सेंद्रिय शेती म्हणजे काय? फायदे, तोटे, अनुदान, बाजारपेठ जाणून घ्या विस्तृत माहिती.

सेंद्रिय शेती म्हणजे काय? फायदे, तोटे, अनुदान, बाजारपेठ जाणून घ्या विस्तृत माहिती.

सेंद्रिय शेती म्हणजे काय? 
सेंद्रिय शेती म्हणजे काय? फायदे, तोटे, अनुदान, बाजारपेठ जाणून घ्या विस्तृत माहिती.
सध्याच्या परिस्थितीमध्ये शेती या क्षेत्रामध्ये रासायनिक खतांचा तसेच रासायनिक कीटनाशकांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. या रासायनिक घटकांच्या वापरामुळे मातीची सुपीकता कमी होत आ
हे
. तसेच पाण्याचेही प्रदूषण होत आहे. आणि या कारणामुळेच मानवी आरोग्यास धोका निर्माण होत आहे. या समस्यांची निवारण करण्यासाठी एक शाश्वत असा शेती पर्याय म्हणजेच सेंद्रिय शेती होय. सेंद्रिय शेती करत असताना रासायनिक घटक रासायनिक कीडनाशक यांचा वापर टाळून पूर्णतः नैसर्गिकरीत्या शेती पिकवली जाते.

A) सेंद्रिय शेती म्हणजे काय
?🤔🤔
सेंद्रिय शेती म्हणजेच रासायनिक कीटकनाशक रासायनिक खते या घटकांचा वापर टाळून पूर्णतः निसर्गावर अवलंबित अशी नैसर्गिक घटकांचा वापर करून केलेली शेती म्हणजेच सेंद्रिय शेती होय. यामध्ये मातीचे प्रदूषण टाळणे, पाण्याचा प्रदूषण टाळणे, रासायनिक घटकांचा वापर टाळणे, मातीची सुपीकता वाढवणे, जैवविविधता टिकवणे, आणि पर्यावरण संतुलन राखणे या उद्दिष्टांचा समावेश सेंद्रिय शेतीमध्ये होतो.

B) सेंद्रिय शेती आवश्यक का आहे?🤔🤔
सध्याच्या परिस्थितीमध्ये शेती करत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांचे निवारण म्हणूनच सेंद्रिय शेती या पर्यायाचा वापर आपण करू शकतो.
पुढील समस्या सध्याच्या शेतीमध्ये दिसून येत आहेत
- मातीची सुपीकता घटने.
- रासायनिक घटकांचा मानवी आरोग्यावर परिणाम होणे.
- कीटकांचा वाढता प्रादुर्भाव.
- पाण्याचे व मातीचे प्रदूषण.
- शेती करण्यासाठी लागणारा वाढीव खर्च.

या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती होय.

C) सेंद्रिय शेतीचे उद्दिष्टे
🤔🤔
1- मातीचे आरोग्य जपणे
माती म्हणजेच शेती. माती जेवढी आरोग्यदायी व सुखी असेल तेवढ्या चांगल्या पद्धती शेती आपण करू शकतो. त्यामुळे मातीचा आरोग्य हा चांगला असणं फार गरजेचे आहे. विविध रासायनिक घटकांचा वापर केल्यामुळे मातींचा आरोग्य खराब होत आहे मातीचा पोत ढासळत आहे. त्यामुळे मातीचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी व मातीचा पोत चांगला राहण्यासाठी केंद्र शेती हा योग्य पर्याय आहे.
2- नैसर्गिक संसाधनांचा वापर
निसर्गतः आपल्याला बरेचसे संसाधन उपलब्ध आहेत . या संसाधनांचा वापर करूनच आपण आपली शेती पिकवू शकतो. त्यामुळे बाह्य कृत्रिम अशा संस्थांचा वापर टाळा जाईल व नैसर्गिक घटकांवर आधारित अशी शेती पिकवली जाईल.
3- जैवविविधता वाढवणे
आधुनिक शेतीमध्ये विविध रासायनिक घटकांचा वापर केल्यामुळे जमिनीमध्ये आवश्यक जे काही जैविक घटक आहेत त्या घटकांचा नाश होत आहे. व त्याचा असर आपल्या जैवविविधतेवरही पडत आहे. त्यामुळे जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी सेंद्रिय शेती करणे गरजेचे आहे.
4- रासायनिक घटक टाळणे.
वरील सर्व समस्यांचे निवारण म्हणजेच रासायनिक घटकांचा वापर टाळणे. कारण रासायनिक घटकामुळेच आपल्या जैवविविधता नाश होत आहे, मातीची सुपीकता घडत आहे, पाण्याचा प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे रासायनिक घटकांचा उपयोग टाळणे सेंद्रिय शेती मधला एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

