मल्चिंग पेपर चे फायदे काय आहेत? उत्पादनात वाढ होते का?

मल्चिंग पेपर चे फायदे काय आहेत? उत्पादनात वाढ होते का? जाणून घ्या विस्तृत माहिती!

मल्चिंग पेपर चे फायदे काय आहेत? उत्पादनात वाढ होते का?
मल्चिंग पेपर चे फायदे काय आहेत? उत्पादनात वाढ होते का?
मल्चिंग पेपरचा वापर हा आधुनिक शेतीचा एक आधुनिक तंत्रज्ञान आहे. या मल्चिंग पेपर द्वारे आपण आधुनिक शेती आपल्या शेतामध्ये राबवू शकतो. ही मल्चिंग पेपरचे शेतीमध्ये बरेचसे फायदा होतात त्या फायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा वेळही वाचतो खर्चही वाचतो आणि त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते.

* मल्चिंग पेपर म्हणजे काय?

– मल्चिंग पेपर हे पिकांच्या लागवडीच्या वेळी जमिनीवर अंथरले जाणारे प्लास्टिक /बायोडिग्रेडेबल शीट आहे. या मल्चिंग पेपरचा वापर शक्यतो फळ पिके व भाजीपाला पिके यांच्या शेतीमध्ये जास्तीत जास्त केला जातो. मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे फळपिके, भाजीपाला पिके, फुल पिके यांच्या वरती शेतकऱ्यांचा अतिरिक्त होणारा खर्च वाचतो अतिरिक्त वेळ वाचते व त्यामुळे उत्पादनामध्ये ही बऱ्यापैकी वाढ होते.

* मल्चिंग पेपरच्या वापरल्यामुळे शेतकऱ्यांचा काय फायदा होतो?

1- पाण्याची बचत होते.
मित्रांनो मल्चिंग चा वापर न करता जेव्हा आपण पिकांची लागवड करतो. तेव्हा पिकाच्या आजूबाजूचा भाग हा डायरेक्ट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊन आपण पिकाला दिलेले पाणी हे बाष्पीभवनमार्फत हवेमध्ये उडून जातं. त्यामुळे आपल्याला पिकाला वारंवार पाणी देण्याची वेळ आपल्या येते. मात्र मल्चिंग पेपर चा वापर जर आपण केला तर आपण पिकाला दिलेलं पाणी हे बाष्पीभवनाच्या माध्यमातून हवेमध्ये उडून न जाता बराच वेळ आपल्या जमिनीमध्ये, मातीमध्ये टिकून राहतं.
व त्यामुळे आपल्याला शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची बचत होते.

2- तन नियंत्रण होते
– मल्चिंग पेपर मुळे आपल्या जमिनीचा बरासाचा भाग हा झाकलेला असतो. आणि झालेल्या भागावर सूर्यप्रकाश हा पडतच नाही. त्यामुळे सूर्यप्रकाश न पडल्यामुळे त्या ठिकाणी विविधतंं जे आपल्या पिकामध्ये शेतामध्ये उगत असतं ते उगवत नाही. त्यामुळे आपला तणनाशकावर होणारा अतिरिक्त खर्च हा वाचतो तसेच तन हे आपल्या पिकाला मिळणारे जे अन्नद्रव्य आहे ती पूर्णतः आपल्या पिकालाच मिळते तना मार्फत खेचले जात नाही. व त्यामुळे आपल्या पिकाची वाढ तसेच सर्वांगीण विकास चांगला होतो.

3- झाडाला उत्पादन चांगलं लागतं.
– झाडाला आवश्यक असणारे जे पोषक अन्नद्रव्ये जमिनीमध्ये असतात. ते पिकापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचतात. तन नियंत्रणात राहिल्यामुळे ही सूक्ष्म अन्नद्रव्ये फक्त पिकांपर्यंत पोहोचतात व त्यामुळे आपल्या पिकाचा चांगला विकास होतो. व झाडाचा चांगला विकास झाल्यामुळे झाड हे चांगलं डेरदार बनत. तसेच त्याला फळही चांगले लागतात. त्यामुळे एकंदरीत आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते.

4- मातीचे तापमान नियंत्रणात राहते.
उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या कडाक्यामुळे जमीन ही जास्त तापते व जास्त तापमानामुळे आपल्या पिकांच्या मुळ्या खोलवर वाटत नाही तसेच पीक हे जळून जाण्याची शक्यता वाढते. मात्र मल्चिंग पेपरच्या उपयोगामुळे हे तापमान नियंत्रणात राहते. तसेच हिवाळ्यातही अति कडाक्याची थंडी असली तरीही आपल्या मातीचे तापमान हे नियंत्रणात व उपदार राहते त्यामुळे आपल्या पिकांच्या मुळ्या चांगल्या वाढतात झाडाची वाढ चांगली होते व झाड चांगले होते.

5- पिकाला खत योग्य प्रमाणात मिळतं.
मित्रांनो आपण जेव्हा ठिबकच्या माध्यमातून आपल्या पिकाला वेगवेगळी खते सोडत असतो तेव्हाही खते मातीच्या माध्यमातून दूरवर पसरतात बऱ्याचदा या खतांचा पाणी केल्यामुळे ते खतही हवेमध्ये उन्हाळ्याची शक्यता असते. मात्र मल्चिंग पेपरच्या उपयोगामुळे हे खत योग्य त्या ठिकाणी पोहोचते झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचते व झाड या खताचा योग्य प्रमाणात शोषण करतो. त्यामुळे खताची मात्रा ही योग्य प्रमाणात आपल्या पिकांपर्यंतच पोहोचते व खत वाया जात नाही.

