अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026. जाणून घ्या विस्तृत माहिती!

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026

महाराष्ट्र शासन पुरस्कृत अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026. 2026 -27 यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना या योजनेची घोषणा केली गेली आहे. ज्याद्वारे कर्जबाजारी शेतकऱ्यांची किंवा थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे पिककर्ज कर्ज माफ केले जाणार आहे. ही योजना महाराष्ट्रातील कर्जबाजारी किंवा थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांना उभारी देण्यासाठी राबवली जाणार आहे. वरील योजनेच्या माध्यमातून मुख्यतः शेतकऱ्यांसाठी लाभ मिळावा हे उद्दिष्ट समोर ठेवलेले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसेच शेतकऱ्यांचा उत्पादनामध्ये झालेली घट या दोन्ही प्रॉब्लेम्स ना सोल करण्यासाठी वरील योजना राबवली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच या योजनेची विस्तृत माहिती आपल्या खालील लेखांमध्ये दिलेली आहे. या योजनेचे निकष,पात्रता,योजनेसाठी लागणारे कागदपत्र, येण्यासाठी पात्र आहे व योजनेचे माध्यमातून किती कर्ज माफी मिळणार आहे?या सर्व मुद्द्यांची विस्तृत माहिती दिलेली आहे.

*अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 मुख्य उ्दिष्टे :-


- ज्या शेतकऱ्यावर थकीत कर्ज आहे व जे कर्जाच्या उद्याखाली दाबेली शेतकरी आहे त्यांना आर्थिक दिलासा देणे.
- शेतकऱ्यांनी पुन्हा शेती करावी यासाठी शेतकऱ्यांना ताकद देणे.
- थकलेले पीक कर्ज याचा भार कमी करणे.
- तसेच नियमित बँका भरणाऱ्या व कर्जफेड करणारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम देणे.

वरील उद्दिष्टांना समोर ठेवून ही योजना राबवली जाणार आहे.

* अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 मुख्य निकष:-

-या योजनेद्वारे प्रत्येक शेतकऱ्याचे थकीत कर्ज असलेले कर्ज हे फक्त "2 लाखांपर्यंतच" माफ केले जाणार आहे.
- या कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे फक्त पीक कर्ज आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी थकीत कर्ज आहे "30 सप्टेंबर 2025 " पर्यंत असाव.
- तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारद्वारे प्रोत्साहन पर 50 हजार रुपये रक्कम मिळणार.

* अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 साठी पात्रता काय आहे?


- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- घेतलेले कर्ज हे पीक कर्ज या कॅटेगरीमध्ये असावं.
- थकीत कर्ज हे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकित असाव.
- बँक खात्याशी मोबाईल नंबर तसेच आधार कार्ड लिंक असाव.

वरील पात्रता पूर्ण करणारा शेतकरी या योजनेसाठी लाभार्थी ठरू शकतो.

* अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज माफी योजना या योजनेद्वारे कोणत्या बँकेमधील कर्ज माफ होणार आहे?

या योजनेद्वारे खालील बँकांमध्ये असणारे कर्ज माफ होईल.
- राष्ट्रीयकृत बँकांमध्ये असलेले कर्ज माफ होईल.
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये असलेले कर्ज माफ होईल.
- पतसंस्थांद्वारे घेतलेल्या कर्ज माफ होईल.
- व सहकारी बँकांच्या माध्यमातून घेतलेले पीक कर्ज माफ होईल.

(याबाबतीत अजून स्पष्टता आलेली नाहीये ही स्पष्टता सरकार जेव्हा जीआर काढेल किंवा नोटीस काढेल तेव्हा लक्ष देईल )

* अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज माफी योजना चा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे?


- वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये

- लाभार्थ्याची आधार कार्ड
- जमिनीचा सातबारा उतारा
- बँक पासबुक
- कर्ज असलेल्या खात्याचा तपशील
- मोबाईल नंबर
- ग्रामपंचायतचा तसेच तहसीलचा रहिवासी दाखला
- पीक कर्ज प्रमाणपत्र
वरील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

* अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज माफी योजनेसाठी अर्ज कसा करावा?


- अजून सरकारने अर्ज करण्याविषयीची स्पष्ट पद्धत सांगितलेली नाहीये किंवा तसा जीआर अजून काढलेला नाही. याविषयीची नोटिफिकेशन झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकतो. तरी एक साधारण प्रोसेस खालील प्रमाणे असू शकते.

- ऑनलाइन पोर्टल वरती किंवा बँकेमध्ये अर्ज करू शकतो.
- कर्जदाराच्या कागदपत्रांची पडताळणी होईल.
- जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे त्यांची यादी जाहीर केली जाईल.
- आणि थेट रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये टाकले जाईल किंवा असलेल्या कर्जाची माफी दिली जाईल.

www.aggroshala.com

* महत्त्वाच्या सूचना.
या योजनेविषयीची वरती दिलेली माहिती ही अवेलेबल माहिती वर आधारित आहे. म्हणजे सरकारने अजून स्पष्टपणे कोणताही जीआर काढलेला नाही.

- शासनाचा अंतिम GR वारंवार तपासा.
- बँकेमध्ये जाऊन चौकशी करा.
- फसव्या लिंक किंवा कर्जमाफी साठी मध्यस्थी करणारे एजंट पासून सावधान रहा.
- आपली गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका.
- सातबारा आधार कार्ड मोबाईल नंबर व बँक खात्याची लिंक या गोष्टी अद्यावत करून घ्या.

निष्कर्ष:- या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांवर बऱ्याच दिवसापासून कर्जमाफी तिकीट आहे अशा सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. ही कर्जमाफी दोन लाखांपर्यंत मिळणार आहे. अजून स्पष्टपणे सरकारने या विषयाचा जीआर काढलेले नाही त्याची जीआर ची वाट बघा त्यानंतर दिलेल्या प्रोसेस नुसार आपली प्रक्रिया पूर्ण करा.


अशा शेती विषयक महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या व सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🙏🙏

https://youtube.com/@aggroshala?si=4PV_tycqj3IaWuFa

Sunil

Sunil

“मी सुनील, या वेबसाईटचा मालक. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि शेतीसंबंधित माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे.”