सोयाबीन पीक व्यवस्थापन 2026.

सोयाबीन पीक व्यवस्थापन 2026. जाणून घ्या विस्तृत माहिती!

सोयाबीन पीक व्यवस्थापन 2026
सोयाबीन पीक व्यवस्थापन 2026.

मित्रांनो,
सोयाबीन हे एक महत्त्वपूर्ण असं खरीप पीक आहे. महाराष्ट्रातील प्रमुख पिकांमध्ये या पिकाची गणना होते. महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन या पिकाची पेरणी केली जाते. पिकाचे योग्य व्यवस्थापन, खतांचे योग्य व्यवस्थापन व पेरणी व बियांचे व्यवस्थापन केल्यास आपल्या शेतकऱ्यांना सोयाबीनचे एकरी चांगले उत्पादन मिळू शकत.

* सोयाबीन पीक व्यवस्थापनासाठी/लागवडीसाठी योग्य प्रकारचे हवामान व जमीन कोणती?

- सोयाबीन या पिकासाठी योग्य हवामान व योग्य जमिनीमध्ये सोयाबीनचा पेरा केला तर आपल्या उत्पादनामध्ये भर पडू शकते.
- साधारणतः मध्यम पाऊस व उबदार हवामान हे सोयाबीनच्या वाढीसाठी फार उपयुक्त असं हवामान ठरतं
- 24°c ते 30°c हे अगदी उत्तम तापमान सोयाबीन या पिकासाठी ठरू शकत.
- मातीच्या बाबतीत किंवा जमिनीची बाबतीत विचार केलास, योग्य पाण्याचा निचरा होणारी मध्यम काळी अशी जमीन सोयाबीन या पिकासाठी फार उपयुक्त ठरते.
- सोयाबीन पिकाची पेरणी करत असताना आपल्या जमिनीचा सामू ph तपासून घ्यावा.
हा जमिनीचा सामू 6 ते 7.5 इतका असावा.

* सोयाबीन फिरण्यासाठी पूर्वतयारी काय करावी?

- सोयाबीन पेरणीपूर्वी जमिनीची खोलगट नांगरणी करून घ्यावी.
- जमीन भुसभुशीत होण्यासाठी रोटावेटर किंवा कल्टीवेटर करून घ्यावे.
- जमिनीत पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी पाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था करावी.

* सोयाबीन लागवडीसाठी कोणते बेस्ट सुधारित वाण आहेत?

- सध्या सोयाबीनचे भरपूर प्रकारचे वाण मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आपल्या जमिनी नुसार आपण योग्य त्या वाणाची निवड करू शकतो. तसेच आपल्या भागातील पाण्याचा वातावरण किंवा हवामान कोणत्या प्रकारचा हे त्यानुसारही आपण योग्य त्या सोयाबीन वाणाचा आपल्या शेतामध्ये लागवडीसाठी उपयोग करू शकतो.
महाराष्ट्र मध्ये लोकप्रिय असलेले काही वाण खालील प्रमाणे.

- MAUS 71
-MAUS-175
-JS-335
-JS-935
-KDS -726
-फुले संगम

www.aggroshala.com

* सोयाबीन पेरणी व्यवस्थापन
- महाराष्ट्र मध्ये साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनचा पाऊस पडायला सुरुवात होते. योग्य असा पाऊस पडल्यानंतर व वापस आल्यानंतर आपण आपल्या शेतामध्ये सोयाबीनचा पेरा करू शकतो.
- जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते जुलै च्या पहिल्या आठवड्या पर्यंत आपण सोयाबीन आपल्या शेतामध्ये पेरू शकतो.

* सोयाबीन पेरताना एकरी किती बियाणे वापराव?
- सोयाबीन फिरताना बियाण्याचा प्रमाण हे बऱ्याचदा बियाण्याच्या आकारावरूनही ठरत असतं.
साधारणतः
- "एकरी 25 ते 30" किलो बियाणे आपण आपल्या शेतामध्ये पेरू शकतो.

* बीज प्रक्रिया
सोयाबीन पेरणी करण्या अगोदर आपल्या बियाणाची बीज प्रक्रिया नक्की करावी.
त्यासाठी
- पीएसबी कल्चर
- रायझोबियम
- तसेच सोबत विविध बुरशीनाशकांचा वापर आपण बीज प्रक्रियेमध्ये करू शकतो.

* खत व्यवस्थापन
- सोयाबीन फिरत असताना सोयाबीन सोबत आपण विविध खत वापरत असतो. त्यामध्ये योग्य त्या खतांचीच टाकणी आपण करायला हवी.

त्यामध्ये
-DAP - प्रति एकर 50 किलो
- म्युरेट ऑफ पोटॅश - 10-15 kg
- व गंधक युक्त खत.

* रोग व कीड व्यवस्थापन
- सोयाबीन उन्हाळ्यानंतर बऱ्याचशा कीटकांचे तसेच रोगांचे प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन या पिकावर होत असतो. या रोगांचा लक्षणा आढळल्यास वेळीच उपाय करून त्याचा बंदोबस्त करावा.

सोयाबीनवर अटॅक करणारे कीड
- खोडमाशी
- पाणी गुंडाळणारी माशी
- तंबाखू अळी

प्रमुख रोग
- पिवळा मोझॅक
- खोडकूच
- मुळकुज

नियंत्रण कसे करावे.
- खतांची औषधांची योग्य मात्र देऊन पिकांचे आरोग्य सुधारण्यावर भर द्यावा.
- किडींचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यास कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन योग्य त्या कीटकनाशकांची फवारणी करावी.


महत्वाचे
- सोयाबीनची पेरणी करत असताना वेळेवर करावी जेणेकरून पिकाची योग्य वाढ व योग्य वातावरण मिळाल्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये भर पडतो.
- पेरण्यासाठी बी वापरताना चांगल्या क्वालिटीचे व योग्य प्रमाणात वापरावे.
- पेरणीपूर्वी बियाणावर बीज प्रक्रिया नक्की करा.
- शेतामध्ये तन होऊ देऊ नका योग्य दातांनाशकांचा वापर करून लगेच तणांचा नायनाट करा.
- रोगावरती लक्ष ठेवा लक्षणे दिसल्यास त्वरित फवारणी करा.

अशा पद्धतीने योग्य वेळी योग्य खत व्यवस्थापन व पूर्णतः योग्य काळजी केल्यास आपल्या सोयाबीनचे एकरी चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकते.

सोयाबीन पीक व्यवस्थापन 2026
सोयाबीन पीक व्यवस्थापन 2026
सोयाबीन पीक व्यवस्थापन 2026
सोयाबीन पीक व्यवस्थापन 2026


अशा शेती विषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या व सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🙏✅✅
https://youtube.com/@aggroshala?si=p-zVxXDWJ-Kmy48d

धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



Sunil

Sunil

“मी सुनील, या वेबसाईटचा मालक. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि शेतीसंबंधित माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे.”