नांगरणी करण्याची योग्य पद्धत व फायदे?

नांगरणी करण्याची योग्य पद्धत व फायदे? जाणून घ्या विस्तृत माहिती!

नांगरणी करण्याची योग्य पद्धत व फायदे?

नांगरणी करण्याची योग्य पद्धत व फायदे?

मिरची लागवड 2026 “तलवार” या मिरची वाणाचे फायदे काय? जाणून घ्या विस्तृत माहिती!

मित्रांनो,
शेतीची मशागत करत असताना सर्वात महत्त्वाचा व सर्वात प्राथमिक टप्पा म्हणजे आपल्या शेताची नांगरणी होय. योग्य पद्धतीने नांगरणी करणे म्हणजेच आपल्या पिकाची चांगले काळजीसाठी केलेली मशागत होय. आपल्या शेताची मशागत केली चांगली झालेली आहे याच्यावर आपल्या पिकाची क्वालिटी, दर्जा ठरत असतो. त्यामुळे योग्य पद्धतीने नांगरणी केल्यामुळे आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये फायदा होऊ शकतो. तसेच नांगरणी केल्यामुळे शेतामध्ये तन कमी होणे, मातीची रचना सुधारणे, जमीन तापणे या सर्व गोष्टीमुळे आपल्याला आपल्या पिकासाठी फायदा होत असतो.

* नांगरणी का केली पाहिजे?


वरती सांगितल्याप्रमाणे नांगरणी हा आपल्या शेती मशागत मधला सर्वात महत्त्वाचा व प्राथमिक टप्पा आहे. योग्य नांगरणीवरच आपल्या पिकाचे उत्पादन ठरणार असतं. ही नांगरणी का केली पाहिजे तर याची माहिती खालील प्रमाणे.

1- माती भुसभुशीत होते

नांगरणी केल्यामुळे खालची माती वरती येते व वरची माती खाली जाते. विविधता नमुना मातीचे गोळे तयार होतात जे की मुलाला चिकटलेले असतात ते गोळे तुटून माती हि मोकळी होते ढिसूल व भूसभूशीत होते. भुसभुशीत झालेल्या मातीमध्ये पिकाला चांगली वाढ मिळते,हवा खेळती राहते,नायट्रोजन मिळतो त्यामुळे आपल्या पिकाची वाढ चांगली होते.

2- शेतामधील तन कमी होतं.
मित्रांनो अगोदरच्या घेतलेल्या पिकांमध्ये जे आपल्या शेतामध्ये तन उगलेल असतं. त्यातना मधील बियाणे हे आपल्या जमिनीमध्ये पडतं. व त्यामुळे पुढच्या वेळेस पाऊस पडला तर अतिरिक्त व मोठ्या प्रमाणात पण आपल्या शेतामध्ये उगवू शकतो. जसा परिणाम थेट आपल्या पिकावरती होता तो आपल्या पिकाची चांगली वाढ होत नाही पिकला मिळणारे सूक्ष्म अन्नघटक हे तन ओढून घेत असत.
मात्र नांगरणी केल्यामुळे जमीन तापते,माती तापते वयात आपल्याला मातीमध्ये जे तणाचे पडलेले बी आहे ते जळून जातं किंवा त्याची उगवण क्षमता नष्ट होऊन जाते. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर हेच अतिरिक्त तन आपल्या शेतामध्ये उगणार असतो ते उगत नाही. त्यामुळे नांगरणी केल्यामुळे आपल्या शेतातील तन हे कमी होत असतं.

3- पिकाची मुळे खोलवर जातात व चांगली वाढ मिळते.

जमीन नांगरल्यामुळे जमीन ढिली होती, माती मोकळी होते. या नांगरलेल्या जमिनीमध्ये आपण परत रोटावेटर किंवा कल्टीवेटर करत असतो. ज्यामुळे आपली जमीन ही आणखी भुसभुशीत होते. त्यामुळे मातीमध्ये हवा खेळती राहते,हवेमध्ये असताना नायट्रोजन आपल्या पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचतो व त्यामुळे आपल्या पिकाला चांगली वाढ मिळते तसेच उत्पादन चांगला लागत.

4- मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते.

एकंदरीत मशागतीचा जो उद्देश असतो तो हा ही एक उद्देश आहे की आपल्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारणे. जमीन नांगरल्यामुळे भुसभुशीत होते व त्यामुळे आपल्या जमिनीचा किंवा मातीचा पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही सुधारते.

5- घातक बुरशी व कीटकांचा नाश होतो
.
मित्रांनो नांगरणी केल्यामुळे खालची माती वरती येते व वरची माती खाली जाते. ज्यामुळे आपल्या जमिनीमध्ये असणारे जे विविध घातक बुरशी किंवा कीटक आहे ते वरच्या थरावर देतात. वर्षा थरामध्ये माती गरम होते कोणाच्या तडाख्यामुळे एकदम गरम होऊन या वरच्या थरामध्ये असणारे घातक बुरशी किंवा कीटक आहेत हे मरून जातात. व त्यामुळे आपल्या पिकाला या बुरशींपासून होणारे जो धोका आहे त्यापासून आपल्या पिकाचा बचाव होतो.

