कपाशी चे टॉप 5 वाण
- कपाशी हे महाराष्ट्रभर लावला जाणार मुख्य पिकांपैकी एक पीक आहे. कपाशी एक नगदी पीक आहे. लागवड केल्यानंतर योग्य व्यवस्थापन व योगी काळजी घेतल्यानंतर बरोबर उत्पादन आपल्याला या कपाशीच्या पिकापासून मिळू शकतो. योग्य जमिनीमध्ये योग्य वाहनाची कपाशी जर लावली तर त्याचा नक्कीच फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होऊ शकतो. सध्या महाराष्ट्रभर कपाशी लावण्यासाठी शेतकरी बांधवांना प्रश्न पडतोय कि कोणता वाण हा लागवडीसाठी बेस्ट आहे?
या प्रश्नाचे उत्तर साठी आपण कपाशीच्या टॉप पाच वाहनांची विस्तृत माहिती आपल्या या लेखांमध्ये दिलेली आहे. ते पाच टॉपचे वाण खालील प्रमाणे.
1)RCH -659 BG - ||
- हे एक कपाशीचं टॉपचं वाण आहे. ज्याच्या लागवडीनंतर भरघोस कापसाचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकतो. योग्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खत औषधी व्यवस्थापन,यासाठी जरुरी आहे.
वैशिष्ट्ये :-
1- भरघोस उत्पादन देणारा लोकप्रिय वाण
- या वाणाच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना बरोबर उत्पादन मिळू शकत. या वाणाच्या कपाशीला भरपूर बोंडे लागतात तसेच कापूस ही चांगल्या प्रमाणात लागतो.
2- बोंडांचा आकार हा मोठा असतो
- या वाणाच्या कपाशीच्या झाडाला जे बोंडं लागतात त्या बोडांचा जागा आकार हा साधारण बोंडा पेक्षा मोठा असतो. त्यामुळे त्यात कापूस ही जास्त असतो. परिणामी शेतकऱ्याचे उत्पादन वाढत.
3- बोंड आळी चा प्रभाव कमी होतो.
- कपाशी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे बोंड आळी आहे. या बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी या पिकाचे खूप मोठे नुकसान होतं. मात्र वरील वाणाची या बोंड अळीच्या विरोधातील प्रतिकार क्षमता चांगली असते. त्यामुळे या बोंड अळीचा जास्त प्रभाव किंवा परिणाम या वाणाच्या कपाशीवर होत नाही.
4- कमी पाणी किंवा जास्त पाणी दोन्ही परिस्थितीमध्ये चांगलं उत्पादन.
- वरील वाणासाठी कमी पाणी असलं तरीही झाड चांगल्या पद्धतीचे डेरेदार बनतं व झाडाला बोन्डेही चांगली लागतात त्यामुळे उत्पादनामध्ये फरक पडत नाही.
कालावधी -
वरील वाणाचा कालावधी हा
150- 180 दिवसाचा असतो.
उत्पादन-
वरील व्हरायटी चा कापूस लागवड केल्यास
एकरी 12 ते 16 क्विंटल. उत्पादन मिळू शकत.
Www.aggroshala.com
2)US 7067 BG -||
- हा वाण कमी दिवसांमध्ये व कमी पाण्यामध्ये ही चांगल्या पद्धतीचे उत्पादन शेतकऱ्यांना देऊ शकतो.
वैशिष्ट्ये :-
1- डेरेदार झाड व भरपूर फांद्या
- वरील वनाच्या झाडाला भरपूर फांद्या लागतात व त्यामुळे झाड डेरेदार बनत. झाड मजबूत असल्या कारणाने भरपूर दिवस त्याच्यामध्ये टाकत राहते व त्याला बोंड्या लागतात.
2- बोंड्या लवकर व एकसारख्या लागतात
- वरील वाणाच्या झाडाला बोंड्या या लवकर लागतात तसेच एकसारख्या लागतात. त्यामुळे कापूस वेचणी सोपी व सोयीस्कर जाते.
3- पाण्याचा ताण सहन करते
- एखाद्या वेळेस पावसाचे पाणी कमी जास्त झालं किंवा पाण्यास तर एवढा निर्माण झाला तरीही वरील वाणाची झाड ही पाण्याचा ताण सहन करू शकतात.
कालावधी -
या वाणाच्या झाडाचं आयुष्य तसेच कापूस लागण्याचा कालावधी हा
150-170
दिवसाचा असतो.
उत्पादन:-
10 ते 15
क्विंटल प्रति एकर
योग्य काळजी व व्यवस्थापन केल्यास उत्पादन वाढू शकत.
3)BUNNY BG -||
- हाही एक उत्तम प्रकारचा भरपूर उत्पादन देणार आहे वाण आहे. महाराष्ट्र मध्ये बऱ्या प्रमाणात या वाणाच्या कपाशीची लागवड केली जाते.
वैशिष्ट्ये :-
1- महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात लागवड.