D) सेंद्रिय खतांचे प्रकार
1- शेणखत
गाई म्हशींच्या शेणापासून तयार होणारे खत म्हणजेच शेणखत. या घटकाच्या वापरामुळे आपल्या जमिनीमध्ये आवश्यक असे जिवाणू तयार होतात. हो मातीसाठी उपयुक्त असा चांगल्या पद्धतीचा ह्यूमस ही तयार होतो.
2- कंपोस्ट खत
शेतीमध्ये पडलेल्या विविध काडीकचऱ्यांचा एका ठिकाणी ढीग घालून तो गाडी कचरा साडू घालने. या प्रक्रियेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे व दर्जेदार खत तयार होतं. या खतांच्या वापरामुळे जमिनीचा कसही सुधारतो.
3- गांडूळ खत
गांडूळाच्या सहाय्याने तयार केलेले खत म्हणजेच खांडोळखत. हे खत एकदम भुसभुशीत व एकदम दर्जेदार अशा पद्धतीचा खत असतं. याच्या वापराने आपल्या जमिनीचा पोत सुधारतो.
4- जीवामृत
मातीला जिवंत करणारं असं एक जल म्हणजेच जीवामृत. हे एक नैसर्गिकरित्या तयार केलेलं जैविक खतच आहे. यामध्ये गाईचे शेण, गायी चं मूत्र, गुळ, व बेसन या घटकांचा समावेश होतो. या सर्व घटकांच्या मिश्रणातून हे जीवामृत तयार केला जातो. या जीवामृताच्या वापरामुळे जमिनीला व मातीला एक चांगल्या पद्धतीचे जीवन मिळत.

E) सेंद्रिय पद्धतीने कीड व रोग यांच्यावर नियंत्रण.🐞🦗🐞
पिकांवरती विविध किडींचा तसेच रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता जैविक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने या कीटकांचा व रोगांचा नायनाट करणे व आपल्या पिकांचा बचाव करणे या प्रक्रियेमार्फत केला जातो.
त्यामध्ये
- नीम तेल फवारणी
- पिकामध्ये ट्रॅप बसवणे
- फोरमोन ट्रॅप बसवणे.
- प्रकाश सापळे
- ताक अंडी चा वापर
- दशपर्णी अर्क
या घटकांचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने कीटकांचा व रोगांचा बंदोबस्त केला जातो.

F) सेंद्रिय शेतीमधील तंत्रज्ञान 🌿🌿
1- पिकांचा फेरपालट
जमिनीमध्ये वारंवार एकच पीक घेतल्याने जमीन ही नापीक होते. व याचा परिणाम आपल्या उत्पादनावर होतो. यासाठी सेंद्रिय शेतीमधील तंत्रज्ञान म्हणजेच पिकांचा फेरपालट. यामुळे आपल्या जमिनीचा पोच सुधारतो व उत्पादनामध्ये ही वाढ होते.
2- मिश्र पीक पद्धती
दोन किंवा दोनपेक्षा अधिक विविध पिकांची एक सोबत लागवड करणे व त्याच्या माध्यमातून भरपूर उत्पन्न मिळवणे.
3- आच्छादन
मातीवर पाला पाचोळा व काळ्यांच्या आच्छादन टाकून आपल्या जमिनीचा ओलावा टिकून ठेवणे. त्यामुळे उपाय कारक व आरोग्यदायी अशा बुरशी जमिनीमध्ये तयार होतात त्या जिवंत राहू शकतात. व त्याचा फायदा आपल्या पिकांना होत असतो .
उदा. रायझोबियम

G) सेंद्रिय शेतीचे फायदे ✅✅
1- पर्यावरण पूरक
सेंद्रिय शेतीमुळे पर्यावरणाची हानी होत नाही. सेंद्रिय शेतीमुळे पर्यावरण हे टिकून राहते व आपली शेती ही पिकवली जाते.
2- खर्च कमी होतो.
आधुनिक व रासायनिक शेतीच्या प्रमाणात सेंद्रिय शेतीमध्ये खर्च हा फार कमी लागतो.
3- मातीची सुपीकता वाढते
विविध रासायनिक घटकांचे वापरामुळे मातीचा पोत खराब होतो व मातीच्या आरोग्य खराब होते. मात्र शीत सेंद्रिय शेतीमुळे आपल्या मातीही सुपीक बनते व मातीची शुभेच्छा चांगल्या पद्धतीची वाटते.
4- उत्पादनाची गुणवत्ता सुधारते
सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जे उत्पादन आपण मिळवतो ते एकदम नैसर्गिक रित्या मिळवलेला असल्यामुळे त्याची गुणवत्ताही सुधारलेली असते.
5- पाण्याची बचत
सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून असे उपक्रम राबवले जातात ज्यामुळे आपल्या जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो. व जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते. त्यामुळे बाह्य पाणी देणे कमी होतं व आपल्या पाण्याची बचत होते.

