उन्हाळ्यामध्ये फळबागांची काळजी कशी घ्यावी?
Www.aggroshala.com
मित्रांनो,
उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असल्यामुळे आपल्या पिकांना फळबागांना याचा फटका बसू शकतो. शक्यतो एप्रिल मे या दोन महिन्यांमध्ये तापमान हे खूपच जास्त प्रमाणात वाढलेले असतं. या जास्त तापमानामध्ये आपल्याला आपल्या फळबागांची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्या फळबागांचे नुकसान होणार नाही. यासाठी जर आपण योग्य पद्धतींचा वापर केला तर आपली फळबागही टिकेल उत्पादने वाढेल झाड ही खराब होणार नाही. त्यासाठी तुम्ही खालील काही पद्धतीनुसार तुमच्या फळबागांची काळजी घेऊ शकता.
उन्हाळ्यामध्ये फळबागांची काळजी कशी घ्यावी?
1) पाण्याचे नियोजन / व्यवस्थापन
उन्हाळ्यामध्ये पाण्याचे,योग्य नियोजन जर केलं योग्य व्यवस्थापन जर केलं तर आपल्या फळबागांना याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. कारण पाणी ही अशी एकमेव गोष्ट आहे जिच्या योग्य वापरामुळे तुम्ही तुमच्या झाडावरती येणारा जो उन्हाचा ताण आहे तो ताण कमी करू शकता. त्यासाठी
A - सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पाणी द्या -
सकाळी व संध्याकाळी या दोन टप्प्यांमध्येच आपल्याला फळबागांना पाणी द्यायचं आहे. कारण दुपारच्या वेळेला कुणाचा तडका जास्त असतो यावेळी झाडाची पाणी सोक करणारी क्षमताही कमी होते तसेच दिलेले पाणी हवेमध्ये बाष्पीभवनाच्या माध्यमातून उडून जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे फळबागांना पाणी देताना सकाळी किंवा संध्याकाळी या दोन टप्प्यांमध्ये द्या.
B- पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन चा वापर हा फायदेशीर ठरू शकतो. जेणेकरून पाण्याचा उपयोग होणार नाही आणि झाडांना योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने पाणी मिळेल.
C- झाडांच्या मुळाभोवती नेहमी ओलावा ठेवावा.
D- पाण्याचा व्यवस्थापन करत असताना जास्त प्रमाणात किंवा अतिरिक्त पाणी देणेही टाळावं. त्यामुळे भूषणचा प्रभाव वाढण्याची शक्यता जास्त असते.
उन्हाळ्यामध्ये फळबागांची काळजी कशी घ्यावी?
2) नैसर्गिक मल्चिंग
मल्चिंग म्हणजेच फक्त प्लास्टिकची मल्चिंग असते असे नाही. मल्चिंग म्हणजेच एक प्रकारचे आवरण. हे आवरण नैसर्गिक घटकांपासूनही बनवता येते. त्यामुळे फळबागांमध्ये जर आपण हे नैसर्गिक मल्चिंग वापरलं तर त्याचा नक्की फायदा होईल. या नैसर्गिक मल्चिंग मध्ये पालापाचोळा असेल, गवत असेल किंवा मक्याचा कडबा असेल तो जर आपण फळबागांच्या मधल्या सरींमध्ये टाकला तर त्यामुळे ओलावा टिकून राहील व जमीन जास्त तापणार नाही. त्याचा फायदा आपल्या फळबागांना नक्की होईल.
उन्हाळ्यामध्ये फळबागांची काळजी कशी घ्यावी?
3) खत व्यवस्थापन
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गर्मी ही जास्त असते उन्हाचा तडाखाली जास्त असतो अशा वेळेला जरा ताकद मिळण्यासाठी खत व्यवस्थापन हे फार महत्त्वाचा घटक ठरतो. त्यासाठी आपण
- सेंद्रिय खतांचा वापर करावा.
- गांडूळ खत शेणखत हे आपल्या फळबागांमध्ये टाकावं.
- झाडांना आवश्यक असणारा सूक्ष्म घटकांची फवारणी घ्यावी.
- उष्णतेमुळे जास्त प्रमाणात रासायनिक खत देणं टाळावं.
उन्हाळ्यामध्ये फळबागांची काळजी कशी घ्यावी?
4) कीड व रोग नियंत्रण
- बऱ्याचश्या अशा किडी किंवा बुरशी आहे ज्यांचा प्रभाव हा उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात वाढतो.
- या किडींचे नियमित निरीक्षण करा.
- कीड किंवा बुरशी आढळल्यास लगेच त्यावरती उपाय करा.
- अतिरिक्त पानगळ किंवा फळगळ दिसल्यास त्यावरही लगेच नियंत्रण मिळवा.
5) फळगळ कमी करण्यासाठी
उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा झाडाला लागणारी फळही मोठ्या प्रमाणात गळतात. त्यावर लगेच उपाययोजना करा. त्यामध्ये
- पाण्याचे योग्य नियोजन करा
- विविध हार्मोन स्प्रे घ्या.
- एका झाडाला जास्त प्रमाणात फळे लागल्यास त्यामधील काही फळे विरळ करा. जेणेकरून झाडावर ताण येणार नाही व फळगळ जास्त प्रमाणात होणार नाही.
6) छाटणी व्यवस्थापन
बऱ्याचदा आपल्या झाडाच्या काही फांद्या या खराब होतात सुखतात किंवा काही फांद्यांना विविध गोष्टींचा प्रभाव वाढतो. हा प्रभाव पूर्ण झाडभर पसरला नाही पाहिजे यासाठी.
- सुकलेल्या व रोबोट फांद्यांना छाटून घ्या.
- झाडामधील हवा खेळती राहील याकडे लक्ष द्या.
यामुळे झाडे निरोगी राहतील व त्यांची वाढ ही चांगली होईल.
7) अँटी ट्रान्सपरंट फवारणी
ही एक प्रकारची फवारणी आहे ज्यामुळे आपल्या पिकाच्या पानातून होणारे अतिरिक्त बाष्पिभवन आहे ते बाष्पीभवन रोखले जातं . त्यामुळे झाडाला पाण्याची कमतरता भासत नाही. तसेच अति उष्णतेचा ताणही झाडावर पडत नाही. त्यामुळे ही फवारणी महत्त्वाची आहे.
उन्हाळ्यामध्ये फळबागांची काळजी कशी घ्यावी?
याचा
निष्कर्ष - उन्हाळ्यामध्ये जास्त उन्हामुळेही आपल्या फळबागांना फटका बसत असतो. वरील सांगितलेले उपाय जर आपण उन्हाळ्यामध्ये केले तर नक्कीच आपल्या फळबागांना याचा फायदा होईल. फळबागांची काळजी उन्हाळ्यामध्ये ही जास्त प्रमाणात घ्यावी लागते. त्यासाठी योग्य पाण्याचे नियोजन, खतांचे नियोजन, फळांची काळजी या सर्वच बाबींकडे विशेष लक्ष द्यावे लागतात. वरील पद्धतींचा वापर हा नक्कीच आपल्या फळबागांना फायदेशीर ठरेल. 🙏🙏
अशा प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला नक्की भेट द्या व सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🙏🙏🙏
https://youtube.com/@aggroshala?si=uw9OILNJfn_6jsMh