2- गुलाबी बोंड आळी विरोधी प्रतिकार क्षमता चांगली
- बोंड आळी मुळे कापसाच्या पिकाचा फार मोठे नुकसान होतं. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन घटतं व आर्थिक नुकसानही होतं. या वाणाची गुलाबी बोंड आळी विरोधी प्रतिकार सुद्धा ही चांगली असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनामध्ये घट निर्माण होण्यापासून वाचते.
3- या वाणाच्या झाडाची वाढ ही संतुलित होते.
- वरील वाणाच्या झाडाची वाढ ही चांगल्या पद्धतीची व योग्य प्रमाणात होते . झाडाची वाढ चांगली म्हणजे झाड मजबूत म्हणजेच उत्पादनही मोठ्या प्रमाणात.
कालावधी:-
वरील वाणाच्या कपाशीचे जीवन काल तसेच कापूस उत्पादनाचा काल हा
150-160
यादरम्यान असतो.
उत्पादन:-
वरील वाणाच्या कपाशीला
12-17
क्विंटल प्रति एकर एवढा उत्पादन मिळू शकतं.
4)AJIT 155 BG-||
-हा वाण सुद्धा चांगल उत्पादन देणारा वाण आहे. कमी पाण्यामध्येही झाड चांगलं बनण्याची व चांगला बोन्डे लावण्याची क्षमता या वाणाची आहे.
वैशिष्ट्ये :-
1- कमी पाण्यामध्येही झाड चांगलं बनत.
2- पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता चांगली आहे.
- एखाद्या वेळेस पिकाला कमी जास्त पाऊस झाल्यास तो सहन करू शकतो.
3- बोंडांचा आकार साधारण आकारापेक्षा मोठा असतो.
4- या वाणाची रोगप्रतिकार क्षमता ही चांगली असते. त्यामुळे विविध अळीपासून तसेच रोगांपासून आपल्या झाडाचं नुकसान होत नाही.
कालावधी:-
या वाणाच्या झाडाचा जीवन कालावधी तसेच कापूस लागण्याचा कालावधी हा
150 - 170
दिवसांचा आहे.
उत्पादन:-
या वाणाच्या कपाशीला चांगल्या प्रमाणात उत्पादन लागते.
10 ते 15 क्विंटल प्रति एकर
उत्पादन मिळू शकते
5)JKCH -1947 BG-||
टॉपच्या पाच वानांपैकी हा एक टॉपचा वाण आहे. भरपूर उत्पादन देणारा एक वाण म्हणूनही याची ओळख आहे.
वैशिष्ट्ये:-
1- जलद वाढ होते
या वाणाच्या झाडांची वाढ ही इतर झाडांपेक्षा जलद होते. त्यामुळे झाड पटकन मोठे होऊन त्याला कापसाच्या बोंड्या ही पटकन लागतात.
2- भरपूर प्रमाणात बोंड्या लागतात.
- भरपूर प्रमाणात बोंड्या लागल्यामुळे कापूस उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढते.
3- खते टाकल्यास चांगला प्रतिसाद मिळतो
- खतांचे योग्य व्यवस्थापन केल्यास या वाणाच्या झाडांची वाढ चांगली होते व उत्पादनही चांगले मिळते.
कालावधी:-
या वाणाच्या झाडांचा जीवन काल तसेच उत्पादन काल हा
155-180
दिवस असतो.
उत्पादन :-
12 ते 18 क्विंटल
कापूस उत्पादन एका एकरामध्ये मिळू शकत.
महत्वाचे :-
-मातीच्या गुणधर्मनुसार योग्य वाणाची निवड आपल्या शेतामध्ये करावी.
- बियाणे लागवड या अगोदर त्यावर योग्य प्रक्रिया करावी.
- खत व्यवस्थापन तसेच पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे.
- लागवडी अगोदर आपल्या शेतातील मातीचे माती परीक्षण नक्की करून घ्या.
कपाशी चे टॉप 5 वाण
कपाशी चे टॉप 5 वाण
कपाशी चे टॉप 5 वाण
कपाशी चे टॉप 5 वाण
कपाशी चे टॉप 5 वाण
निष्कर्ष:-
कापूस हा महाराष्ट्रातील मुख्य पिकांपैकी पीक आहे. कापूस हा मुख्यतः काळ्या मातीतील पीक म्हणून गणलं जातं. मात्र इधर मातीमध्येही पाण्याचा सिंचन योग्य पद्धतीने केल्यास व खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास भरघोस उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकतो. त्यामुळे कापूस लागवड अगोदर माती परीक्षण नक्की करून घ्या. ज्यामुळे आपल्याला आमचे व्यवस्थापन तसेच खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने करता येईल.
*
अशा शेती विषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या व सबस्क्राईब करायला विसरू नका.. 🙏🙏🙏🙏
https://youtube.com/@aggroshala?si=W0pCLmqP4KMA6B3d
