लोह पिकामध्ये काय काम करतो?

लोह पिकामध्ये काय काम करतो? जाणून घ्या विस्तृत माहिती!

लोह पिकामध्ये काय काम करतो?

लोह पिकामध्ये काय काम करतो?
मित्रांनो आपल्या पिकाच्या वाढीमध्ये सर्वांगीण विकासामध्ये विविध सूक्ष्म अन्नघटक काम करत असतात. या विविध सूक्ष्म अन्न घटकांपैकी एक महत्त्वाचा अन्नघटक म्हणजे" लोह "होय.
लोहा पिकासाठी फार महत्त्वाचा असा रोल निभावत असतो. त्याची मात्र आपल्या पिकासाठी फार कमी प्रमाणात लागते. मात्र पिकाच्या हिरवळपणासाठी, क्लोरोफिलच्या निर्मितीसाठी, आणि उत्पादन वाढीसाठी लोह हा अत्यंत आवश्यक असा सूक्ष्म अन्नघटक आहे. लोहाच्या कमतरतेमुळे पीक कमजोर पडू शकत, वाढ खुंटू शकते व आपल्या उत्पादनामध्ये घट निर्माण होऊ शकते.


लोह पिकामध्ये नेमकं काय काम करतो?

1- क्लोरोफिल च्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे
मित्रांनो आपल्या झाडाला चांगला हिरोपणा मिळण्यासाठी क्लोरोफिल हे फार महत्त्वाचा घटक असतो. या क्लोरोफिलच्या निर्मितीमध्ये लोह अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो. या क्लोरोफिल मध्ये लोहा थेट अवेलेबल नसला तरी हा क्लोरोफिल निर्माण करण्यासाठी झाडाला प्रोत्साहन देण्याचे काम हे लोह करत असतं.

2- प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढवणे
झाडामध्ये अन्न निर्मिती ही प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या माध्यमातून होत असते. आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रिया ही झाडामध्ये सुरळीत पार पडण्यासाठी आपल्या झाडामध्ये क्लोरोफिल ची मात्रा ही मोठ्या प्रमाणात असावी लागते. म्हणजेच लोह हा क्लोरोफिल निर्माण करून आपल्या झाडांमधली प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढवतो. प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढली म्हणजेच अण्णा निर्मिती वाढते अन्न निर्मिती वाढली म्हणजेच आपलं उत्पादन वाढते.

3- विविध एंजाइम्स सक्रिय करणे.
पिकामधील किंवा झाडांमधील विविध रासायनिक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आपल्या पिकांमध्ये विविध एंजाइम्स असणं फार जरुरी असतं. हे एन्जॉयमेंट झाडांमध्ये प्रेझेंट असले तरी त्यांना ऍक्टिव्हेट करण्याचं काम मात्र हा लोह चांगल्या पद्धतीने करत असतो. त्यामुळे हे एनझाइन आपलं काम चांगल्या पद्धतीने पार पडतात आणि आपल्या झाडाच्या ज्या रासायनिक प्रक्रिया आहे त्या सुरळीतपणे पार पडतात.

4- ऊर्जा निर्मितीसाठी आणि श्वसन प्रक्रिया चांगली होण्यासाठी लोह हा आपल्या पिकाला मदत करत असतो. यामुळे आपला पीक हे चांगलं हिरवळ ताजं टवटवीत तसेच आरोग्यमय राहत.

5- झाडाला नवीन फुटवे व फुलधारणा वाढवण्यासाठी मदत करतो.
मित्रांनो लोहामुळे आपल्या पिकाला नवीन फुटवे फुटतात. म्हणजेच आपल्या पिकाची वाढ चांगली होते. सोबतच पिकाला फुलधार नाही चांगला लागण्यासाठी मदत करणारे जे काही घटक आहे त्यामधील एक घटक म्हणजे लोह होय.

* पिकांमधली लोहाची कमतरता ओळखायची कशी?

मित्रांनो पिकामध्ये जेव्हा लोह या अन्न घटकाची कमतरता निर्माण होते तेव्हा आपल्या पिकांमध्ये खालील लक्षणे दिसायला लागतात.
• आपल्या पिकाला फुटणारे नवीन पान हे पिवळे पडायला लागतात. जुनी पान मात्र हिरवीच राहतात आणि नवीन पाने ही पिवळे पडतात.
• आपल्या पिकाची हवी असलेली वाढ थांबते. वाढ कुठल्या मुळे आपल्या पिकाला उत्पादन हे कमी लागतो.
• लोहाची कमतरता असल्यास आपल्या पिकाची जी पाने आहे ती पाने लहान राहतात. पानांची वाढ चांगली होत नाही. त्यामुळे प्रकाशाचे प्रक्रिया मंदावते सोबतच अन्न निर्मिती घटते आणि उत्पादनामध्ये घट निर्माण होते.
• झाडावर लागणारी नवीन फुल असो किंवा फुल कळ्या असो लोहाच्या कमतरतेमुळे हे फुल गळायला लागतात.
• लोहाची कमतरता असल्यास त्याचे सर्वात पहिले लक्षण हे आपल्या पिकाचे जे नवीन पान असतात नवीन फुटवे असतात त्यांच्यावर दिसायला लागतात.
मित्रांनो ही काही वरील लक्षण आहे ज्यांच्या माध्यमातून आपण ओळखू शकतो हे आपल्या पिकांमध्ये लोह या सूक्ष्म अन्न घटकाची कमतरता आहे.

