनीचा पोत बिघडवत. मात्र माती परीक्षण केल्यामुळे आपण हवं तेवढंच खत आपल्या शेतामध्ये टाकत असतो. व त्यामुळे आपली जमीन ही आरोग्यदायी राहते. म्हणजेच जमिनीचा आरोग्य बिघडत नाही.

5) पिकांची निवड सोपी होते.


- माती परीक्षणातून आपल्याला आपल्या मातीचा गुणधर्म कळत असतो. माती कोणत्या पिकांना जास्त प्रोत्साहन देऊ शकते किंवा कोणती पिकं आपल्या शेतामध्ये जास्त चांगल्या पद्धतीची वाढू शकतात व उत्पादन देऊ शकतात. याविषयीची माहिती आपल्याला माती परीक्षणातून मिळत असते. त्यामुळे आपल्याला पीक निवडीसाठी फायदा होतो. त्यामुळे आपल्या उत्पादनात भरही पडते.

6) पाण्याची योग्य नियोजन होते.


- माती परीक्षणातून आपल्या लक्षात येते की आपली जमिनी ही पाणी धरून ठेवणारी आहे किंवा पाणी धरून ठेवत नाही. म्हणजेच पाणी दिल्यानंतर किती काळ ओलावा आपल्या जमिनीमध्ये टिकून राहतो याविषयीची माहिती आपल्याला माती परीक्षणातून समजते. त्यामुळे सिंचन करत असताना आपण योग्य पद्धतीने आपल्या पिकाला सिंचन करू शकतो. परिणामी योग्य सिंचन होतं झाडांची वाढ चांगली होते व आपल्याला उत्पादन हे चांगलं भेटतं तसेच पाण्याचा अपव्यय ही टळतो.


Www.aggroshala.com

* माती परीक्षणाचे फायदे काय आहेत?


माती परीक्षणामुळे आपल्याला विविध फायदे होत असतात ते फायदे खालील प्रमाणे,

1) अतिरिक्त खतांचा खर्च वाचतो.
- माती परीक्षण केल्यामुळे आपल्याला लक्षात येते की आपल्या शेतामध्ये नेमक्या कोणत्या खतांची मात्रा टाकणे आवश्यक आहे. त्यामुळे हवं ते कळतच आपण शेतामध्ये टाकतो व अतिरिक्त जे खत आपण शेतामध्ये टाकत असतो त्याचा खर्च आपला वाचतो.

2) रोगांचा प्रादुर्भाव वाढत नाही
योग्य वेळी योग्य खते दिल्यामुळे. तसेच योग्य पोषक घटकांची कमतरता पूर्ण केल्यामुळे पिकामध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढत नाही. व पीक हे निरोगी राहत.

3) पिकांची गुणवत्ता सुधारते.
माती परीक्षणातून आपल्याला आपल्या जमिनीचा गुणधर्म कळत असतो. त्यानुसारच आपण पिकाची निवड करतो. सोबतच योग्य पिकाला योग्य हवा असलेलं खत, न्यूट्रिएंट्स आपण देत असतो. त्यामुळे पिकांची गुणवत्ता सुधारते.

4) सेंद्रिय शेतीमध्ये मदत होते
माती परीक्षणातून आपल्याला आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय घटकांची उपलब्धता लक्षात येते. सेंद्रिय कर उपलब्ध आहे की नाही हे लक्षात येते. त्यामुळे शेणखत किंवा गांडूळ खत हे केव्हा टाकायचं किती टाकायचं याविषयीचा अंदाज आपल्याला येतो व त्यामुळे आपली सेंद्रिय शेतीमध्ये मदत होते.

5) जमिनीची" पीएच "नियंत्रणात राहतो.
माती परीक्षणामुळे आपल्या जमिनीचा पीएच जास्त आहे का कमी आहे हे आपल्या लक्षात येते. त्यामुळे तो पीएच बॅलन्स करण्यासाठी आपण उपाययोजना करू शकतो. आणि म्हणून आपल्या जमिनीचा पीएच हा नियंत्रणात राहतो.



* माती परीक्षणामध्ये कोणत्या बाबी तपासल्या जातात
?


- माती परीक्षणातून आपल्या माती विषयीची विविध घटक याविषयीची माहिती आपल्याला मिळत असते. कोण कोणत्या घटकांची माहिती आपल्याला मिळते तर ते खालील प्रमाणे -

A- मातीचा "ph" लक्षात येतो.
B- "सेंद्रिय कर्ब "चे प्रमाण कळते.
C- नत्र( nitrogen)
D- स्फुरद ( phosphate )
E- पालाश ( potash)
F- micronutrients
-zink, iron, boron....
G- जमिनीची "क्षारता "लक्षात येते

वरील गोष्टींची तपासणी माती परीक्षणातून होत असते.

* माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कसा घ्यावा?

माती परीक्षण महत्त्व व फायदे
- माती परीक्षणासाठी माती गोळा करताना शेतातील विविध भागांतील थोडी थोडी माहिती जमा करावी.
- ही माती वरच्यावर जमा न करता जमिनीमध्ये खोलवर 7 ते 8 इंच पर्यंत खोलीतील माती जमा करावी.
- सर्व माती एकत्र करून अर्धा किलो चा नमुना तयार करावा.

* माती परीक्षणाचा नमुना कोणत्या ठिकाणी तपासावा?

- आपल्या जिल्ह्याचे किंवा तालुक्याच्या ठिकाणी कृषी विभागाचे असलेल्या लॅबोरेटरी मध्ये माती परीक्षण करावे
- खाजगी माती परीक्षण केंद्रामध्ये ही आपण माती परीक्षण करू शकतो.
- विविध कृषी विद्यापीठामध्ये ही माती परीक्षण करून मिळते.


निष्कर्ष :- माती परीक्षण हा शेती करतानाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. याशिवाय आपण चांगल्या पद्धतीची व आधुनिक शेती करू शकत नाही. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या मातीची माती परीक्षण नक्की करावी. त्यामुळे आपल्याला आपल्या मातीचा गुणधर्म कळतो, मातीमध्ये उपलब्ध असणारे विविध घटक कळतात. व त्यामुळे आपण आपल्या पिकाचे योग्य नियोजन योग्य व्यवस्थापन करू शकतो. अर्थात आपल्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते.


माती परीक्षण महत्त्व व फायदे?
माती परीक्षण महत्त्व व फायदे?
माती परीक्षण महत्त्व व फायदे?



** अशा शेती विषयक महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या व सबस्क्राईब करायला विसरू नका!!🙏🙏🙏🙏

https://youtube.com/@aggroshala?si=gP2q1nZQW5uow90N

Sunil

Sunil

“मी सुनील, या वेबसाईटचा मालक. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि शेतीसंबंधित माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे.”