मित्रांनो 19 19 19 हे एक संतुलित खत आहे. ज्यामध्ये तीनही घटक समान प्रमाणात असतात व हे पाण्यामध्ये जलद विरघळणाऱ्या असे वॉटर सोलबल खात आहे.

यामध्ये,
Nitrogen -19%
Phosphorus -19%
Potacium -19%
https://youtube.com/@aggroshala?si=tUPTaqgvap-WnmpHAggro Shala
तीनही घटक समान प्रमाणात असल्यामुळे याला बॅलन्स फर्टीलायझर असेही म्हणतात.
*यातील घटक पिकासाठी काय काम करतात?
1) नायट्रोजन
– पानांची वाढ सुधारते.
– झाडामध्ये क्लोरोफिल ची निर्मिती करतो.
– झाडांची वाढ जलद होते.
2) फॉस्फरस
– मुलांना वाढीसाठी मदत करतो.
– झाडाला फलधारणा व फुलधारणा चांगल्या पद्धतीची लागते.
– व झाडाला ताकद भेटते.
3) पोटॅशियम
– फळांची गुणवत्ता दर्जेदार होते.
– झाडाची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते.
– अति पाऊस, कडक ऊन, व अति थंडी या प्रकारच्या परिस्थितीमध्ये झाडाला ताण सहन करण्याची शक्ती मिळते.
*19-19-19 हे खत शेतामध्ये वापरण्याची फायदे काय आहेत?
– पाण्यामध्ये विद्राव्यशील असल्यामुळे झाडांपर्यंत चांगलं पोहोचतो.
– झाडांची वाढ संतुलित होते.
– झाडांची वाढ जलद होते.
– सर्व पिकांसाठी फायदेशीर असं हे खात आहे.
– झाडाला अन्नद्रव्याची कमतरता असल्यास ती लवकर भरून निघते.
– आपल्या उत्पादनामध्ये भर पडते.
– फवारणी किंवा ड्रिपिंग अशा दोन्ही पद्धतीने आपण पिकांपर्यंत पोहोचू शकतो.
वरील प्रकारे आपल्या पिकाला 19 19 19 या खताचे फायदे होतात.
*19-19-19 हे खत वापरण्याची योग्य वेळ कोणती?
– आपण हे खत आपल्या पिकांमध्ये पुढील तीन टप्प्यांमध्ये वापरू शकतो. त्याच्यामुळे आपल्या पिकाला याचा चांगला फायदा होतो.
1- लागवडीनंतर
2- झाडांच्या वाढीच्या कालावधीमध्ये.
3- झाडाला फुलधारणा होण्याच्या कालावधीमध्ये.
या तीन टप्प्यांमध्ये जर आपण 19 19 19 या खताचा वापर केला तर आपल्याला चांगला फायदा आपल्या पिकांमध्ये दिसून येतो.
* कोणकोणत्या पिकांसाठी हे खत उपयोगी ठरतं?
भाजीपाला – मिरची, काकडी, कोबी, टोमॅटो,
फळ पीक – डाळिंब, संत्रा, लिंबू, मोसंबी,द्राक्षे
धान्य पीक – गहू, हरभरा, मका, सोयाबीन
सर्वच पिकांसाठी 19-19-19 या खाताचा वापर केला जातो.
*19-19-19 या खाताचा वापरण्याचे प्रमाण?
हे खतं आपण पिकांना दोन प्रकारे देऊ शकतो
1- फवारणी
– जर आपण या खताची फवारणी आपल्या पिकावर घेत असाल तर 5 ते 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये त्याचा मिक्सर करून त्याची फवारणी आपल्या पिकामध्ये घ्यायची आहे.
2- ड्रीप
आणि जर ठिबक द्वारे आपण हे खत पिकाला सोडणार असाल तर दोन ते पाच किलो प्रति एकर ह्या प्रमाणामध्ये ते आपल्या पिकाला सोडायचं आहे.
*19-19-19 हे खत आपल्या पिकांना सोडत असताना खालील काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी.!
हे टाळा –
1-19-19-19 हे खत अति प्रमाणामध्ये पिकांना वापरू नये.
2- इतर खतांसोबत तसेच औषधींसोबत मिसळवताना त्याची काही रिएक्शन आपल्या पिकांना होणार नाही याची अगोदर माहिती घ्यावी आणि नंतरच त्याच मिक्सर करावा.
3. पावसाळ्यामध्ये फवारणी टाळावी.
4- कडक उन्हामध्ये फवारणी टाळावी.
हे करा!-
1- फवारणी करताना शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावी.
2- फवारणी करत असताना स्टिकर चा वापर अवश्य करावा जेणेकरून खताचे दवे आपल्या पिकाला चिटकून राहील.
3- अमिनो ऍसिड सोबत हे खत वापरल्यास चांगला परीणाम या पिकामध्ये दिसून येतो.
19-19-19 हे खतं कोणत्या इतर खतासोबत वापरू शकतो.?
या खतसोबत मिसळावं ✅✅
1- अमिनो ऍसिड सोबत मिसळू शकतो.
2- सूक्ष्म अन्नद्रव्य यांच्यासोबतही हे खत मिसळवू शकतो.
3- समुद्री शेवाळ तसेच समुद्री शैवळ आयुक्त जे काही घटक आहेत त्यांच्या सोबतही आपण हे खत मेजर करू शकतो.
या सोबत मिसळू नका ❌❌
1- कॅल्शियम नायट्रेट सोबत 1919-19 हे खत मिक्सर करू नका.
2- सल्फर युक्त खतांमध्येही हे खत मिक्स्चर करू नका.
निष्कर्ष –
19-19-19 हे आपल्या पिकासाठी फार फायदेशीर उपयुक्त असं खत आहे. हे खत एक बॅलन्स करत असल्यामुळे याचा नक्कीच आपल्या पिकाला फायदा होतो तसेच हे आपल्या पिकासाठी सुरक्षित आहे म्हणजे यामुळे आपल्या पिकाला काही हानी होण्याची शक्यता फार कमी आहे.
सम्बंधित ख़बरें