मान्सून 2026.

मान्सून 2026. जाणून घ्या विस्तृत माहिती!

मान्सून 2026

 

मान्सून 2026
मान्सून 2026.

मित्रांनो जून चा पहिला हप्ता समाप्त होत आहे तरीही महाराष्ट्र मध्ये अजूनही बऱ्याचश्या भागांमध्ये मान्सूनचा पाऊस आलेला नाही. मात्र मान्सून आता तोंडावर झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रभर पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
सध्या महाराष्ट्रात 2026 चा नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झालेला आहे. सात जून च्या नंतर जेम ते महाराष्ट्रभर या मान्सूनचा पाऊस पडेल.

* महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये मान्सूनचा पाऊस केव्हा पोहोचेल?
– महाराष्ट्र सर्व भागांमध्ये मान्सून पोचण्यासाठी थोडा वेळ लागतो. तरी वेगवेगळ्या वेळेनुसार महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मान्सून पोहोचणार आहे.
– कोकण व मुंबई – 10 जून पर्यंत
– मराठवाडा विदर्भ- 15 ते 20 जून पर्यंत
– पुणे व पश्चिम महाराष्ट्र- 15 जून पर्यंत
– व उर्वरित संपूर्ण महाराष्ट्र – जूनच्या शेवटच्या हप्त्यांपर्यंत.
अशा पद्धतीने वेगवेगळ्या दिनांका नुसार महाराष्ट्रभर माणसांचा पाऊस पोहोचणार आहे.

http://Www.aggroshala.com

* मान्सून 2026 च्या पावसाचा अंदाज काय आहे?
– 2026 या वर्षीचा मान्सून हा थोडासा उशिरा महाराष्ट्र मध्ये दाखल झालेला आहे. विविध हवामान तज्ज्ञांची अनुसार जेमतेम दरवर्षीप्रमाणे सरासरी चांगला पाऊस महाराष्ट्र मध्ये पडेल. तरी काही हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्र मध्ये दरवर्षी प्रमाणे व सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कमी पावसाच्या प्रमाणामागे “एल-नींनो” चा प्रभाव कारणीभूत ठरू शकतो.

* 2026 च्या मान्सूनचा शेतीवर काय परिणाम होऊ शकतो?
– पेरनि साठी जून मधला पाऊस हा फार महत्त्वाचा पाऊस असतो. जेमतेम सरासरी पाऊस पडल्यास सर्व पिकांना योग्य अशी पेरण्या जोगी ओल मिळेल. व पेरणी ही सुखरूप होईल. सोयाबीन, कापूस, मका या खरीप पिकांसाठी जूनमधील पाऊस हा फार महत्त्वाचा असतो.

* पेरणी करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी?
– मान्सून 2026 चा पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करताना खालील काळजी घ्यावी.
@ पेरणी करताना पुरेसा पाऊस पडलेला आहे ना याची खात्री करावी.
@ कमी पावसाच्या प्रमाणामुळे सिंचनाचे सुविधा उपलब्ध करून ठेवाव्यात.
@ हवामान अंदाजानुसार आपल्या पेरणीची नियोजन करावे.
@ सरकारच्या हवामान खात्यानुसार दिलेल्या गाईडलाईन फॉलो कराव्यात.
@ व पेरणीची घाई करू नये.

* मान्सून 2026 उष्णतेची स्थिती काय असेल?
– मान्सूनच्या आगमनानंतर सावकाश सावकाश जुलैपर्यंत उष्णतेची लाट ही नाहीशी होईल. व जून नंतर वातावरणामध्ये थंडावा निर्माण होईल. मात्र काही भागांमध्ये जून नंतरही उष्ण व दमट वातावरण तसेच राहण्याची शक्यता आहे.

* शेतकऱ्यांसाठी सूचना
– पेरणीसाठी बी बियाणे व खतांची भरणी करून ठेवावी.
– पहिल्या पावसानंतर लगेच पेरणी न करता एक ते दोन पाऊस पडू द्यावे व नंतर पेरणी करावी.
– महाराष्ट्र हवामान खात्याने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
– कमी पावसाची शक्यता असल्यास आपल्या पिकांसाठी पाण्याचा नियोजन करून ठेवावे.
– व शक्यतोवर कमी कालावधीमध्ये व कमी पावसामध्ये येणाऱ्या पिकांची पेरणी /लागवड करावी.

महाराष्ट्र मध्ये” मान्सून 2026 ” फार महत्त्वाचा ठरणार आहे. सुरुवातीला पावसाचे प्रमाण हे कमी ते मध्यम स्वरूपाचा राहील. मात्र नंतर सरासरी प्रमाणे चांगला पाऊस पडण्याची शक्यता महाराष्ट्र मध्ये आहे. शेतकऱ्यांनी पेरणी करताना घाई न करता योग्य प्रकारचा पाऊस पडल्यानंतरच आपल्या पिकांची पेरणी करावी.

अशा शेती विषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 🙏🙏🙏

https://youtube.com/@aggroshala?si=nmNtfKE2_uNTgrv4

धन्यवाद🙏🙏

Sunil

Sunil

“मी सुनील, या वेबसाईटचा मालक. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि शेतीसंबंधित माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे.”