"एल निनो" व "ला नीना" म्हणजे काय? महाराष्ट्र व भारताच्या पर्जन्यावर काय परिणाम होऊ शकतो?
"एल निनो" व "ला नीना" म्हणजे काय?
सध्या महाराष्ट्रभर एल निनो व ला नीना या दोन संकल्पनांची चर्चा चालू आहे.
*एल नेनो व लानीना म्हणजे काय?
- "एल निनो" व "ला नीना" हे प्रशांत महासागरातील तापमानाच्या दाबानुसार जगभरात निर्माण होणारे दोन मान्सूनचे प्रकार आहेत. प्रशांत महासागरातील तापमान दाबाच्या स्थितीमुळे जगभरात होणारे पावसाचे प्रमाण कमी जास्त होते. त्यात संदर्भातील या दोन संकल्पना आहे. या संकल्पनांचा थेट प्रभाव हा भारतातील पर्जन्यावर तसेच हवामानावर व शेतीवरही होतो.
* "एल निनो" म्हणजे काय?
- जेव्हा मध्य व पूर्व प्रशांत महासागरातील पाणी हे नेहमीपेक्षा जास्त गरम किंवा उबदार असतं तेव्हा "एल निनो" या प्रकारचं वातावरण तयार होतं. ज्याचा थेट परिणाम भारतीय पर्जन्यावर व भारतीय हवामानावर तसेच कृषीवरही होतो.
"एल निनो" या संकल्पनेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती?
या संकल्पनेचे मुख्य वैशिष्ट्ये ही खालील प्रमाणे आहेत त्यानुसार,
- भारतात मान्सून हा कमी प्रमाणात पडतो.
- पाऊस हा कमी किंवा फार उशिरा पडू शकतो.
- पावसाची वेळ चुकल्यामुळे वातावरणामधली दाहकता, तापमान हे वाढू शकत.
- परिणामी दुष्काळ पडण्याची शक्यता वाढते.
- पाऊस कमी किंवा उशिरा पडल्यामुळे खरीप पिकांना धोका निर्माण होतो.
"एल निनो" व "ला नीना" म्हणजे काय? महाराष्ट्र व भारताच्या पर्जन्यावर काय परिणाम होऊ शकतो?
* "एल निनो" चे भारतावर काय परिणाम होतात?
या वातावरणीय संकल्पनेचा भारताच्या पर्जन्यावर हवामानावर व कृषी वर थेट परिणाम होतो. तो खालील प्रमाणे -
- खरीप पिक यांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
- मका ऊस कापूस तुर या पिकांवर चा नकारात्मक परिणाम होतो.
- भारतामध्ये मान्सून उशिरा आल्यामुळे पेरणी ही उशिरा होऊ शकते.
- या सर्व कारणांमुळे कृषी उत्पादन घटू शकते व कृषीला बाह्य सिंचनाची आवश्यकता भासू शकते.
* ला नीना म्हणजे काय?
- "ला निना" ही स्थिती एलिनो या स्थितीच्या एकदम उलट असते. ज्यामध्ये प्रशांत महासागरातील पाणी हे नेहमीपेक्षा जास्त गार असते. ज्यामुळे पर्जन्यमानामध्ये वाढ होऊन त्याचा परिणाम भारताच्या पर्जन्यावरही होतो.
* "ला निना" या स्थितीची मुख्य वैशिष्ट्ये कोणती?
लहाने ना या स्थितीची मुख्य वैशिष्ट्ये ही खालील प्रमाणे दिलेली आहेत ज्यामध्ये
- भारतात मान्सूनचा पाऊस हा जास्त प्रमाणात पडू शकतो.
- जास्त पावसाचं वातावरण असल्यामुळे पुरांची स्थिती निर्माण होऊ शकते.
- वातावरण थंड राहतं व तापमान ही कमी होतं.
- रब्बी पिकांना फायदा होतो.
