शरद पवार ग्राम समृद्धी योजना
शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही महाराष्ट्र राज्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेली सरकारी योजना आहे. ज्याद्वारे विविध शेतकरी बांधवांना जे की पशुपालनामध्ये सारस्य घेतात अशा शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही ग्रामीण भागातील शेतमजूर शेतकरी यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच जनावरांसाठी आधुनिक गोठे व विविध सुविधा देण्यासाठी सुरू केलेली आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे 2020 या वर्षी सुरु केलेली आहे.
*शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचे उद्दिष्ट काय आहेत?
या योजनेद्वारे महत्त्वाचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर यांना आर्थिक स्तर सुधारण्यासाठी मदत करणे आहे. त्यामध्ये
- ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधने
- आर्थिक चणचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करणे.
- शेती सहाय्यक जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांना वाढण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- शेती विकसित करण्यासाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी करणे.
- ग्रामीण पातळीवर मूलभूत व पायाभूत सुविधांचा विस्तार करणे
वरील उद्दिष्टे समोर ठेवून शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही राबवण्यात आली होती.
* शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणकोणते लाभ मिळणार आहेत?
ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खालील प्रकारे विविध लाभ दिले जातील.
1- जे शेतकरी पशुपालक आहे गाई म्हशी आहे व दुधाचा व्यवसाय करतात अशा शेतकऱ्यांना आधुनिक गोठे बांधून दिले जाईल.
2- शेळीपालन व कुक्कुट पालन करणारा शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रमांचा समावेश केला जाईल.
3- शेतकऱ्यांसाठी बांधण रस्ते तसेच पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या सुविधा व कामे दिल्या जातील.
4- ग्राम पातळीवर विविध उपक्रमांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.
5- शेतीमध्ये असणारी माती व विविध शेती विकास कामे या योजनेअंतर्गत राबवली जातील.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना चा लाभ घेण्यासाठी कोणत्या पात्रता आवश्यक आहे?
-या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सांगितलेल्या गाईडलाईनुसार खालील पात्रता आवश्यक आहे.
1- अर्ज करणारी व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवासी असावी.
2- अर्जदार व्यक्ती ग्रामीण भागातील असावी तसेच शेतकरी किंवा शेतमजूर असावी.
3- अर्जदाराचा मुख्य व्यवसाय हा शेती असावा किंवा शेतीपूरक व्यवसाय असावा.
4- मनरेगा अंतर्गत कामासाठी पात्रता लागू होऊ शकतात.
वरील पात्रतांची पूर्तता करणारे अर्जदार या योजनेसाठी पात्र आहे.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना च्या लाभासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता केलेली असावी.
1- राशन कार्ड
2- रहिवासी दाखला
3- आधार कार्ड
4- उत्पन्नाचा दाखला
5- पासपोर्ट फोटो
6- आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर
7- तसेच जमिनीचा सातबारा
शरद पवार ग्राम समृद्धी योजना साठी अर्ज कुठे व कसा करायचा?
वरील योजनेचे लाभासाठी अर्जदाराने अर्ज हा ग्रामपंचायतला करावा.
त्यासाठी
- सर्वप्रथम ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती या ठिकाणी अधिकारी स्तरावर संपर्क साधने
- किंवा रोजगार हमी /मनरेगा कार्यालयाशी संपर्क साधने
- ऑफलाइन अर्ज भरावा
- अर्ज मंजूर झाल्यानंतर योजनेचा लाभ मिळेल.
अशाप्रकारे शरद पवार ग्राम समृद्धी योजना या योजनेची माहिती आपण आपल्या या लेखांमध्ये दिलेले आहेत. अधिक विस्तृत माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या व सबस्क्राईब नक्की करा !
https://youtube.com/@aggroshala?si=2-fb3zF87mMJldRn
