झिंक ची कमतरता कशी ओळखावी?
आपल्या पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वच्या असणाऱ्या विविध सूक्ष्म अन्न घटना पैकी एक सूक्ष्म घटक म्हणजे Zink होय. झिंक ची आवश्यकता आपल्या पिकाला कमी प्रमाणात असते. मात्र याच्या कमतरतेमुळे आपल्या पिकातील उत्पादनामध्ये घट निर्माण होऊ शकते. कारण झिंक च्या कमतरतेमुळे आपल्या पिकाच्या फलधारणा,फलदारांना यांच्यावरती डायरेक्ट परिणाम पडतो. त्यामुळे आपल्या उत्पादन वाढीसाठी" झिंक "फार महत्त्वाचा असा सूक्ष्म अन्नघटक आहे.
झिंक पिकासाठी काय काम करतो?
- झिंक हा आपल्या पिकाचे सर्वांगीण वाढीसाठी व विकासासाठी मदत करत असतो. त्यामध्ये
1- वाढीचे हार्मोन्स तयार करणे
झिंग आपल्या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी वाढीचे हार्मोन्स तयार करत असतो. हे वाढीचे हार्मोन्स म्हणजेच ऑक्सिन. या बॉक्सिंग हार्मोन्समुळे आपल्या पिकाला चांगली वाढ मिळत असते.
2- नवीन पाणी व फुटवे फुटने
झिंक आपल्या पिकाच्या शेंड्याला नवीन पाने तसेच नवीन फुटवे फुटण्यासाठी मदत करत असतो.
3- क्लो्रोफील निर्मितीमध्ये मदत करतो
आपल्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीचा हिरवळपणा येण्यासाठी क्लोरोफिल हा घटक फार महत्त्वाचा असतो. या क्लोरोफिल ची निर्मिती आपल्या पिकामध्ये होण्यासाठी हे झिंक आपल्या पिकाला प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे झिंकच्या कारणाने आपल्या पिकाला हिरवळपणा चांगला मिळत असतो.
4- फुलधारणा फळधारणा सुधारते
झिंक मुळे आपल्या पिकाला चांगल्या प्रमाणात फुले व फळे लागतात. फुले व फळे चांगली लागल्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये भर पडते.
5- मुळांची वाढ मजबूत होते.
झिंक आपल्या पिकाच्या मुलांची चांगली वाढ व्हावी यासाठी मदत करत असतो. कारण मूळही आपल्या पिकाचा असा भाग आहे ज्याच्यामुळे जमिनीतील विविध सूक्ष्म अन्नघटक आपल्या पिकाला खेचून मिळत असतात. त्यामुळे मूळ चांगल्या पद्धतीची वाढली गेली पाहिजे याकडे सिंक फार महत्त्वाचं लक्ष देतो.
6- नायट्रोजन चा योग्य वापर करून देतो.
आपण आपल्या पिकांना नायट्रोजनची मात्रा युरियामार्फत तसेच विविध खतमार्फत टाकत असतो. मात्र हा नायट्रोजन आपल्या पिकाला पोहोचतोय का. जर हा नायट्रोजन आपल्या पिकापर्यंत पोहोचत नसेल तर सिंच्या मदतीमुळे हे नायट्रोजन आपल्या पिकांपर्यंत पोहोचतो.
7- दाणे जाड होणे आणि वजन वाढवणे
झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे आपल्या पिकाला जे फळ लागतात त्या फळातील जी दाणे असतात त्या दाण्यांचा आकार हा चांगल्या पद्धतीचा वाटतो मजबूत आणि ठोसर होतो. तसेच त्या दाण्यांचं वजनही वाढतं.
* झिंक च्या कमतरतेची लक्षणे कोणती?
1- नवीन पाणी पिवळी व लहान पडणे.
आपल्या पिकाला जे नवीन फोटो असतात आणि त्या ठिकाणी जे नवीन पाणी आपल्या पिकाला लागतात त्या पानांचा आकार हा लहान राहून जातो तसेच ही नवीन पाणी पिवळी पडायला सुरुवात होते. आणि हे जिंकच्या कमतरतेमुळे होतं.
