बीज प्रक्रिया कां महत्वाची असते? जाणून घ्या विस्तृत माहिती!
मित्रांनो
पिकाची पेरणी करत असताना फक्त बी पेरणी आणि त्याला खत टाकणे फक्त ही प्रक्रिया म्हणजेच पेरणी नव्हे. पिकांची पेरणी करत असताना त्या पिकाच्या उगवणीकडे चांगला लक्ष दिले गेले पाहिजेत आणि ही उगवण चांगली होण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणे फार महत्त्वाचे असते. बीज प्रक्रिया म्हणजेच बी उगुन येण्याचे अगोदर पासूनच आपण पिकाची घेत असलेली काळजी होय. योग्य बीज प्रक्रिया केल्यामुळे बी हे जमिनीमध्ये कुजत नाही सोडत नाही व पिकाला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये चांगली वाढ मिळते,झाड मजबूत सशक्त बनंत,मुळे ही चांगले बनतात. यामुळे आपल्या उत्पादनामध्येही फरक पडतो.
* बीज प्रक्रिया कां महत्वाची आहे?
बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्या पिकाला विविध फायदा होत असतात. पिकाच्या उगवण पासून तर पिकाच्या वाढीपर्यंत, मजबूतपणापर्यंत व पिकाला उत्पादन किंवा फळे चांगला लागण्यापर्यंत अशी विविध फायदे आपल्याला बीजप्रक्रियेमुळे होत असतात.
ते फायदे खालील प्रमाणे
1- बियाची उगवण चांगली होते.
बीज प्रक्रिया केल्यामुळे बी हे जमिनीमध्ये सुरक्षित राहतं. बियाची अंकुरण्याची क्षमताही वाढते. व त्यामुळे बियांचे उगवण चांगली होऊन सर्व उगवण ही एक समान होते.
2- सुरुवातीची वाढ चांगली होते
बी हे सुखरूप रित्या जमिनीच्या वरती आल्यानंतर त्याला अंकुर फुटल्यानंतर त्या आरोग्याची किंवा त्या रोपाची वाढ चांगली होते. सुरुवातीला वाढ चांगली झाल्यामुळे बी नंतरही चांगल्या पद्धतीची वाढ धारण करता आणि मजबूत बनत,सशक्त बनत.
3- बुरशी किटकांपासून संरक्षण मिळतं.
जमिनीमध्ये विविध प्रकारच्या बुरशी असतात किंवा कीटक असतात या बुरशी व कीटक जेव्हा आपण आपलं बी जमिनीमध्ये टाकतो तेव्हा त्या बियाला पोखरून घेतात किंवा खाऊन टाकतात. त्यामुळे आपलं बरस बी वाया जातं बी नीट नेटके उगवत नाही, एकसमान उगवन होत नाही. मात्र बीज प्रक्रिया केल्यामुळे या बुरशी वकीलकांपासून आपल्या पिकाचे संरक्षण होतं बियांचा संरक्षण होतं.
4- खतांचा योग्य शोषण.
झाडाची योग्य उगवण व चांगली वाढ यासाठी बीज प्रक्रिया फार महत्त्वाची असते. या वीज प्रक्रियेमुळे झाडाची वाढ चांगली होते व सशक्त होते. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण आपल्या झाडाला पिकाला खत टाकू तेव्हा हे खत योग्य पद्धतीने शोषून घेण्याची आपल्या झाडाची क्षमताही वाढते. त्यामुळे खतांची मात्र दिल्यानंतर खत वाया न जाता ती योग्य पद्धतीने आपल्या पिकांपर्यंत पोहोचत.
5- ताण सहन करण्याची क्षमता वाढते.
बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्या पिकाला जेवढी चांगली वाढ जमिनीच्या वरती मिळते तेवढीच चांगली वाढ जमिनीच्या खालीही मिळते. म्हणजेच जस झाड चांगलं वाटतं तसं झाडांची मुळे ही चांगली व मजबूत वाढतात. त्यामुळे विविध प्रतिकूल परिस्थितीमध्ये ताण सहन करण्याची क्षमता आपल्या पिकाची सुधारते.
6- खर्चामध्ये बचत होते.
विविध कीटकांपासून बुरशी बसून आपल्या बियाचा संरक्षण होतं, उगवन चांगले झाल्यामुळे लवकर विविध कीटकांचा अटॅक होत नाही. त्यामुळे एकंदरीतच आपलं पीक चांगलं राहतं उत्पादन वाढत. तसेच या पिकाला जास्त पद्धतीचे कीटकनाशक किंवा विविध खत वापराची गरज पडत नाही त्यामुळे आपला खर्चही वाचतो.
अशा पद्धतीने बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्या पिकाला बीज प्रक्रियेचे विविध फायदे होत असतात ज्यामुळे आपल्या खर्चामध्ये बसत होते व आपल्या उत्पादनामध्ये वाढ होत असते.
