Calcium पिकासाठी किती महत्वाचा आहे? कमतरतेमुळे पिकाचे नुकसान होते का?जाणून घ्या सविस्तर

Calcium पिकासाठी किती महत्वाचा आहे? कमतरतेमुळे पिकाचे नुकसान होते का?जाणून घ्या सविस्तर

कॅल्शियम हा पिकासाठी फार महत्त्वाचा असा दुय्यम अन्नघटक आहे. कॅल्शियम पिकांच्या सर्वांगीण ओळीसाठी फार महत्त्वाची भूमिका निभावतो. याच्या कमतरतेमुळे आपल्या पिकाचे नुकसान होऊ शकतं.
Calcium पिकासाठी किती महत्वाचा आहे? कमतरतेमुळे पिकाचे नुकसान होते का?जाणून घ्या सविस्तर

कॅल्शियम पिकासाठी महत्त्वाचा कां आहे?

1) नवीन वाढीसाठी आवश्यक.
आपल्या पिकाला नवीन पाने,फुटवे, मुळांची वाढ यासाठी कॅल्शियम फार महत्वाचा असतो. कॅल्शियममुळेच ही नवीन वाढ आपल्या पिकामध्ये शक्य होते. त्यामुळे वाढीच्या कालावधीमध्ये कॅल्शियम हा फार महत्त्वाचा घटक आपल्या पिकामध्ये ठरतो.

2) मुळांच्या वाढीसाठी
कॅल्शियम आपल्या पिकाची मुळे वाढवण्यासाठी मदत करतो. कॅल्शियममुळेच आपल्या पिकाची मुळे ही खोलवर जमिनी जातात. तसेच मोठी, जाड,टणक व मजबूत बनतात. त्यामुळे जमिनीतील पाणी, अन्नद्रव्य शोषून घेण्यास आपल्या पिकाला फार मदत होते.

3) पेशीभित्तिका मजबूत करतो.
आपल्या पिकातील सर्वात लहान घटक म्हणजे पेशी. या पेशी जेवढे निरोगी राहील चांगल्या राहील सुदृढ राहील तेवढेच आपली झाड ही निरोगी व सुदृढ राहील. या पेशीमध्ये मजबुती देण्यासाठी "पेशीभित्तिका" नावाचा अवयव असतो घटक असतो. या पेशीभित्तिकांना मजबुती देण्याचा काम कॅल्शियम करतो. त्यामुळे पेशी निरोगी राहतात आणि परिणामी आपलं झाडही निरोगी राहत.
पेशीभित्तिका मजबूत असल्यामुळे व पेशी मुलगा असल्यामुळे आपल्या झाडाची रोगप्रतिकारक्षमता चांगल्या पद्धतीची सुधारते व बाह्य किडींपासून आपल्या पिकाचे संरक्षण होतं.

4) फळाची कॉलिटी सुधारती.
कॅल्शियम या घटकामुळे आपल्या पिकातील फळांना मजबुती मिळते. फळही मजबूत तसेच टनक तयार होतात. त्यामुळे हलकेफुलके झटके सहन करण्याची क्षमता आपल्या फळांमध्ये निर्माण होते. आणि फळही दीर्घकाळ खराब न होता तसेच टिकून राहतात. या टकपणामुळेच फळांचं वाहन करण्यासाठी सोयीस्कर जातं. तसेच फळांची साठवण क्षमता ही सुधारते.

5) एंजाइम्स आणि हार्मोन्स चं नियंत्रण.
कॅल्शियम आपल्या पिकांमधील विविध एन्झाइम्स तसेच विविध हार्मोन्स यांना कंट्रोल करतं. त्यामुळे या एक्झाम्स आणि हार्मोन्स योग्य वेळी योग्य ठिकाणी एक्टिवेशन हे नियमित व नियंत्रित होत असतं. व त्यांच्या माध्यमातून आपल्या पिकातील जैविक क्रिया ह्या सुरळीत पार पडत असतात.