2- झाडांची वाढ खुंटते
आपल्या झाडामध्ये झिंक हा ऑक्सिन हे वाढीचे हार्मोन्स तयार करत असतो. म्हणजे जर पिकामध्ये जिंक नसेल तर हे वाडीचा हार्मोन्स म्हणजे ऑक्सिजन कमी प्रमाणात तयार होईल. आणि या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपल्या पिकाची खुंटते . म्हणजेच झिंक च्या कमतरतेमुळे आपल्या पिकाची वाढ खुंटते.
3- फुलधारणा कमी होणे
झिंकच्या कमतरतेमुळे पिकाला फुले ही कमी प्रमाणात लागतात. कमी प्रमाणात फुले लागल्यामुळे फळही कमी लागतात व त्यामुळे याचा परिणाम आपल्या पिकावरच्या उत्पादनावर होत असतो.
4- फळे लहान राहतात
झिंक हा आपला पिकाला लागणारे फळांचा आकार वजन वाढवण्यासाठी मदत करत असतो. त्यामुळे झिंकची कमतरता म्हणजे फळांचा आकार वजन यामध्ये घट होईल.
5- मका या पिकामध्ये झिंक च्या कमतरतेमुळे "व्हाईट बड" या रोगाची लक्षणे दिसायला सुरुवात होते.
6- तसेच तांदूळ या पिकामध्ये झिंकच्या कमतरतेमुळे "खैरा" या रोगाची लक्षणे दिसायला सुरुवात होते.
7- ऊस या पिकाची पाने लहान तसेच अरुंद तयार होतात. लहानपणामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया थोडीशी मंदावते. व याचा परिणाम आपल्या उत्पादनावर होतो.
*पिकांमध्ये झिंक ची कमतरता कशामुळे निर्माण होते.
झिंक ची कमतरता निर्माण होण्यामध्ये आपल्या जमिनीची फार महत्त्वाची भूमिका असते. जमिनीचा पोत कसा आहे याच्यावर नष्ट होते की आपल्या जमिनीमध्ये झिंक योग्य प्रमाणात पिकाला मिळेल का त्याची कमतरता असेल. सिंगची कमतर झाली बनवण्याची काही कारणे खालील प्रमाणे.
1- जमिनीचा पीएच जास्त असल्यास जमीन ही खारफट होत असते. व जमीन जास्त खारफड झाल्यामुळे पिकाना झिंक ची कमतरता निर्माण होते.
2- जास्त फॉस्फरस चा वापर
फॉस्फरस चा वापर जास्त केल्यामुळे ही आपल्या पिकांमध्ये चीनची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे फॉस्फरस पिकांना देताना योग्य प्रमाणात व संतुलित प्रमाणात दिला गेला पाहिजे.
3- हलकी वालूका मय जमीन
या प्रकारच्या जमिनीमध्येही झिंकची कमतरता आपल्या पिकांना तयार निर्माण होत असते.
4- सेंद्रिय कर्ब ची कमतरता
विविध सूचना घटक हे आपल्या पिकामध्ये असणाऱ्या सेंद्रिय घटकांवर आधारित असतात. जेवढे चांगल्या पद्धतीमध्ये असेल तेवढेच विविध सूक्ष्म अन्नघटकही आपल्या जमिनीमध्ये निर्माण होत असतात. त्यामुळे सेंद्रिय कर्ब कमी पडल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जी की अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होते.
5- पाण्याचा निचरा न होणे
आपल्या जमिनीमध्ये पाणी साचून राहिल्यास, पाण्याचा योग्य निचारा ण झाल्यास पिकामध्ये झिंक या अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होते.
* पिकांना झिंक देण्याची योग्य पद्धत कोणती?
पिकांना झिंक देत असताना आपण ते दोन पद्धतीने देऊ शकतो.