* बीज प्रक्रियेचे कोणते प्रकार पडतात?
बीज प्रक्रिया करत असताना या प्रक्रियेचे विविध प्रकार पडत असतात. त्यामध्ये काही रासायनिक प्रकार आहे काही भौतिक आहे तसेच काही जैविक बीज प्रक्रियेचे प्रकारही आहेत. आपण नेमके कोणते पिकांची लागवड करतोय किंवा कोणत्या बियांची पेरणी करतोय याच्या प्रकारावरून किंवा मातीचे प्रकारावरून आपण विविध प्रकारच्या बीज प्रक्रिया आपल्या बियांना करू शकतो. या बीज प्रक्रिया चे प्रकार नेमके कोणते तर ते खालील प्रमाणे
1- रासायनिक बीज प्रक्रिया.
या प्रकारच्या बीज प्रक्रिया करत असताना विविध रासायनिक घटकांचा वापर केला जातो. हे रासायनिक घटकामध्ये आपल्या बियांना योग्य पद्धतीने मिक्स्चर केलं जातं. ज्यामुळे हे रासायनिक घटक आपल्या बियांना चांगल्या पद्धतीचे लागतात व आपल्या बियांवरती रासायनिक घटकांचा आवरण चढतो. त्यामुळे जमिनीमध्ये पडल्यानंतर या बियांना बुरशी लागत नाही किंवा विविध कीटक खात नाहीत.
यामध्ये आपण
- बुरशीनाशके
- कीटकनाशके
या रासायनिक घटकाचा वापर आपण करत असतो.
2-जैविक बीज प्रक्रिया
या प्रकारची बीज प्रक्रिया करत असताना आपण विविध जैविक घटकांचा वापर करत असतो. हे जैविक घटक आपल्या बियाणांचं पिकाचे संरक्षण करतात. तसेच हे जरी घटक आपल्या पिकासाठी उपकारक असतात उपयोगी पडत असतात त्यामुळे आपल्या बियांची उगवण चांगली होते वाढी चांगली होते
यामध्ये आपण
- ट्रायकोडर्मा
- रायझोबियम
-PSB - फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया
या प्रकारच्या जैविक घटकांचा वापर बीजप्रक्रिया करत असताना करत असतो.
3- भौतिक बीज प्रक्रिया
- या प्रकारच्या बीज प्रक्रिया करत असताना आपण कोणतेही जैविक किंवा रासायनिक घटक न वापरता साधारण प्रक्रियेने आपल्या बियांची बीज प्रक्रिया करत असतो. ज्यामध्ये आपण
- बी गरम पाण्यात भिजत घालणे
- बी सूर्यप्रकाशात वाळत घालणे
- बियाची चाळण करणे
या प्रक्रिया आपण करत असतो.
* बीज प्रक्रिया करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे?
- बीज प्रक्रियेमध्ये वरील तीन प्रकार पडतात या तीनही प्रकारातील बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला काही नियम पाळायचे आहे. ज्यामध्ये जर कमी जास्त प्रमाण झालं तर आपल्या "बीयाला" याचा फटका बसू शकतो "बी "खराब होऊ शकत.
बीज प्रक्रिया करत असताना रासायनिक घटकांचा अति वापर झाल्यास बी हे खराब होऊ शकतो. तसेच भौतिक बीज प्रक्रिया करत असताना आपण जर बी जास्त वेळ पाण्यात भिजू घातलं तरीही आपल्या बियाला त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे बीज प्रक्रिया करत असताना योग्य पद्धतीची व योग्य प्रमाणेच बीज प्रक्रिया करावी.
- रासायनिक घटकांचा संतुलित वापर करावा
- बियाणे कडक उन्हात न वाळू घालतात सावलीमध्ये किंवा कोवळ्या उन्हामध्ये वाळू घालावेत.
- वेगवेगळ्या प्रकारची बीजप्रक्रिया करत असताना ती स्पेशल व वेगवेगळी करावी.
- बीज प्रक्रिया करत असताना रासायनिक घटक आपल्या डोळ्यांमध्ये उडणार नाही याची काळजी घ्यावी.
- हात मोजे व तोंडाला रुमाल बांधावा.
अशा प्रकारची काळजी आपण बीज प्रक्रिया करताना घेऊ शकतो.
अंतिमतः -
बीज प्रक्रिया ही आपल्या पेरणीच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. ज्यामुळे आपल्याला पिकाच्या वाढीपासून तर सोंगणी पर्यंत त्याचे फायदे होत असतात. बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्या पिकाची प्राथमिक वाढ चांगली होते, पिकाचा आरोग्य सुधारतं व पिकाला उत्पादनही चांगलं लागतं. त्यामुळे पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करायला विसरू नका.
अशा शेती विषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🙏🙏
https://youtube.com/@aggroshala?si=75AqeDCkNK8xGojo