6) मातीची पोत सुधारतो.
आपल्या जमिनीचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे माती या मातीमुळेच आपल्या जमिनीमध्ये पीक तयार होतात पिकवतात व आपल्याला उत्पादन देतात. त्यामुळे ही माती इथली आरोग्यदायी असेल तेवढेच आपल्या पिकांसाठी चांगलं आहे. आणि हा कॅल्शियम नेमकं तेच काम करतो. आपल्या जमिनीचे व मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतो. कॅल्शियम मुळे आपल्या जमिनीचा पोत सुधारतो. कारण कॅल्शियम आपल्या जमिनीमध्ये पीएच नियंत्रित करण्यासाठी मदत करतो. तसेच आपल्या मातीची रचना ही सुधारण्यासाठी मदत करतो.


कॅल्शियम कोणत्या पिकासाठी फार जरुरी आहे?

फळवर्गीय सर्वच पिकांसाठी कॅल्शियम हा फार उपयुक्त असा घटक आहे. त्यामध्ये
1- टोमॅटो
2- मिरची
3- वांगी
4- संत्रा
5- डाळिंब
5- द्राक्ष
6- ऊस
7- केळी इ. व आणखीही बऱ्याचश्या पिकामध्ये कॅल्शियम हा उपयोगी ठरतो.

* कॅल्शियमची आपल्या पिकामध्ये कमतरता आहे हे ओळखायचं कसं?

मित्रांनो कॅल्शियमची कमतरता जेव्हा आपल्या पिकांमध्ये निर्माण होते तेव्हा पीक काही लक्षणे दाखवतात ते लक्षणाकडे आपण जर नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपले पिकांमध्ये कॅल्शियमची कमतरता आहे. ही लक्षणे कोणती तर ती खालील प्रमाणे

1- नवीन पाणी वाकडी होणे.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपल्या पिकाला फुटणारे नवीन पानं ही मुरगळतात. कॅल्शियम कमी असल्यामुळे या पानांची वाढणी होत नाही व ते जागीच पानांच्या शेंड्यावरती घड्या घालतात व त्यामुळे हे पान वाकडेतिकडे तयार होतात.

2- पानांच्या टोकाला करपल्यासारखे दिसतं.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपल्या पिकाचे पान आहे टोकाला जळतात पिवळसर पडतात.

3- पिकांची मुळे कमजोर होतात त्यांची वाढ कमी होते.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपल्या पिकाची मुळे खोलवर जमिनीमध्ये जात नाही त्याची वाढ ही कोण होते तसेच यामुळे कमजोर होतात विविध अन्न घटकांचा शोषणही कमी करतात.

4- फळांवर काळे डाग पडतात.
आपल्या पिकाची जी फळे आहे त्यांची क्वालिटी खराब होते. त्यांच्यावरती काळे डाग पडतात.

5- फुले व फुल कळ्या गळणे.
मित्रांनो कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपल्या फुलाची डेट ही कमजोर बनतात व त्यामुळे पिकाला लागलेली फुलं तसेच फुल काय या गळून पडतात.

मित्रांनो ही काही आपल्या पिकामधील लक्षणे आहे ज्यांच्यावरून आपल्या लक्षात येते की आपल्या पिकामध्ये कॅल्शियम या घटकाची कमतरता आहे.

* कॅल्शियम देण्याचे मार्ग किंवा प्रकार

मित्रांनो आपण आपल्या पिकांना कॅल्शियम दोन पद्धतीने देत असतो त्यामध्ये एक डायरेक्टली मातीद्वारे व दुसरा फवारणी द्वारे.

1- मातीच्या माध्यमातून.
* जिप्सम
* लाईम
* डोलोमाईट

या घटकांद्वारे आपण आपल्या पिकाला मातीतून कॅल्शियम देत असतो.

2- फवारणी द्वारे
* कॅल्शियम नायट्रेट
* कॅल्शियम क्लोराइड

फवारणी द्वारे कॅल्शियम देत असताना आपण या घटकांची फवारणी आपल्या पिकावर ती करत असतो.