1- जमिनीतून
जर आपण पिकांना डायरेक्ट जमिनीतून जिंकत असाल तर ते देत असताना -
-झिंक सल्फेट 21% - प्रति एकर दहा किलो या प्रमाणात
-झिंक सल्फेट 33% - प्रति एकर पाच किलो या प्रमाणात
हे दोन्ही प्रकारचे झिंक पिकाला देताना शेणखतामध्ये मिसळून द्यावे.
2 फवारणी द्वारे
झिंक पिकाला देण्याची ही दुसरी पद्धत आहे ज्यामध्ये आपण झिंकचे पाणी करून त्याची फवारणी आपल्या पिकावर ती घेत असतो. जर ही फवारणी घेत असाल तर
- झिंक सल्फेट - पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून फवारणी येणे.
-चिलेटेड झिंक -1 gram प्रतिलिटर पाणी
या पद्धतीने सिंक या खतांचे पाण्यामध्ये द्रावण तयार करून आपण त्याची फवारणी आपल्या पिकावर घेऊ शकतो.
* पिकाला झिंक देण्याची योग्य वेळ कोणती?
पिकाला जिंकत असताना ते विविध टप्प्यामध्ये आणि योग्य प्रमाणात दिलं गेलं पाहिजे. आताही विविध टप्पे कोणते तर ते खालील प्रमाणे
• पिकाची लागवड झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी जिंक द्यावे. जेणेकरून पिकाची वाढ चांगली होईल.
• फुलधारणा कालावधीमध्ये - फुल धरणाच्या वेळेस आपण जिंकणार पिकलेला तर जिंकू आपल्या पिकाला भरपूर फुले लागण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं ताकद मिळत असते.
• झिंक ची कमतरता दिसून आल्यास
पिकामध्ये झिंक ची कमतरता दिसून आल्यास लगेच त्यावरती उपाय म्हणून वरती दिलेल्या पद्धतीने झिंक आपण पिकाला सोडावे.
* कोणकोणत्या पिकांसाठी झिंक फार महत्त्वाचा घटक आहे?
झिंक हा सर्वच पिकासाठी फार महत्त्वाचा अन्नद्रव्य आहे त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते.
सर्व प्रकारची फळ पिके
भाजीपाला पिके
ऊस
कापूस
केळी
द्राक्ष
मोसंबी
संत्री
व इतरही पिकांसाठी झिंक हा फार महत्त्वाचा घटक ठरतो.
* पिकाला झिंक ची मात्रा देताना कोणती काळजी घ्यावी?
- अतिरिक्त डोस देऊ नये.
- फॉस्फरस सोबत जर जिंक देत असाल तर टप्प्याटप्प्याने द्यावा.
- झिंक ची फवारणी करताना शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावी.
- कडक उन्हामध्ये म्हणजे दुपारी फवारणी टाळावी.
* पिकाला झिंक देताना तो कोणत्या घटकांसोबत संयुक्तिक ठरतो?
खालील घटकांसोबत जर झिंक मिक्स केला तर त्याची चांगली परिणाम आपल्या पिकाला दिसून येतात व त्यांची कॉम्पिटेबिलिटी ही योग्य ठरते.
-झिंक + बोरॉन
- झिंक + मॅग्नेशियम
- झिंक + अमायनो ऍसिड
- झिंक + इतर सेंद्रिय घटक.
तर मित्रांनो ही आहे झिंक या अन्नद्रव्याविषयीची विस्तृत माहिती. शेतीमध्ये आपल्या पिकांसाठी विविध अन्नद्रव्य फार उपयुक्त काम करत असतात त्या विविध अन्नद्रव्यांपैकीच एक अन्नद्रव्य म्हणजे जिंक होईल तर पिकामध्ये झिंक कमी असल्यास त्याची कमतरता कशी ओळखावी त्याचा नेमका उपयोग कसा करावा पिकासाठी जो कशा पद्धतीने द्यावा या प्रकारची सर्व विस्तृत माहिती आपल्या या आर्टिकल मध्ये दिलेली आहे.
अशा प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या तसेच आपल्या "यूट्यूब चैनल" ला भेट देऊन "सबस्क्राईब" नक्की करा.
https://youtube.com/@aggroshala?si=ms1-Q-OsXK4AyK2W