अशा पद्धतीने वरील फायदे आपल्या पिकाला आपल्या मातीला योग्य पद्धतीने नागरणी केल्यामुळे होत असते. त्यामुळे जमिनीची मशागत करत असताना नांगरणीला फार महत्त्व आहे. नांगरणी केल्यामुळे आपल्या पिकाची वाढ चांगली होते, शेतामधील तन कमी होतं, पिकाची व मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते व या सर्व बाबींमुळे आपल्या उत्पादनामध्ये भर पडू शकते.

* योग्य पद्धतीने नांगरणी कशी करावी?

मित्रांनो
आपण नांगरणी कशी करावी किती खोल करावी किती वेळेस करावे या सर्व प्रश्नांची उत्तरे ठरतात हे आपल्या जमिनीचे प्रकार वरती. ज्या प्रकारची आपली जमीन आहे त्या प्रकारानुसार आपण आपल्या शेताची नांगरणी करत असतो.
काळी जमीन असल्यास नांगरणी खोल केली तरी हे काही प्रॉब्लेम होत नाही कारण मातीचा थर हा खोलपर्यंत असतो. त्यामुळे खालची मातीवर येणे वर्षी माती खाली जाणे यामुळे मातीचा पोत सुधारतो. व जमीनही तापते.
मात्र थोडी मुरमाड जमीन असल्यास किंवा ज्या ठिकाणी मातीचा थर कमी आहे अशा ठिकाणी आपण खोल नांगरणी करू शकत नाही. कारण अशा ठिकाणी मातीचा तर हा कमी असून खाली खडक लागण्याची किंवा दगड लागण्याची किंवा मुरूम लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जमिनीमध्ये खोलगट नांगरणी न करता वरच्या वरती नांगरणी करावी लागते.
बरेच शेतकरी नांगरणी करत असताना "दोनदा" नांगरणी करत असतात. ज्यामुळे जमीन आणखी व चांगली भुसभुशीत होते.
पहिली नांगरणी करत असताना ती खोल म्हणजे सहा ते नऊ इंच इतकी खोल नांगरणी केली जाते. ज्यामुळे जमिनीपासून मध्ये असणारे घातक बुरशी व कीटक हे वरती येतात व ऊणाच्या तडाख्यामुळे मरून जातात. व लगेच यानंतर दुसरी नांगरणी जी की हलक्या स्वरूपाची व जास्त खोल ण लावता वरच्या वरती केली जाते.
या दोन्ही नांगरणी मध्ये नांगरणी करण्याची दिशाही अलटून पालटून बदलली जाते. म्हणजे परिणामी करताना जर पूर्व पश्चिम केली असेल तर दुसरी नांगरणी ही उत्तर दक्षिण या पद्धतीने केली जाते.

अशा पद्धतीने मातीच्या स्वरूपावरून किंवा विविध प्रदेशावरून वेगवेगळ्या प्रकारची व खोलीमध्ये कमी जास्त प्रमाण अशा पद्धतीने नागरणी केली जाते. आपण आपल्या मातीची लॅब टेस्ट जरूर करावी. जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आपली माती कोणत्या प्रकारची आहे मातीमध्ये आपण कशा पद्धतीची नागरणी करू शकतो.

* जमिनीची नांगरणी करताना कोणती काळजी घ्यावी?


- जमिनीचा दर्जा पाहून नांगरणी ठरवावी. म्हणजे ओला जमीन असो किंवा जास्त कोरडी देऊन असो तर अशा तऱ्हेने मध्ये नांगरणी थोडा लेट कराव.
- जमिनीचा प्रकार बघूनच नांगरणी करावी. खोल करावी की कमी खोल करावी हे त्या प्रकारावरून ठरत असतं.
- खोल नांगरणी करत असताना ती प्रत्येक वेळेस करू नये.
- व आपण आपल्या जमिनीमध्ये कोणत्या पिकाचे नियोजन करत आहोत त्यानुसार नांगरणी करावी.

मित्रांनो ही आहे नांगरणी नेमकी कोणत्या पद्धतीने व कशी करावी?याची नेमके फायदे काय होतात? याबद्दलची विस्तृत माहिती. वरील माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. 🙏🙏


अशा शेती विषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या youtube चॅनलला जरूर भेट द्या व फॉलो करायला विसरू नका 🙏🙏🙏

https://youtube.com/@aggroshala?si=9eIkSYmqkCazwYgU

Sunil

Sunil

“मी सुनील, या वेबसाईटचा मालक. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि शेतीसंबंधित माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे.”