लाल कोळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर ती का होतो? त्याची कारणे काय ?
व त्यावर ती काय उपाय करावे?
मित्रांनो
लाल कोळी हा एक लाल कीटक असतो जो की आपल्या झाडाच्या पानावरती वास्तव्य करतो. झाडाच्या मागच्या बाजूला चिटकून राहतो. आणि आपल्या पानातील रस शोषण करतो. त्यामुळे पाणीही कमजोर पडतात तसेच आपल्या झाडांची वाढे खुंटते.
ही लाल कोळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होण्यामागे काही कारणे आहे.
ती खालील प्रमाणे 👇👇
1. जास्त तापमान
मित्रांनो जास्त तापमान, कमी आद्रता, कोरडे हवामान हे लाल कोळीच्या वाढीसाठी फार अनुकूल असे वातावरण आहे. या वातावरणामध्ये लाल गोळीचा प्रादुर्भाव आपला पिकावरती झपाट्याने वाढतो व नुकसानही मोठ्या प्रमाणात करतो.
2. पिकाला पाण्याची कमतरता
पिकाला पुरेसं पाणी जर नाही मिळालं पाण्याचा संतुलन बिघडलं तर पीकही कमजोर पडतात. आणि कमजोर पिकांवरती या लाल कोळीचा प्रादुर्भाव फार झपाट्याने होतो.
3. रासायनिक घटकांचा अतिवापर
रासायनिक घटकांचा वापर जर आपण संतुलित प्रमाणात जर नाही केला आणि तो जास्त प्रमाणात जर आपण आपल्या पिकावर त्याचा वापर केला. तर त्यामुळे झाड ही बाह्यकिडन रोखू शकत नाही. बाईक किडींचा अटॅक रोखण्या ऐवजी उलट या लाल कोळी सारख्या कीटकांचा अटॅक आपल्या पिकावर जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे रासायनिक घटकांचा वापर करताना तो संतुलित प्रमाणात करावा.
4. शेतामध्ये वाढलेलं तन
शेतामध्ये तणांचे प्रमाण जर वाढला तरी या तणावर्ती लाल कोळी पॅरासाईट म्हणून जगते. येताना वरती लाल कोळी वाढते. आणि नंतर या तानावरून आपल्या पिकावर ती लगेच शिफ्ट होते. त्यामुळे तन जास्त असल्यामुळे ही आपल्या पिकामध्ये लागवडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे शेत हे तन विरहित तनमुक्त ठेवण्यावर भर द्यावी.
5. अन्नद्रव्यांची कमतरता
पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता भासल्यासही आपल्या पिकावर ती लाल कोळी या किटकाचा अटॅक होऊ शकतो. मुख्यतः नायट्रोजन या अन्नद्रव्याची कमतर जर आपल्या पिकामध्ये असेल तर लाल कोळी फास्ट आपल्या पिकावर अटॅक करते व आपल्या पिकाचे नुकसान करते.
" लाल कोळी"च्या प्रादुर्भावामुळे पिकाचे काय नुकसान होते?
लाल कोळी हा कीटक शक्यतो आपल्या पिकांच्या पानावरती अटक करतो पानावरती प्रादुर्भाव दाखवतो.
लाल कोळी च्या अटॅक मुळे
-पिकाचे पाने हे कोम असतात व गळून पडतात.
- पिकांच्या पानावरती पिवळे डाग पडतात.
- पाणी शेंड्यावरती मुरगळतात वजळल्यासारखी दिसतात.
एकंदरीत पान खराब झाल्यामुळे आपल्या पिकाचे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया व अन्य निर्मिती प्रक्रिया मंदावते व त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये घट निर्माण होऊ शकते.
लाल कोळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाय करावे?
लाल कोळीचा प्रादुर्भाव आपण आपल्या पिकांमध्ये काही काम करून किंवा पिकाची काळजी घेऊन रोखू शकतो. आणि लाल कोळीचा प्रादुर्भाव वाढल्यास आपण रासायनिक घटकांचा वापर करू नये या लाल कोळीचा बंदोबस्त करू शकतो.
लाल कोळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
- शेत तणमुक्त ठेवावे
- रासायनिक घटकांचा वापर हा संतुलित प्रमाणात करावा.
- पिकाला पाण्याची कमतरता भासणार नाही याच्याकडे लक्ष द्यावे.
- पिकाला आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघेल याकडे लक्ष द्यावे.
अशा पद्धतीने नैसर्गिकरित्या आपण आपल्या पिकावर ती लाल कोळीचा प्रादुर्भाव टाळू शकतो थांबवू शकतो.
* आणि लाल कोळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर ती वाढल्यास किंवा जास्त प्रमाणात अटॅक झाल्यास आपण रासायनिक घटकांचा वापर करूनही या लाल कोळीचा बंदोबस्त करू शकतो.
यासाठी आपण विविध कीटकनाशकांचा वापर करू शकतो.
टीप - कीटकनाशकांचा वापर करताना आपल्या कृषी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
तर मित्रांनो ही आहे एकंदरीत लाल कोळी या किटका विषयीची विस्तृत माहिती. ही लाल कोळी आपल्या पिकांच्या पानावरती प्रादुर्भाव दाखवून पाणी खराब करून आपल्या अन्य निर्मितीमध्ये अडथळा तयार करू शकते. ज्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये घट निर्माण होते. वरील उपायांच्या मदतीने आपण या लाल कोळीचा बंदोबस्त आपल्या पिकामध्ये करू शकतो.
अशा शेती विषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला फॉलो जरूर करा.
https://youtube.com/@aggroshala?si=ThCjm8sH7Dupjn4W