"एल निनो" व "ला नीना" म्हणजे काय? महाराष्ट्र व भारताच्या पर्जन्यावर काय परिणाम होऊ शकतो?
*" ला नीना" या स्थितीचा भारतावर काय परिणाम होतो?
"ल निना "या स्थितीचा भारतावर ती सकारात्मक परिणाम होतो ज्यामुळे भारतीय कृषी चे उत्पादन वाढू शकते.
- भात ऊस सोयाबीन मका या पिकांना ला नीना या स्थितीचा फायदा मिळतो.
- काही भागात अतिवृष्टी होऊन नुकसानही होऊ शकते.
- जास्त पाऊस पडल्यामुळे पिकांवरती विविध रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव दिसू शकतो.
* 2026 मध्ये कोणत्या प्रकारची पर्जन्य स्थिती निर्माण होणार आहे?
-
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार 2026 या वर्षी भारतामध्ये" एल निनो "या प्रकारची स्थिती निर्माण होणार आहे.
ज्यामुळे भारतात तसेच महाराष्ट्रात पावसाची मात्रा ही कमी पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पाण्याची संचन भासू शकते.
* 2026 मध्ये भारतीय हवामान खात्याने कोणता अंदाज दिलेला आहे?
- हवामान विभागानुसार 2026 मध्ये "एल निनो" ही स्थिती निर्माण होऊन पर्जन्य हे कमी प्रमाणात पडू शकतो.
- 2026 या वर्षांमध्ये सरासरीपेक्षा म्हणजेच सुमारे 90 ते 92 टक्के पेक्षा कमी पाऊस पडू शकतो.
- याचे मुख्य कारण म्हणजे मे जून नंतर "एल निनो "हा सक्रिय होणार आहे.
- त्यामुळे महाराष्ट्रातही पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता दाट आहे.
"एल निनो" व "ला नीना" म्हणजे काय? महाराष्ट्र व भारताच्या पर्जन्यावर काय परिणाम होऊ शकतो?
* महाराष्ट्रावर "एल निनो "या स्थितीचा काय परिणाम होऊ शकतो?
- या स्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये पर्जन्य कमी प्रमाणात पडू शकत.
- किंवा महाराष्ट्र मध्ये पाऊस हा उशिरा पडू शकतो.
- एल निनो च्या स्थितीमुळे पावसाळ्यात जून जुलै मध्ये खंड पडू शकतो. म्हणजेच या दोन महिन्यांमध्ये पाऊस कमी पडू शकतो किंवा पाऊसाचा खंड पडू शकतो.
- यामुळे महाराष्ट्रभर पेरणीही लांबणीवर पडेल किंवा उशिरा होईल.
- परिणामी महाराष्ट्र कृषी उत्पादन घटू शकते.
* "एल निनो" या स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावि?
एल निनो ची स्थिती उद्भवल्यास महाराष्ट्रातील किंवा देशभरातील शेतकऱ्यांनी खालील काळजी घ्यावी!
- पीक लागवड करताना किंवा पेरणी करताना कमी कालावधीमध्ये येणाऱ्या पिकांची लागवड करावी.
- पीक पेरणीसाठी कमी पाऊस लागणाऱ्या पिकांची पेरणी करावी.
- कमी पाऊस लागणारा पिकांमध्ये तूर,उडीद, मुंग या पिकांची पेरणी शेतकरी करू शकतात.
- पेरणी करताना घाई करू नये.
- पहिल्याच पावसानंतर पेरणी न करता एक-दोन चांगले पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी.
अशा प्रकारची काळजी आपले शेतकरी बांधव घेऊ शकतात ज्यामुळे "एल निनो" ची स्थिती निर्माण झाल्यानंतरही आपल्या शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही.
अशा प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या तसेच युट्युब चॅनेल ला भेट देऊन सबस्क्राईब करून घ्या!🙏🙏🙏
https://youtube.com/@aggroshala?si=OROJA8OaAFh2B6ho