6- किड ज्यांना व बुरशीजन्य रोग पिकावर कमी अटॅक करतात.
– मशीन पेपरच्या उपयोगामुळे सूर्यप्रकाश हा पेपर वरती पडून रिफ्लेक्ट होतो त्यामुळे विविध कीड ज्यांना रोग किंवा विविध किडे हे आपल्या पिकांपासून दूर राहतात व त्यामुळे पिकावरती कीडचिञ रोगांचा तसेच दृश्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

7- मजुरीचा खर्च वाचतो.
मित्रांनो मल्चिंग पेपर चा वापर न केल्यामुळे जास्त प्रमाणात तन पिकामध्ये वाढत असते शेतामध्ये वाढत असते तसेच विविध किडींचा प्रादुर्भाव होऊन बुरशीजन्य रोगांचा व किडजण्य रोगांचा प्रभाव आपल्या पिकावर होत असतो व त्यामुळे ते नाशकांची फवारणी करावी लागते तसेच तन काढण्यासाठी मजुरांचा वापर करावा लागतो त्यामुळे हा जो अतिरिक्त मजुरांचा खर्च आहे तो फक्त मल्चिंग पेपर वापरल्यामुळे वाचतो.

*मल्चिंग पेपर चे प्रकार कोणकोणते आहेत?


मित्रांनो मल्चिंग पेपर हे विविध प्रकारचे आहेत. यांच्या विविध प्रकारानुसार त्यांची विविध काम आपल्या पिकामध्ये होत असतात त्यांची विविध फायदे आपल्या पिकाला होत असतात. यांच्या प्रकारानुसार फायदे हे खालील प्रमाणे.
• काळा मल्चिंग पेपर-
हा मल्चिंग पेपर तन रहित पीक ठेवण्यासाठी फार उपयोगी ठरतो.त्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये तन वाढत नाही.
• सिल्वर ब्लॅक मल्चिंग पेपर –
हा मल्चिंग पेपर आपल्या पिकातील तन नियंत्रणात करतो तसेच कीड नियंत्रण करण्यासाठी ही उपयोगी ठरतो त्यामुळे या मल्चिंग पेपरचे उपयोगामुळे आपले पीक हे तनमुक्त तसेच कीड मुक्तही होते.
• पारदर्शक मल्चिंग पेपर
या मल्चिंग पेपर मुळे आपल्या पिकातील तापमान वाढीसाठी फायदा होतो. म्हणजे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मातीही उद्धव ठेवण्यासाठी या प्रकारचे मल्चिंग पेपरचा उपयोग आपण करू शकतो.
• बायोडिग्रेडेबल मल्चिंग पेपर
हा मल्चिंग पेपर मातीमध्ये मिसळतो तसेच मातीमध्ये विरघळून जातो.
ही वरील प्रकारची विविध मल्चिंग पेपर्स बाजार मध्ये अवेलेबल आहे याच्या प्रकारानुसार ते आपल्या पिकामध्ये विविध कामे करत असतात.

* मल्चिंग पेपर शेतामध्ये टाकण्याची योग्य पद्धत कोणती?

मित्रांनो मल्चिंग पेपर हा शोधामध्ये टाकत असताना विविध खबरदारी आपल्याला पळावे लागतात त्यामुळे मल्चिंग पेपरचा योग्य वापर आपण करू शकतो व त्याचा योग्य फायदा आपल्या पिकाला होत असतो तर नेमका मल्चिंग पेपर वापरत असताना कोण कोणत्या खबरदारी आपण पाळल्या पाहिजे.

•बेड तयार केल्यानंतरच मल्चिंग पेपरचा वापर आपल्या पिकामध्ये करावा.
• मल्चिंग पेपर अंथरण्या अगोदर ठिबकची लाईन ही आपल्या बेडवरती अंथरूण द्यावी.
• मल्चिंग पेपर हा घट्ट बसवावा त्यासाठी मल्चिंग पेपरच्या दोन्ही बाजूला माती टाकावी.
• रूपांच्या लागवडीसाठी योग्य अंतरावर छिद्रे पाडून घ्यावीत.
• मल्चिंग पेपर हा वाऱ्यामुळे उडून जाणार नाही याची खबरदारी घ्यावी.

* कोणकोणत्या पिकासाठी मल्चिंग पेपर हा उपयोगी ठरतो?

मल्चिंग पेपर हा विविध फळ पिके तसेच भाजीपाला पिके यांच्यासाठी फार उपयुक्त ठरतो. त्यामध्ये
टोमॅटो
मिरची
वांगी
कलिंगड
खरबूज
काकडी
झेंडू
अशा विविध फळपिके व फुल पिकांना मल्चिंग पेपरचा फायदा होतो.

*मल्चिंग पेपरचा प्रति एकर खर्च किती येतो?

मल्चिंग पेपरचा एकरी खर्च हा मल्चिंग पेपरच्या प्रकारावर, शेतकरी पाडत असलेल्या बेडच्या रुंदी व लांबीवर तसेच मजुरीवर ठरत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या शेतकऱ्यांचा हा खर्च वेगवेगळा असू शकतो.
तरी अंदाजे

1- प्लास्टिक मल्चिंग पेपर – 10000 ते 20000
2- सिल्वर मल्चिंग पेपर- 10 ते १५ हजार
3- साधा मल्चिंग – 10 ते 12 हजार
अशाप्रकारे विविध प्रकारच्या मल्चिंग पेपर नुसार एकरी मल्चिंग पेपरचा खर्च लागू शकतो.



अशा प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या तसेच युट्युब वरती आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.

https://youtube.com/@aggroshala?si=Tn7otoZMk1syF7E1

Sunil

Sunil

“मी सुनील, या वेबसाईटचा मालक. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि शेतीसंबंधित माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे.”