कॅल्शियम पिकांना देण्याची योग्य वेळ?
* रोप अवस्थेत
आपल्या पिकांची लागवड करायची आहे ती पिक रोप अवस्थेमध्ये असताना जर आपण कॅल्शियम त्यांना दिलं तर त्यांच्या मुलांची नेटची वाढ होते त्यामुळे ते जमिनीमध्ये लावल्यानंतर चांगल्या पद्धतीची ग्रोथ पकडतात व त्यांची वाढ ही चांगली होते.

* वाढीच्या कालावधीमध्ये
वाडीच्या कालावधीमध्ये पिकाला कॅल्शियम दिल्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन झाडाची वाढ चांगली होते. जेवढे झाडांची वाढ चांगली होईल तेवढेच आपल्या झाडांचे आरोग्यासाठी उत्पादनासाठी चांगला असतं.

* फुलधारणा अवस्थेमध्ये
जेव्हा आपल्या पिकांना फुल लागतात फुल कळ्या लागतात त्या अवस्थेमध्ये जर कॅल्शियम आपण पिकांना तिला तर फुल वेळ कमी होते त्यामुळे फुल चांगली लागून आपल्या पिकाला फळही चांगली लागतात व आपल्या उत्पादनामध्ये वाढ होण्याची चान्सेस वाढतात.

* फळधारणा या अवस्थेमध्ये
फुलांचे रूपांतर जेव्हा फळांमध्ये होते तेव्हा ही फळ जितकी चांगली व आरोग्यदायी असेल तेवढेच चांगल्या किमतीमध्ये ती बाजारपेठेमध्ये विकली जाईल. त्यामुळे फळावस्थेमध्ये जर कॅल्शियम आपण आपल्या पिकांना दिला तर आपले फळांची कॉलिटी सुधारते,चकाकी सुधारते. त्यामुळे फळ अवस्थेमध्ये यांचे आपले पिकासाठी फार जरुरी ठरतो.


*शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

1- कॅल्शियम पाण्यामध्ये कमी हालचाल करतो. त्यामुळे कॅल्शियम पिकांपर्यंत नीट पोचण्यासाठी नियमित पाण्याचा पुरवठा करणे फार जरुरी आहे.
2- ठिबक द्वारे जर कॅल्शियम देत असाल तर कॅल्शियम नायट्रेट हा बेस्ट ऑप्शन आहे तो टेबल द्वारे पिकापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचतो.
3- जास्त नायट्रोजन दिल्यास आपल्या पिकामध्ये कॅल्शियम कमी पडू शकतो त्यामुळे नायट्रोजन म्हणजेच युरिया हे खत वापरताना नियंत्रित अशा पद्धतीने व बॅलन्स पद्धतीमध्ये वापरावे.


निष्कर्ष-
कॅल्शियम हा पिकासाठी दुय्यम अन्नघटक असला तरीही तो आपल्या पिकामध्ये फार महत्त्वाची भूमिका निभावतो कॅल्शियम मुळेच आपल्या पिकाचा सर्वांगीण विकासासाठी हातभार लागतो. झाडाचा आरोग्य चांगलं राहतं,झाडाला फळे चांगली लागतात, फुलगळ कमी होते, झाडांची वाढ चांगली होते ही सर्व कामे कॅल्शियम आपल्या पिकांमध्ये करत असतो व त्यामुळे आपल्या झाडाचा विकासही चांगला होत असतो.

टीप -
अशाच शेतीसंबंधी महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या
https://youtube.com/@aggroshala?si=2-fb3zF87mMJldRn
"@aggroshala "
या "youtube" चैनल ला सुद्धा भेट द्या व सबस्क्राईब करून घ्या.

Sunil

Sunil

“मी सुनील, या वेबसाईटचा मालक. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि शेतीसंबंधित माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे.”