H) सेंद्रिय शेतीचे तोटे
❌❌
1- सुरुवातीला उत्पादन कमी मिळते.
सेंद्रिय शेती हा दीर्घकालीन असा उपक्रम आहे. त्याच्यामुळे समोरच्या काळामध्ये आपल्या शेतीचे उत्पादन वाढत असतं. मात्र सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या उत्पादनामध्ये घट निर्माण होत असते. त्यामुळे हा सेंद्रिय शेतीचा तोटा आहे.
2- बाजारपेठ मिळवणे कठीण
सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पिकवलेले पीक यांच्यासाठी आधुनिक अशी बाजारपेठ मिळवणे कठीण होते. त्यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांचा मल हा विकला जात नाही. माझ्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होते.
3- मेहनत जास्त लागते
सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून राबवले जाणारे उपक्रम हे जास्तीचे वेळ खाऊ व मेहनत लागणारे आहे. कारण या उपक्रमामध्ये आधुनिक तंत्रज्ञान किंवा रासायनिक घटक यांचा वापर न करता नैसर्गिकरीत्या नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. व त्यामुळे या प्रक्रियेमध्ये जास्त मेहनत लागते.


I) सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सेंद्रिय शेती सुरू कशी करावी?
खालील काही प्राथमिक उपक्रम आहे जे राबवल्यानंतर आपण आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय शेती या प्रयोगाचा उपयोग करू शकतो.
त्यामध्ये सुरुवातीला
- रासायनिक खतांचा व रासायनिक कीटकनाशकांचा वापर सावकाश सावकाश कमी करावा व शेवटी पूर्णतः टाळावा
- सेंद्रिय शेती करण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा.
- शेतामध्ये सेंद्रिय खते तयार करावे शेणखत गंडूळ खत यासारखे प्रोजेक्ट करावे.
- जैविक कीटकनाशकांचा वापर करावा.
- माती परीक्षण करूनच शेतीला सुरुवात करावी
- पिक लावत असताना स्थानिक वाणांचाच वापर करावा
- पिकांची फेरपालट करावी.
- एकच पीक परत घेणे टाळावे.

वरील उपक्रमांच्या माध्यमातून आपण सेंद्रिय शेतीचा प्रोजेक्ट आपल्या शेतामध्ये सुरू करू शकतो.

J) सेंद्रिय शेती प्रमाणपत्र

सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पादन केलेले पीक हे बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी सेंद्रिय शेतीचे प्रमाणपत्र आवश्यक असते. हे प्रमाणपत्र शेतकऱ्याजवळ उपलब्ध नसेल तर तो मल सेंद्रिय शेतीच्या पद्धतीनेच पिकवलेला आहे यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो व तो मल विकल्या जात नाही.
भारतामध्ये यासाठी लागणारे प्रमाणपत्र
- PGS- participatory guarantee system
-NPOP- National program for Organic production


K) सेंद्रिय शेतीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स.✍️✍️
- पिकांची निवड करताना स्थानिक जातींच्या पिकांची निवड करावी.
- पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.
- मातीचा आरोग्य सुधारण्यावर लक्ष द्यावे.
- मातीचा पोच सुधारण्यासाठी विविध सेंद्रिय खतांचा वापर करावा
- मातीचे आरोग्य नियमित तपासावे


निष्कर्ष✅✅
सेंद्रिय शेती हा फक्त शेतीचा एक पर्याय नसून ती एक जीवनपद्धती आहे. या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपण येणाऱ्या पिढ्यासाठी शेती जिवंत ठेवू शकू. कारण बेसुमार रासायनिक खडकांचे वापरामुळे आपली शेती ही मरण अवस्थेकडे वाटचाल करत आहे. तसेच रासायनिक घटकांचे वापरामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होत आहे. मानवी आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा सेंद्रिय शेती हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.


शेती विषयक महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला फळ करून घ्या.
https://youtube.com/@aggroshala?si=cCCN1b3XwjK0fE5P

Sunil

Sunil

“मी सुनील, या वेबसाईटचा मालक. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि शेतीसंबंधित माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे.”