मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना 2026

मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना 2026. असा करा अर्ज!

मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना 2026 
मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना 2026

मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना 2026 योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली असून या योजनेद्वारे ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ग्रामीण भागात पशुपालन व्यवसाय वाढवणे, ग्रामीण रोजगार निर्मिती करणे, आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे मुख्य उद्दिष्टे समोर ठेवलेले आहेत. योजना मुख्यतः पशुपालन व्यवसाय वाढवण्यावर भर देते. त्यामुळे या योजनेद्वारे पशुपालना संबंधित विविध प्रकल्पावर विविध प्रकारचे व भरपूर अनुदान देण्यात आलेले आहे.

* मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता 2026 या योजनेचे मुख्य उद्दिष्टे काय आहेत?
-

1- ग्रामीण भागात शेतीला पूरक असलेल्या मुख्य व्यवसाय म्हणजेच पशुपालन व्यवसाय होय. हा पशुपालन व्यवसाय आणखी वाढावा यासाठी या योजनेमध्ये तरतुदी केल्या गेलेल्या आहेत.
2- दुग्ध उत्पादक शेतकरी यांचा दुग्ध व्यवसाय वाढवा तसे व शेळी किंवा मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाव.
3- ग्रामीण भागात बेरोजगार असलेल्या युवकांना पशुपालनाच्या माध्यमातून स्वयंरोजगार देणे.
4- पशुपालन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा यावर भर देणे.
5- व शेतकरी फक्त शेती तू निघणाऱ्या उत्पादनावर अवलंबून राहता त्याचे इतर उत्पादन सोर्स वाढवणे.

वरील उद्दिष्टांना समोर ठेवून मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना 2026 ही राबविण्यात आलेली आहे.

* मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना 2020 यानुसार कोण कोणत्या प्रकल्पासाठी किती अनुदान दिले गेलेले आहेत?

- प्रकल्पानुसार 50 ते 100% पर्यंतचे अनुदान या योजनेद्वारे विविध प्रकल्पांना दिलेले आहे त्यामध्ये
- पशुपालकांसाठी गाई व म्हशींची खरेदी यासाठी अनुदान
- शेळ्या व मेंढ्या पालकांसाठी विशेष प्रकल्प
- पोल्ट्री म्हणजेच कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष मदत
- पशुपालकांसाठी योजनेद्वारे शेडचे बांधकाम
- पशुपालन प्रकल्पासाठी विविध मशीन व यंत्रणांची मदत
- मुरघास साठवून ठेवण्यासाठी तसेच निर्माण करण्यासाठी प्रकल्प
अशा प्रकारच्या विविध बाबींसाठी या योजनेद्वारे अनुदान व मदत दिली जाणार आहे.

* मुख्यमंत्री पशुपालन उद्योजकता 2026 या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कोणकोणते प्रकल्प दिले जाणार आहेत?


- या योजनेचे माध्यमातून विविध शेतकऱ्यांना विविध प्रकारचे प्रकल्प मंजूर करून दिले जाणार आहे ज्याद्वारे ते त्यांचा आर्थिक विकास साधू शकतो.
- गाई म्हैस पाळणारे शेतकऱ्यांसाठी डेअरी प्रकल्प
- शेळ्या पाडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेळी प्रकल्प
- मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मेंढी प्रकल्प
- कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पोल्ट्री हा प्रकल्प
- वराह पालन करण्यासाठी वराह प्रकल्प
- पशुपालकांच्यासाठी पशुधन शेडचे बांधकाम
- जनावरांना चारा करण्यासाठी किंवा चारा बनवण्यासाठी फीड निर्माण करण्यासाठी विविध यंत्रणा.
अशा प्रकारचे विविध प्रकल्प शेतकऱ्यांना मंजूर करून दिले जाणार आहे व ज्याद्वारे शेतकऱ्यांना आपला आर्थिक विकास करण्यासाठी मदत मिळणार आहे.

*मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना 2026 या योजनेसाठी कोणत्या पात्रता दिलेल्या आहेत?


वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी काही पात्रता ठेवलेले आहेत त्या पात्रतांची पूर्तता करणारे शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकणार. या पात्रता खालील प्रमाणे
- अर्जदार किंवा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- तो शेतकरी किंवा शेतीपूरक व्यवसाय किंवा बेरोजगार असावा.
- स्वयंसहायता गट किंवा शेतकरी गट असलेल्यांसाठी प्राधान्य
- अर्जदाराकडे पशुपालनासाठी स्वतःची जागा असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे मोबाईल लिंक बँक खाते असावे
- आधार कार्ड असावं मोबाईल सोबत लिंक असाव.


* मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?


वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे खालील प्रमाणे कागदपत्राची पूर्तता केलेली असावी.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराच्या नावे सातबारा
- अर्जदाराचा रहिवासी दाखला
- अर्जदाराची जात प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- पासपोर्ट फोटो
- व प्रकल्प अहवाल
वरील कागदपत्रांची पूर्तता करणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

* अर्ज कुठे व कसा करायचा?

खालील दिलेल्या नियमानुसार अर्ज करावा व खालील दिलेल्या ठिकाणी अर्ज करावा.
- सर्वप्रथम अर्जदाराने तालुका पशुसंवर्धन कार्यालयामध्ये संपर्क साधावा.
- आपल्याला हवा असलेला प्रकल्प निवडावा
- त्या प्रकल्पासाठी अर्ज भरून द्यावा.
- मागितले गेलेले सर्व कागदपत्रे जोडून सबमिट करावे.
- अर्ज मंजूर झाल्यानंतर कर्ज + अनुदान.
अशाप्रकारे या योजनेसाठी आपण अर्ज करू शकतो. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अर्ज हा ऑफलाईन स्वीकारला जातो तसेच बऱ्याच जिल्ह्यामध्ये हा अर्ज ऑनलाईन पोर्टल द्वारे सुद्धा मागवला जातो. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन चौकशी करा ज्या पद्धतीने अर्ज मागवला आहे तसा अर्ज करा.


* या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळणार आहेत?

या योजनेद्वारे शेतकऱ्यांना खालील प्रमाणे फायदे मिळणार आहेत.
- विविध प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात सबसिडी
- सरकार शेतकऱ्यांना विविध प्रकल्प सुरू करण्यासाठी मदत देणार आहेत.
- प्रकल्प सुरू करण्यासाठी जर कर्ज काढावे लागले तर त्यावर व्याज सवलत.
- प्रकल्प सुरू करण्यासाठी त्या प्रकल्प विषयीचे प्रशिक्षण मिळणार.
- ग्रामीण भागात या योजनेमुळे रोजगार निर्मिती होईल.

वरील दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना 2026 याचे उद्दिष्टे समोर ठेवून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे.

अशा विविध महत्त्वपूर्ण शेती विषयक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या व लगेच सबस्क्राईब नक्की करा!🙏🙏🙏
https://youtube.com/@aggroshala?si=DiusD6enO83k5P2x

Sunil

Sunil

“मी सुनील, या वेबसाईटचा मालक. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि शेतीसंबंधित माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे.”