* आपल्या पिकामध्ये लोहाची कमतरता का भासते/ निर्माण होते?

मित्रांनो लोह या सूक्ष्म अन्न घटकाची कमतरता आपल्या पिकामध्ये निर्माण होते त्यामागे काही नैसर्गिक व काही रासायनिक कारणे आहेत.
A- मातीचा पीएच जास्त असल्यामुळे लोह या घटकाची कमतरता आपल्या पिकामध्ये निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपल्या मातीचा पीएच हा मेंटेन आहे का संतुलित आहे का याच्याकडे आपण लक्ष दिल पाहिजे.
B- पिकामध्ये पाणी साचल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे ही आपल्या पिकामध्ये लोह या घटकाची कमतरता भासू शकते.
C- फॉस्फरस या खताचा जास्त वापर केला किंवा अति वापर केला तरी या कंडीशन मध्येही आपल्या पिकांमध्ये लोह या घटकाची कमतरता भासु शकते.
D- आपल्या मातीमध्ये सेंद्रिय घटकांची कमतरता असल्यास, सेंद्रिय कर्ब हा कमी असल्यास लोह घटकाची कमतरता भासू शकते.
E- जास्त कॅल्शियम असणारी जमीन किंवा चुनखडी जमीन असल्यास या प्रकारच्या जमिनीमध्येही "लोह" या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पिकाला भासू शकते.

* लोहाची कमतरता असल्यास त्यावरती काय उपाय करावा?

पिकामध्ये लोहाची कमतरता असल्यास आपण वरतून पिकाला लोह देऊ शकतो. हा लोह पिकाला देताना तो दोन पद्धतीने देऊ शकतो एक म्हणजे फवारणीद्वारे आणि दुसरा म्हणजे मातीतून.

फवारणी द्वारे -
फवारणी द्वारे जर आपण लोह पिकाला देत असाल तर
• फेरस सल्फेट - 5gm/liter
• सोबत सायट्रिक ऍसिड
किंवा
• चिलेटेड आयरन -
या घटकांची फवारणी आपण लोहाची कमतरता पिकाला भासल्यास करू शकतो. या फवारणीमुळे लोहाची कमतरता लगेच भरून निघेल.

मातीच्या माध्यमातून -
आणि जर आपण लोह हा पिकाला मातीचे माध्यमातून देत असाल तर
• फेरस सल्फेट -5 ते 10 kg / एकर
या प्रमाणामध्ये मातीतून द्यावे.

लोहाची उपलब्धता नैसर्गिकरित्या मातीतून वाढवण्यासाठी काय उपाय करावेत?

• सेंद्रिय खत आपल्या जमिनीमध्ये मिक्स करावे.
• जमिनीचा पीएच नियंत्रणात आणावा.
• पिकामध्ये पाणी साचणार नाही व पाण्याचा योग्य निचरा होईल याची काळजी घ्यावी.
• खतांचा वापर हा संतुलित प्रमाणात करावा.
• पिकासाठी उपयुक्त असणारे विविध मायक्रो न्यूट्रिएंट्स वेळोवेळी पिकाला द्यावे.

अशा पद्धतीने आपण आपल्या पिकाला लोहाचे कमतरता भासू नये यासाठी उपाययोजना करू शकतो.

* लोहाचे प्रमाण पिकामध्ये जास्त झाल्यास त्याचे काय परिणाम दिसतात?

मित्रांनो लोह हा आपल्या पिकासाठी फार महत्त्वाचा सूक्ष्म अन्नघटक असला तरी त्याची मात्रा ही जास्त प्रमाणात दिली गेली तर त्याचे दुष्परिणाम आपल्या पिकामध्ये दिसू शकतात.
• पानेही गडद हिरवी दिसायला लागतात.
• मुळांची वाढ थांबते व मुळे खोलवर जमिनीमध्ये वाढत नाही.
• तसेच इतर सूक्ष्म अन्न घटक जी पिकासाठी महत्त्वाचे असतात ते पिकाला उपलब्ध होऊ शकत नाही.

मित्रांनो ही आहे लोह या सूक्ष्म अन्न घटका विषयीची विस्तृत माहिती. आपल्या पिकामध्ये लोह या घटकाची मात्रा योग्य प्रमाणात आहे ना याची काळजी घ्या व नसल्यास वरील उपाय करा.!🙏🙏

अशा विविध शेतीविषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या आणि लगेच सबस्क्राईब करून घ्या.


https://youtube.com/shorts/fc3Ya7efd4s?si=cfNyvK0Ub168vWPx

Sunil

Sunil

“मी सुनील, या वेबसाईटचा मालक. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि शेतीसंबंधित माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे.”