12-61-00 हे खत पिकासाठी किती महत्त्वाचा आहे व ते पिकासाठी काय काम करत?

12-61-00 हे खत पिकासाठी किती महत्त्वाच आहे? व पिकासाठी काय काम करतं? चला जाणून घेऊया!

12-61-00
12-61-00 हे खत पिकासाठी किती महत्त्वाचा आहे व ते पिकासाठी काय काम करत?
मित्रांनो 12 61 00 हे एक एनपीके विद्राव्य खत आहे.
ज्यामध्ये
12% नायट्रोजन,
61% फॉस्फरस,
00% पोटॅश असतं.

या खताचं वैशिष्ट्य म्हणजे हे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतं. याच खताला "मोनो अमोनियम फॉस्फेट" असेही म्हणतात.

12-61-00 चा मुख्य उपयोग:-

मित्रांनो 12 61 00 हे विद्राव्य खत शक्यतो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पिकाला दिला जात.
या खताचे आपल्या पिकाला खालील फायदे होतात.

1. सुरुवातीच्या वाढीच्या काळात दिल्यामुळे पिकाची वाढ चांगली होते.

2. या खताचा वापर मुळांची चांगली वाढ होण्यासाठी ही केला जातो. याच्या वापरामुळे मुळांची चांगली वाढ होते व मूळ मजबूत व जमिनीमध्ये खोलवर जातात ज्यामुळे आपल्या पिकाला जमिनीतील अन्नद्रव्य शोषून घेण्यास मदत होते.

3. तसेच जेव्हा पीक हे फुलरा अवस्थेत असतात किंवा पिकाला फुल लागण्याची अवस्था असते तेव्हाही
12 61 00 या खताचा वापर केला जातो. यामुळे आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीचे फुले लागतात.

4. 12 61 00 या खतामुळे आपल्या पिकाचा दर्जा सुधारतो व आपल्या पिकामध्ये उत्पादनाची वाढ निर्माण होते.

5. पिकामधील पिवळेपणा कमी होतो पान हे हिरवीगार दिसतात त्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया चांगल्या पद्धतीची होते व झाडांमध्ये अन्न निर्मिती चांगल्या पद्धतीची होते.

*12-61-00 कोण कोणत्या पिकामध्ये प्रभावी ठरतं / उपयोगी ठरतं??

- 12 61 00 हे खत जेमतेम सर्वच पिकामध्ये वापरलं जातं.यामध्ये

* कापूस
मका
सोयाबीन
ऊस
हरभरा

* भाजीपाला पिके
टोमॅटो
मिरची
वांगी
बटाटा
कांदा

* फळपिके
द्राक्ष
केळी
जांब
डाळिंब
मोसंबी
संत्रा

अशा विविध पिकांमध्ये 12 61 00 या खताचा वापर केला जातो.

* 12 61 00 पिकामध्ये वापरण्याची शास्त्रीय पद्धत कोणती?

- 12 61 डबल झिरो या खताची पिकामध्ये वापर करण्यासाठी आपण दोन पद्धतीचा वापर करू शकतो.
1. हे खत ठिबक द्वारे जर पिकाला सोडणार असाल तर
" प्रति एकर दोन ते तीन किलो"
या प्रमाणात सोडायचा आहे.

2. आणि या खताची जर पिकामध्ये फवारणी घेणार असाल तर,
" 5 ते 6 ग्रॅम प्रति लिटर "
पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी घ्यायची आहे.

*केंव्हा वापरणार??
पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळामध्ये या खताचा वापर केल्यास चांगले परिणाम आपल्या पिकांमध्ये दिसून येतात. तसेच पीक जेव्हा फुल अवस्थेमध्ये असतं जेव्हा पिकाला फुले लागतात तेव्हाही याचा वापर केल्यास चांगल्या पद्धतीचे परिणाम आपल्या पिकांमध्ये दिसून येतात.


टीप :-
1. या खताचा अति जास्त वापर टाळा.
2. 12 61 00 हे खत "कॅल्शियम व मॅग्नेशियम" या दोन खतांसोबत मिसळू नका.

Sunil

Sunil

“मी सुनील, या वेबसाईटचा मालक. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि शेतीसंबंधित माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे.”