भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. जाणून घ्या विस्तृत माहिती!

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.

"भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना" ही महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी सुरू केलेली एक योजना आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे तसेच शेतकऱ्यांना पारंपारिक शेतीपासून बागायती शेती किंवा फळबाग शेतीकडे वळवणे. या योजनेच्या माध्यमातून स्थिर शेती तसेच दीर्घकालीन उत्पादन देणारी शेती या दोन बाबींना समोर ठेवून शेतकऱ्यांना या योजनेद्वारे मदत केली जाणार आहे.


" भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने" ची मुख्य उद्दिष्टे काय आहेत?

:- वरील योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजेच शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ घडून आणणे त्यासोबत खालील इतर उद्दिष्टंवरही या योजनेद्वारे काम केले जाणार आहे
- शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये भर पाडणे.
- कोरडवाहू जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये ही फळबाग यशस्वी करून देणे.
- शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन तसेच दीर्घकालीन व स्थिर शेतीच्या प्रवाहामध्ये आणणे.
- शेतकऱ्यांना फळ निर्यात दार बनवणे.
वरील उद्दिष्टे समोर ठेवून या योजनेद्वारे काम केले जाणार आहे.


Www.aggroshala.com

* भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना च्या माध्यमातून कोण कोणत्या फळबागा लावल्या जाणार आहे?

- या योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या फळबागा शेतकऱ्यांना मंजूर करून दिले जाणार आहेत. त्यामध्ये
- मोसंबी
- डाळिंब
- काजू
- चिकू
- आंबा
- केळी
- संत्रा
- सिताफळ
- आवळा
- लिंबू
तसेच इतर अनेक मान्यता प्राप्त फळबागांचा समावेशही या योजनेमध्ये केला गेलेला आहे.

* भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी पात्रता काय आहे?

:- वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही पात्रता नमूद करून दिलेला आहे. या पात्रता पूर्ण करणारे शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. त्या पात्रता खालील प्रमाणे
- अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर जमीन असावी.
- अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावरती 7/12 किंवा ८- अ उतारा असावा.
- अर्ध शेतकऱ्याच्या शेतामध्ये सिंचनासाठी काहीतरी माध्यम असावं., ( त्यामध्ये विहीर, कालवा,शेततळे यापैकी )
वरील पात्रतांची पूर्तता शेतकऱ्यांनी केलेली असावी.

* भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड येण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?

:- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता अर्जदार शेतकऱ्यांनी करावी.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सातबारा उतारा
- आठ अ नमुना
- बँकेची लिंक मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- जात प्रमाणपत्र
इत्यादी कागदपत्रांची पूर्तता अर्जदार शेतकऱ्यांनी केलेली असावी.

* भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे माध्यमातून किती अनुदान मिळते?

- वरील योजनेच्या माध्यमातून फळबागेनुसार / विविध फळभागासाठी विविध प्रकारचे अनुदान मिळते. तसेच विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रमाणात अनुदान मंजूर केले जाते. काही विशेष प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के अनुदानही दिले जाते.

* भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज कसा करावा?


:- वरील योजनेला अर्ज करण्यासाठी खालील प्रोसेसचा अवलंब करू शकता.
- सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाने नमूद केलेल्या पोर्टलवर भेट द्या.
- अर्जदाराची नोंदणी त्या पोर्टल वरती करावी.
- अर्जदाराचं नाव गाव पत्ता संपूर्ण माहिती इत्यंभूत भरावी.
- पोर्टल वरती गेल्यानंतर "फलोत्पादन योजना" या ऑप्शन वरती क्लिक करा.
- मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता करावी.
- व अर्ज सबमिट करावा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यावी.
अशा पद्धतीने अर्जदार शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो.

* भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे शेतकऱ्यांना काय फायदे मिळणार आहेत?

- वरील योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध फायदे होणार आहेत त्यामध्ये,
- शेतकऱ्यांना स्थिर व दीर्घकालीन उत्पादनाचा सोर्स निर्माण होणार आहे.
- ज्यामुळे शेतकऱ्यांचे अतिरिक्त मेहनत तसेच वेळही वाचणार आहे.
- महाराष्ट्र राज्यातून फळ निर्यातीसाठी प्रोत्साहन मिळणार.
- शेतकऱ्यांना कमी क्षेत्रातून जास्त नफा मिळणार.
अशा पद्धतीचे विविध फायदे शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

निष्कर्ष:- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही योजना शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी राबवली गेलेली आहे. सदर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बराच फायदा मिळणार आहे. योजना मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी कृषी अधिकाऱ्यांचा सहाय्य शेतकऱ्यांना मिळणार तसेच मार्गदर्शनही शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे पारंपरिक शेती सोडून शेतकरी फळबाग शेतीकडे वळणार व त्याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे.


अशा शेती विषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या व सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🙏🙏🙏🙏

https://youtube.com/@aggroshala?si=4vCRCEUgLorFbV0M

Sunil

Sunil

“मी सुनील, या वेबसाईटचा मालक. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि शेतीसंबंधित माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे.”